Login

शिक्षणाचा दीप

ती स्वतःच स्वप्न पूर्ण करू शकेल काव ? जाणून घेण्यासाठी वाचा भाग्यश्री लिखित शिक्षणाचा दीप
चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा २०२५

(लघुकथा)


" अगं हे... ते पुस्तक बाजूला ठेव आधी. भात करपला बघ.."

ती पटकन पुस्तक बाजूला ठेवून कपड्याने भाताचा टोप चुलीवरून काढत बाजूला ठेवते. मग बाजूला उकळण्यासाठी टोपात ठेवलेले बटाटे चुलीवर ठेवते आणि पुस्तक हातात घेत मनातल्या मनात  वाचायला सुरुवात करते. तिला परत पुस्तक वाचताना बघून.

" भात करपवला. आता बटाटे पण करपव हा.. कायं करणार आहेस शिकून ? तुझं शिकण्याचं वय निघून गेलं. आता शिकून कायं फायदा ? "
तिचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही बघून " कायं मुलगी आहे ? मोठ्यांच ऐकत पण नाही. ( तिच्याजवळ जात मोठ्या आवाजात ) होय महाराणी.. मी कायं बोलतेय ऐकू येत नाही का ? "

तिच्याशी बोलत असताना मागून भारदस्त आवाज येतो
" शैला... ती परीक्षेची तयारी करत आहे. मोठी आहेस म्हणून कोणावर पण हुकूम नाही चालवायचं. "

" आई.. भात करपत होता म्हणून मी..." शैला बोलते
आई शैलाला मध्येच अडवत " मग नीट सांगायचं होतं. अस उद्धटपणे बोलून स्वतःचा अपमान करत आहेस तू. "

आईच ऐकून शैलाला राग येतो ती रागातचं
" आई... मी शिकली नाही म्हणून मला अशी वागणूक नका देऊ. या घरची मी मोठी सून आहे. काव्यापेक्षा मी जास्त कामे करते. काव्या तर नेहमी पुस्तकात डोकं खुपसून असते. तिचं लक्षच नसतं घरच्या कामात. तरीही तुम्ही मलाच बोलत असता तिला काहीच नाही. "

" शैला.. हे विसरू नकोस पाच वर्षापूर्वी तू काय निर्णय घेतला होतास. राहिली गोष्ट कामाची , ते सर्वांना दिसत तू किती कामं करतेस ते. " आई बजावून सांगतात.

आई जे काही बोलल्या त्याने शैलाची चिडचिड होत होती. ती चिडतच " करा तुमच्या छोट्या सुनेची सेवा. मी जाते इथून. " बोलून स्वयंपाक घरातून निघून गेली.

शैला गेल्यावर काव्या आईला म्हणते " आई.. माफ करा माझ्यामुळे तुम्हाला शैला ताईच नेहमी  ऐकावं लागत. "

" काव्या.. माफी नको मागू. तू तुझं स्वप्न पूर्ण कर. बाकी कोण काय बोलतय याकडे लक्ष नको देऊ. " एवढ बोलून आई तिथून निघून गेल्या.


रात्रीच जेवण उरकून झाल्यावर काव्या आपल्या खोलीत आल्यावर समोर बघते तर तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. ती धावतच समोरच्या व्यक्तीला मिठी मारते.

थोड्या वेळात मिठीतून बाहेर येत " मला तुमची खूप आठवण येत होती. "

" मलाही... तुझी खूप आठवण येत होती. मग कायं म्हणता आमच्या राणीसाहेब ? "

" कार्तिक..  राणीसाहेब...काहीही असत तुमचं ? काही नाही आज पण रोजच्यासारखं झालं. माझ्यामुळे आईंना शैला ताईच ऐकावं लागलं." काव्या हताश होऊन बोलते.

