शिस्त हवी पण वळ नको.भाग २
मागील भागावरून पुढे.
दिवसभर घरातील वातावरणात एक ताण जाणवत होता. संध्याकाळी जेवणासाठी सगळे पुन्हा एकत्र आले. टेबलावर भाजी-पोळी फोडणीचा वरण,गरम मऊ भात होता. विनय शांत होता, अनंत वृत्तपत्र वाचत होते, सिद्धार्थ मोबाईलवर काहीतरी पाहत होता.
सुमन कडक स्वरात म्हणाली,
“या घरात वेळ, काम, वागणं सगळं ठरलेल्या चौकटीतलं हवं. उद्यापासून कुणीही उशिरा घरी यायचं नाही. हे माझं शेवटचं सांगणं आहे.”
सिद्धार्थने चमचा टेबलावर आपटला.
सिद्धार्थने चमचा टेबलावर आपटला.
“आई! किती बंधनं घालणार आहेस? मी माणूस आहे की कैदी?”
घरात पुन्हा शांतता पसरली. अनंतने चष्मा काढून डोळे चोळले. आजीने देवाचं नाव घेतलं. वातावरण आणखीन गंभीर झालं.
आजी शांतपणे म्हणाली
“सगळेजणं आता शांतपणे जेवा. जेवणाच्या टेबलावर वादावादी करू नका. अन्नपूर्णा देवीला ते सहन होत नाही आणि जेवणापूर्वी ‘वदनी कवळ घेता’ हे म्हणायची शिस्त सगळ्यांना लागू आहे. कळलं का सिद्धार्थ?”
आजी सिद्धार्थकडे बघून म्हणाली.
सिद्धार्थ ने मान डोलावली.
आज जेवणाच्या टेबलावर खूपच शांतता होती.सुई पडली जमीनीवर तरी तिचा आवाज येईल इतकी शांतता होती.
एकदाची जेवणं आटोपली आणि विनय आपल्या खोलीत गेला आणि सिद्धार्थ काही कामाने बाहेर गेला जातांना वडलांना सांगून गेला.
एकदाची जेवणं आटोपली आणि विनय आपल्या खोलीत गेला आणि सिद्धार्थ काही कामाने बाहेर गेला जातांना वडलांना सांगून गेला.
आजी जरावेळ पाळण्यावर बसली.सुमन आणि विनयची बायको क्षमा दोघी मागचं आवरत होत्या.अनंत आरामखुर्चीत शांतपणे डोळे मिटून बसले होते.डोक्यात त्यांच्या विचारांनी धुमाकूळ घातला होता.त्यांना असं शांत बघून आजी म्हणाली,
“ अनंता कसला विचार करतोस?”
“ काही नाही ग .सहज डोळे मिटून बसलोय.”
“ अनंता मी तुझी आई आहे हे विसरू नकोस.वयोमानाने माझे डोळे जरा कमजोर झालेत पण मनाचे डोळे अजूनही सक्षम आहेत. सांग बरं कसला विचार करतोय?”
“ सुमनचं हे शिस्त प्रकरण कुठपर्यंत चालणार आहे हे कळत नाही. ऊद्या या शिस्तीला कंटाळू विनय आणि सिद्धार्थ हे घर सोडतील का अशी भीती मला वाटते.”
“ असं काही होणार नाही.आपला विनय खूप समजुतदार आहे.तो सिद्धार्थ ला समजावेंल. सिद्धार्थ जरा लहान आहे करतो गडबड. पण अनंता तू काळजी करू नकोस. होईल सगळं नीट”
“हमम” अनंत असं नुसतं म्हणाला.आजीनी जपमाळ जपायला सुरुवात केली.
