Login

शिक्षणाची पणती भाग २

'प्रकाशपूर' हे एकेकाळी प्रगतीचे प्रतीक असलेले गाव काळाच्या ओघात विस्मृतीत गेले होते. अशावेळी, प्रज्ञा नावाची एक जिद्दी तरुणी गावासाठी काहीतरी करण्याचा निश्चय करते. शिक्षणाच्या अभावामुळे अंधारात गेलेल्या गावातील मुलांसाठी ती एक नवीन शाळा उभारण्याचे स्वप्न पाहते. सुरुवातीला विरोध आणि अडचणींचा सामना करत असली तरी, प्रज्ञा आपल्या एकजुटीच्या आणि निस्वार्थ प्रयत्नांनी संपूर्ण गावाला एकत्र आणते. 'स्वप्नांची पणती' पेटवण्याच्या तिच्या ध्येयामुळे, गावकऱ्यांच्या श्रमदानातून आणि सहभागातून जुनी शाळा पुन्हा उभी राहते. ही कथा केवळ एका इमारतीच्या पुनर्बांधणीची नाही, तर ती एकजुटीने, निस्वार्थ सेवेने आणि दृढनिश्चयाने कोणतेही मोठे आव्हान कसे जिंकता येते याची प्रेरणादायी गाथा आहे. 'प्रकाशपूर' कसे पुन्हा ज्ञानाच्या आणि प्रगतीच्या प्रकाशाने उजळून निघते, हे या कथेतून अनुभवता येते.
भाग २


आपला निर्धार पक्का करून प्रज्ञा कामाला लागली, . शिक्षणाने गरीबी कशी दूर होऊ शकते आणि नवीन संधी कशा उपलब्ध होऊ शकतात, हे ती सोप्या भाषेत समजावून सांगायची. तिने त्यांच्यासमोर मुलांसाठी एक चांगली, नवीन शाळा उभारण्याची कल्पना मांडली, जिथे मुलांना केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर जीवनातील मूल्येही शिकवली जातील . तिने घरोघरी जाऊन मुलांना शिक्षणाचे महत्त्व जाऊन समजून सांगितले.सुरुवातीला अनेकांनी तिची जरा चेष्टा केली, तिला वेड्यात काढलं. "तू एकटी काय करणार? हे सरकारी काम आहे, तुला त्यात पडण्याची काय गरज आहे?", "सरकारी मदत कधीच मिळणार नाही, उगाच स्वप्न पाहू नकोस.", "आम्ही गरीब लोक, आमच्याकडे पैसे कुठून येणार? शाळा दुरुस्त करायला खूप पैसे लागतील." असे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे राहिले. काही जण तर थेट म्हणाले, "शहरात तुला चांगली नोकरी मिळत असताना तू इथे वेळ का वाया घालवत आहेस? स्वतःच्या भविष्याचा विचार कर."

पण प्रज्ञाने हार मानली नाही. तिच्या मनातील विश्वास अविचल होता. ती निराश न होता आपलं काम करत राहिली, प्रत्येक घरावर पुन्हा पुन्हा जाऊन लोकांना समजावत राहिली. तिच्या सततच्या प्रयत्नांमुळे हळूहळू काही महिला तिच्याशी जोडल्या गेल्या. गावातील काही तरुण स्त्रिया, ज्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलं होतं, त्या प्रज्ञाच्या साथीला आल्या. त्यात माधवी, एक हुशार आणि कार्यक्षम गृहिणी, होती, जी घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगत होती. दुसरी होती सुमन, एक मेहनती शेतकरी महिला, जिच्या चेहऱ्यावर कष्ट आणि धैर्याची झलक दिसायची. या दोघी प्रज्ञाच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. त्यांच्यात शिक्षणाबद्दल तळमळ होती आणि काहीतरी चांगलं घडवण्याची जिद्द होती. त्यांनी एकत्रितपणे एक योजना तयार केली. त्यांनी ठरवलं की जुन्या शाळेची इमारत दुरुस्त करून तिला पुन्हा वापरण्यायोग्य बनवायचं, कारण नवीन इमारत बांधायला खूप वेळ आणि पैसा लागला असता.

या तिघींनी मिळून गावातील पुरुषांना श्रमदानासाठी, म्हणजे निःशुल्क काम करण्यासाठी, पटवून दिलं. सुरुवातीला संकोच करणारे पुरुषही त्यांच्या जिद्दीपुढे नमतं घेतलं. काही महिलांनी घरगुती खाद्यपदार्थ तयार करून, विकले. अनेकांना या स्त्रियांचा उत्साह पाहून आपल्या चुकांची जाणीव झाली आणि तेही या कार्यात सामील झाले.

🎭 Series Post

View all