" काव्या.. तुझ्यामुळे काही नाही. शैला वहिनी तश्याच आहेत. राहिली गोष्ट तुला शिक्षणाबद्दल बोलतात. त्यांच काही मनावर नको घेऊस. तू फक्त तुझ्या स्वप्नांवर लक्ष दे. " कार्तिक समजावणीच्या सुरात म्हणतो.

" तुमचे आणि आईचे खूप आभार. तुम्ही दोघं मला स्वप्न पूर्ण करायला बळ देता. नाहीतर मी इथपर्यंत आलीच नसते. " काव्या भावूक होऊन बोलते

" आम्हालाही वाटत तू शिकावं. तुझा अंभिमानही वाटतो. तू तुझ्या स्वप्नांसोबत गावातल्या अशिक्षित लोकांचा पण विचार करत आहेस. " कार्तिक आनंदाने बोलतो.

" मला या गावासाठीच नाही इतर गावात पण अशिक्षित लोकांना माझं स्वतःचं ॲप काढून शिकवायच आहे. म्हणजे कोणीच अशिक्षित राहणार नाही. अ‍ॅपमध्ये असे फिचर्स तयार करेन की कोणालाच शिकण्याचा कंटाळा नाही येणार. काहींना रेंजची अडचण , काही पैशाच्या अडचणीमुळे नेटचे पैसे भरू शकत नाही. त्यासाठी मी ऑफलाईन करणार आहे. म्हणजे सगळेच अ‍ॅपद्वारे शिकू शकतील त्यात मी  सरकार , कोर्ट ज्याची  परवानगी घ्यायची त्याची परवानगी घेऊन शिक्षण पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करेन. "

काव्याचे ऐकून कार्तिक महणतो" उगाच आई तुझ्यावर इतक प्रेम नाही करत. "

" हो.. मी भाग्यवान आहे की मला अशी सासू भेटली. आजकाल मी खूप बघितल , ऐकलं की काही घरात यामुळे  वाद खूप होतात. ( वेळ बघत ) चला झोपा उद्या लवकर उठायचं आहे आणि परीक्षेला जायचं आहे. " काव्या बोलते

" हो.. मलाही चार दिवसासाठी जावं लागेल. भज्याच्या व्यापारावर मीटिंग आहे. "

कार्तिकच ऐकून काव्या म्हणते " परत... तुम्ही आताच तर आलात. आराम करायचं सोडून लगेच कामाला लागणार."

" जावं लागेल.. महत्वाचं आहे." कार्तिक बोलतो तशी काव्या म्हणते,
" ठीक आहे. चला झोपा आता."

बोलून झाल्यावर दोघं झोपी जातात.

सकाळी काव्या लवकर उठून घरातली सर्व कामे उरकून थोडा अभ्यास करू म्हणून ती आपल्या बॅगेतून पुस्तक काढायला बॅग खोलते तर बॅगेत पुस्तक नसतात. बॅग पूर्ण रिकामी असते. ती पूर्ण घर शोधून काढते पण तिला पुस्तके आणि वह्या कुठेच सापडत नाही. परत पुस्तक शोधत असताना तिला कुठूनतरी जळाल्याचा वास येतो. बघते तर स्वयंपाकघरातून येत होता म्हणून ती धावतच स्वयंपाकघरात जाते आणि समोरच दृश्य बघून तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसतो.

ती रागातच मोठ्या आवाजात " शैला ताई... हे कायं केलं तुम्ही ? तुम्ही मोठ्या आहात म्हणून काहीही करणार. "

काव्याचा आवाज ऐकून आई आणि कार्तिक तिथे येतात बघतात तर शैला काव्याची पुस्तक चुलीत जाळत होती. हे बघून आईला खूप राग येतो त्या रागातच " शैला... तुला अक्कल आहे की नाही. का जाळलीत काव्याची पुस्तकं. "

शैला पण रागात " ही काही कामच करत नाही म्हणून मी जाळली पुस्तकं म्हणजे शिक्षण सोडून कामाला तरी लागेल ही. तसही तुमचा मुलगा या जगात नाही म्हणून मला मान देत नाही. नेहमी मला उद्धट बोलता. मग मी तेच केलं उद्धटपणाच काम. "

" शैला.. तू पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयानंतरच आयुष्य आठव मग समजेल माझा मुलगा कशामुळे नाहीये. " आई ओरडून बोलतात

आई जे काही बोलली त्यावरून शैलाला पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयानंतरच आयुष्य आठवून तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि ती अचानक रडायला लागते.