—------
त्या रात्री सगळे झोपले, पण सुमनला झोप येईना कारण सिद्धार्थ अजून घरी आला नव्हता. सिद्धार्थ इतक्या रात्री बाहेर गेला आहे हे तिला माहीत नव्हतं.याचा तिला राग आला होता. एवढ्या रात्री कसलं काय असतं? सिद्धार्थ अनंताला सांगून गेला होता पण सुमनला सांगीतलं नाही हे तिच्या रागाचं कारण होतं. खिडकीतून बाहेर पाहत ती विचारात पडली होती—
—------
त्या रात्री सगळे झोपले, पण सुमनला झोप येईना कारण सिद्धार्थ अजून घरी आला नव्हता. सिद्धार्थ इतक्या रात्री बाहेर गेला आहे हे तिला माहीत नव्हतं.याचा तिला राग आला होता. एवढ्या रात्री कसलं काय असतं? सिद्धार्थ अनंताला सांगून गेला होता पण सुमनला सांगीतलं नाही हे तिच्या रागाचं कारण होतं. खिडकीतून बाहेर पाहत ती विचारात पडली होती—
“सिद्धार्थ रोज नवे बहाणे काढतोय. उद्या काय होईल कोण जाणे. घराची शिस्त टिकवणं माझं कर्तव्य आहे. जर मीच सैल सोडली, तर या घराचं काय होईल?”
घड्याळाच्या काट्यांनी ११ वाजलेले दाखवले. अजून सिद्धार्थ घरी आला नव्हता.
दार ठोठावल्याचा आवाज आला. तशी सुमन घाईने अंगणात गेली. सिद्धार्थ थकलेल्या चेहऱ्याने आत आला. कपड्यांवर धूळ होती, डोळ्यांत काळजी होती.त्याचा चेहरा विमनस्क झाला होता पण सुमनला सिद्धार्थ मधील हे बदल जाणवले नाही.
सुमन अजूनही तिच्या शिस्तीच्या कलमांवरच अडली होती. सुमनने रागाने विचारलं ,
“सिद्धार्थ हे काय? घड्याळात किती वाजले बघीतले?अकरा वाजता घरी येतोस? ही काय वेळ झाली घरी येण्याची?कुठे होतास?”
सिद्धार्थ काही बोलणार इतक्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज आला. तो बघून सिद्धार्थने घाईने मोबाईल खिशात टाकला.
सुमनने संशयाने विचारलं,
“तो मेसेज कोणाचा होता? काय लपवतोयस माझ्यापासून?”
सिद्धार्थ नजरेला नजर देऊ शकला नाही. हलक्या आवाजात म्हणाला—
“आई, योग्य वेळ आली की सगळं सांगेन. पण आत्ताच काही विचारू नकोस.”
“आई, योग्य वेळ आली की सगळं सांगेन. पण आत्ताच काही विचारू नकोस.”
सुमन हादरली. तिच्या मनात शंकेचं वादळ उसळलं—
“सिद्धार्थ तू नक्की कुठल्या गोष्टीत गुंतलाय? भलत्या मार्गाला नाही नं लागलास? काय ते स्पष्ट आत्ताच सांग. लोकांकडून मला कळायला नको.”
“सिद्धार्थ तू नक्की कुठल्या गोष्टीत गुंतलाय? भलत्या मार्गाला नाही नं लागलास? काय ते स्पष्ट आत्ताच सांग. लोकांकडून मला कळायला नको.”
“ अगं आई काहीतरी काय बोलतेस?”
सिद्धार्थ चिडूनच म्हणाला.
सिद्धार्थ चिडूनच म्हणाला.
“ काहीतरी नाही बोलत. तुझं वागणच संशयास्पद आहे. आत्ता कोणाचा मेसेज आला? का घाईने मोबाईल खिशात टाकलास?”
“ आई सगळे मेसेज तुला सांगणार आहे का? “
“ का? कर ना ही त्याला डर कसली?”
सुमनने चिडून म्हटले. हे ऐकताच सिद्धार्थ ने कपाळावर हात मारला.
“तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही”
सिद्धार्थ म्हणाला यावर सुमन रागाने उसळली आणि चड्या आवाजात म्हणाली,
“माझ्याशी बोलण्यात अर्थ नाही म्हणजे काय म्हणतोयस? मी काय उगीचच तुला विचारते का ? माझ्यासमोर तू मोबाईलवर मेसेज पाहून पटकन खिशात टाकलास आणि तडक खोलीकडे निघाला म्हणून मी विचारते शंका आली म्हणून विचारते “
“अग आई कामाचेही मेसेज असतात ते कुठे सगळे तुला दाखवणार ? तुला त्यातलं काय कळणार आहे ? नवीन नवीन काम आहे बरेच काही काही मेसेज येत असतात त्या सगळ्यांनाच उत्तर देता येतात असं नाही उगीचच पराचा कावळा करू नकोस मला झोप आली जाऊ दे आता “
सिद्धार्थने राग रागातच पायातले बूट काढले आणि आपल्या खोलीत जायला निघाला तेव्हा सुमन म्हणाली,
“ झोप येत होती तर रात्रीचे किती वाजले हे बघता नाही आलं? का तुझ्याजवळ घड्याळच नाहीये ?नसेल तर तुला घड्याळ आणून देते म्हणजे मग कळेल तुला घरी किती वाजता यायचं.