जेव्हा शैला लग्न करून सासरी आली तेव्हा आईंनी तिच्यासमोर शिक्षण पूर्ण करण्याची गोष्ट समोर ठेवली. तेव्हा शैलाने " मी शिकून कायं करू. तसही माझा नवरा चांगला कमावतो आहे. मग तो माझ्या गरजा पूर्ण करायला समर्थ आहे. " हा विचार करून न शिकण्याचं निर्णय घेतला. शैलाचा निर्णय ऐकून आईंनी तिला परत एकदा विचार करण्यास सांगितले पण तिने " हा माझा अंतिम निर्णय आहे. " सांगून विषय संपवला. नंतर आईंनी तिला शिक्षणाबद्दल काही बोलल्या नाही. असेच दिवस जात असताना एक दिवस आजुबाजूच्या शिकलेल्या मुली तिला शिक्षणावरून माज दाखवत होत्या वरून घरी कसं त्यांच राज्य चालत हेही सांगत होत्या. हे सगळ ऐकून शैलाला स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप झाला. तरी तिने घरी काही न बोलता " मी शिकली नाहीतर काय झालं. न शिकता पण राज्य करू शकते. " हा विचार करून तिने आपल्या नवऱ्यावर कस राज्य करायचं याची आखणी करून ठेवली. हळूहळू तिच्या नवऱ्याला ती चुकीच करत आहे अस वाटलं म्हणून त्याने तिला समजावून सांगितलं तरी शैला काही समजून घेण्यास तयार नव्हती.शैला ऐकत नाही म्हणून त्यादिवशी घरी दोघांमध्ये मोठं भांडण झालं आणि यातच तिच्या नवऱ्याला सहन न झाल्याने पॅनिक अटॅक मध्येच तो वारला.

हे सगळ वाटून आता शैलाला तिची चूक लक्षात आली. ती रडतच हात जोडून तिघांकडे बघून " माफ करा मला. माफ करा. माझ्याकडून मोठी चूक झाली. माझ्या अश्या वागण्यामुळे मी माझ्या नवऱ्याला गमावलं सोबत स्वतःच स्वतःचा अपमान केला. माफ करा मला."

आई तिच्याजवळ येतं म्हणतात " तुला तुझी चूक लक्षात आली हेच खूप आहे. आता सगळ विसरून एक नवीन सुरुवात कर. हवं तर तू शिकायला सुरुवात करू शकते."

शैला " हो.. मी शिकेन पण काव्याने बनवलेल्या अ‍ॅपवरून. "

शैलाने चूक मान्य केली आणि तिने शिकण्याचा निर्णय घेतला ऐकून सगळे खुश होते.

एक वर्षानंतर काव्याने स्वतःच अ‍ॅप चालू केलं ज्यात सगळे ऑफलाईन शिकू शकत होते. कोणालाच पैशाची काळजी नव्हती. काव्याने ज्याची परवानगी घ्यायची त्याची परवानगी घेऊन शिक्षण पूर्ण करण्याचं प्रमाणपत्र उपलब्ध केलं. हळूहळू हे अँप सगळीडे पसरलं. जे पैशांमुळे शिकत नव्हते त्यांनीही शिकायला सुरूवात केली. सगळीकडे काव्याची वाहवा होत होती.

समाप्त
©भाग्यश्री परब
0

🎭 Series Post

View all