सुमनच्या या वाक्यावर सिद्धार्थ आणखीन कातावला तो म्हणाला,
सुमनच्या या वाक्यावर सिद्धार्थ आणखीन कातावला तो म्हणाला,
“आई जरा बस कर ग. आता झोपायची वेळ झाली मला जाऊ दे झोपायला.”
आणि तो सुमन कडे न बघताच आपल्या खोलीत निघून गेला.
सुमनचा चेहरा मात्र अजूनही रागाने ताठरलेला होता पण काय करणार तिच्या डोक्यातला शंकेच्या भुंगा तिला स्वस्त बसू देत नव्हता. काय मेसेज असेल सिद्धार्थ मोबाईलवर आलेला? हा विचार करत सुमन खोलीत गेली.
सुमन खोलीत झोपायला गेली खरं पण तिच्या डोळ्यात झोप येतच नव्हती. काय झालं होतं ? ती सिद्धार्थच्या वागण्यामुळे खूपच हैराण झालेली होती. त्याच्या वागण्याचा अर्थ काय लावायचा ?हा असा तुटक का वागतो? घरात सगळं सांगत का नाही? याच एका चिंतेत ती होती. पलीकडे अनंत मात्र शांत झोपले होते कारण त्यांना मगाशी आईशी बोलून फार बरं वाटलं होतं आणि त्यांना झोपही लवकर लागली.
सुमन मात्र अर्ध्याहून जास्त रात्र जागीच होती. आणि सारखा एकच विचार तिच्या डोक्यात फिरत होता. कोणता मेसेज असेल सिद्धार्थच्या मोबाईलवर? कोणी केला असेल मेसेज? विचार करता करता सुमनच्या डोळ्यात पाणी आलं.
तिला सिद्धार्थ लहान असतानाचे दिवस आठवले. सिद्धार्थ तिच्या शब्दाबाहेर नव्हता. तिला सगळं सांगायचा. भांडण झालं तरी, कोणाशी मैत्री झाली तरी, कोणाशी तो खोटं बोलला तरी अगदी सगळं सांगायचा. आताच काय झालं? इतका सिद्धार्थ मोठा झाला का ! की माझ्यापासून काही गोष्टी तो लपवतोय आणि मला त्याचा त्रास होतो हे त्याला कळतच नाहीये. काय झालं असेल?
नेमकं त्याच्या आयुष्यात काय चाललंय? हे मला कसं कळेल?
यांचं वागणं तर वेगळंच असतं. ते म्हणजे साने गुरुजींचा अवतार आहे.ते कधी इतका त्रास करून घेत नाही पण मी आई आहे ना! मला त्याचा त्रास होतो.
मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो हे मी कुणाला सांगू ?नवऱ्याला सांगायला जाऊ तर तो शांतपणे म्हणतो ,
मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो हे मी कुणाला सांगू ?नवऱ्याला सांगायला जाऊ तर तो शांतपणे म्हणतो ,
“जास्त विचार करू नकोस.त्रास होईल.जास्त काही होईल तेव्हा पाहूया. मुलं आता मोठी झाली.”
मुलं मोठी झाली म्हणजे इतकी शहाणी झाली का? की आई-वडिलांनी काहीही विचारायचं नाही आणि त्यांना सांगायचं पण नाही. सुमनचं डोकं विचारांनी गरगरू लागलं पण काय करणार? तिच्याशी तिला स्वतःलाच बोलावं लागत होतं आणि स्वतःच मन हलकं करावा लागत होतं कधीतरी विचार करता करता सुमनचा डोळा लागला.
डोळे मिटतानाही तिच्या मनात सिद्धार्थच्या मोबाईलवर कोणाचा मेसेज आला असेल हाच विचार चालू होता.
—-------------------------------------
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा