आता शिवानी ने गाडी मिराशी सरांच्या ऑफिस कडे घ्यायला लावली . ऍडव्होकेट संजय मिराशी . कोर्टातील एक गाजलेलं नाव .वयवर्षे पन्नास च्या पुढे , गोरा वर्ण . पुढं आलेलं पोट आणि टक्कल पडत आलेलं . अगदी समोर जरी गुन्हेगाराने खून केला , तरी त्याला निर्दोष सोडवण्याची हिम्मत असणारे एक भयंकर हुशार पण भ्रष्ट वकील . जुहू ला त्यांच्या आलिशान ऑफिस मध्ये ते बसले होते . भेटायला येणाऱ्या बऱ्याच जणांकडून ते केस स्स्वीकारून त्याच्या बदल्यात हवी ती रक्कम घेत होते . पण त्यांची फी इतकी असायची , कि सर्वसामान्य लोक तिकडं जायचेच नाहीत . पण मोठमोठे श्रीमंत व्यापारी , जागा खाली करून घेण्यासाठी दादागियर करणारे बिल्डर आणि भ्रष्ट नेते यांची मात्र त्यांच्याकडे रेलचेल असायची . कारण त्यांनी केस घेतली कि गुनेगार निर्दोष सुटलाच , असं समजायचं . मग खऱ्या गुन्हेगारांना सहज सोडणवणरे मिराशी , निर्दोष अमृता ला का सोडवू शकले नाहीत , हे एक कोड होत . आता शिवानी त्यांच्या ऑफिस ला पोहोचली आणि रिसेप्शन ला ती विचारू लागली .
शिवानी - " मिराशी सर आहेत ?"
रिसेप्शन - " हो . आपण कोण ?"
शिवानी - " शिवानी देशमुख . " यावर रिसेप्शनिस्ट डायरी चेक करू लागते .
रिसेप्शनिस्ट - " मॅडम , तुमची अपॉइंटमेंट नाहीये . '
शिवानी - " हो . कारण मी अपॉइंटमेंट घेतलीच न्हवती . "
रिसेप्शनिस्ट - " अपॉइंटमेंट न घेता व्हिसिट चार्जेस १५०० /- आहेत . "
शिवानी - " ठीक आहे . असं म्हणत टाय पाचशे च्या तिन नोटा काउंट ला दिल्या . तस रिसेप्शन ने केबिन मध्ये फोन लावला आणि शिवानी भेटायला आल्याचं सांगितलं . लगेचच तिला आत बोलावण्यात आलं. कारण काहीही कुरकुर न करता फक्त व्हिजिट १५०० /- देणारी व्यक्ती कोणी सामान्य नाही हे मिराशीच्या अनुभवी नजरेने अचूक घेरले होते . शिवाय आत जाताच मिराशी नि तीच स्वागत केलं .
मिराशी - " या मॅडम या . "
शिवानी - " थँक्स "
मिराशी - " बोला , काय केस आहे . "
शिवानी - " मर्डर ची केस आहे . " क्षणभर मिराशी विचारत पडले .
मिराशी - " मर्डर ? खरंच मर्डर केलाय का ?"
शिवानी - " नाही . पण मुद्दाम फसवलं गेलाय आणि पोलिसांनी टॉर्चर करून गुन्हा काबुल करवून घेतला आहे अशिलाकडून ."
मिराशी - " हरकत नाही . आधी निकालावर स्टे आणूया . केस नव्याने उभी राहील . मग ती लढता येईल . पण फी जास्त होईल . "
शिवानी - " वन टाइम पेमेंट " असं म्हणत तिने आपलं चेकबुक काढलं . यावर मिराशी खुश झाले . कारण हप्त्यात फी त्यांना पण नको होती . आणि फी न विचारता पहिल्याच भेटीत वने टाइम पेमेंट करण्याची तयारी दाखवणारी व्यक्ती , कोणी साधी नसणार, त्यामुळे आता फी वाढवून जरी मागितली तरीही मिळणार याची त्यांना खात्री होती .
मिराशी - " दोन लाख रुपये . "
शिवानी - " ठीक आहे . "
मिराशी - " मग काहीच अडचण नाही . अगदी फाशीची शिक्षा झाली असली , तरी मी त्याना सोडवून आणेन . नाव काय आहे म्हणालात त्यांचं . ?"
शिवानी - इन्स्पेक्टर अमृता भोसले . " थंडपणे अमृता म्हणाली , तशी मिराशींच्या घशाला कोरड पडली .
ए सी चालू असूनही अंगाला घाम सुटला .
मिराशी - " आय एम सॉरी . मी हा केस घेऊ शकत नाही . "
शिवानी - " का ? तुम्ही तर गुन्हेगारांना पण निर्दोष सोडवता . पण एका निर्दोष मुलीला तुम्ही का नाही सोडवू शकत ? आणि मी तुम्हाला हवी तितकी फी द्यायला तयार आहे , "
मिराशी - " प्रश्न फी चा नाही . पोलीस असुंन ती असं कस वागली याचा आहे . "
शिवानी - " तुम्ही कधीपासून इतके तत्वनिष्ठ झालात सर ? आजपर्यंत तीनशे साठ गुन्हेगारांना तुम्ही सोडवलं आहे . आणि एका निर्दोष व्यक्तीची केस तुम्ही घेऊ शकत नाही . कि खऱ्याच्या बाजूने तुम्हाला लढायचंच नाही . ?"
मिराशी - " मला त्या केस मध्ये इंटरेस्ट नाहीये , "
शिवानी - " मिराशी सर , हि एमकेव केस अशी आहे जिथं तुम्ही अपयशी ठरलात . साधा जामीन मिळवू शकला नाहीत तुम्ही , ? का ? "
मिराशी - " त्या केस बद्दल तुम्हाला तर माहीतच असेल . जामीन मिळणं अशक्य आहे . "
शिवानी - " तिला जामीन मिळाला आहे आणि सध्या ती हॉस्पिटल मध्ये उपचार घेते आहे . "
मिराशी - " जामीन मिळाला ? कोण जीवववर इतका उदार झाला आहे ?"
शिवानी - " मी . ऍडव्होकेट शिवानी देशमुख . " यावर आश्चर्याने मिराशी तिच्याकडे बघत राहिले .
मिराशी - " तुम्ही वकील आहेत ? मग माझ्याकडे का आलात ?"
शिवानी - " कारण मला हे जाणून घ्यायचं आहे तुमच्या सारखा वकील असूनही तिला जामीन का मिळाला न्हवता . "
मिराशी - " कारण ..... जितके पैसे मला केस लढायचे मिळाले होते . त्याच्या दुप्पट पैसे मला केस न घेण्याचे मिळाले होते . "
शिवानी - " कोणी दिले होते पैसे ? खंडागळे ?"
मिराशी - " सॉरी . नाव मी सांगू शकत नाही . "
शिवानी - " सांगावं लागेल . कारण माझ्या मोबाईलवर कॉल सुरु आहे आणि तो रेकॉर्डेड आहे . "
मिराशी - " पण माझ्या केबिन मध्ये येताना मोबाईल काउंटर ला जमा करावा लागतो . तुम्हाला सांगितलं नाही का ? " असं म्हणत ते रिसेप्शन ला बोलावतात . पण रिसेप्शनिस्ट शिवानी चा मोबाईल आपल्याकडे जमा असल्याचं सांगते . यावर शिवानी हसते .
शिवानी - " माणसाने एकच मोबाईल वापरायाल पाहिजे असा काही कायदा आहे का साहेब ?" . आता मिराशीमच्या डोक्यात प्रकाश पडतो .
मिराशी - " म्हणजे तुम्ही ..... तुम्ही .... "
शिवानी - " हो .ट्रॅप केलंय तुम्हाला . पण माझा इलाज न्हवता . अमृता निर्दोष आहे हे मला सिद्ध करायचं आहे . आणि तिची केस पहिल्यांदा तुम्ही घेतली होती . आता मला त्यासंदर्भात सगळी माहिती हवी आहे , आणि तुम्हाला ती द्यावी लागेल . "
मिराशी - " सांगतो. अमृता ची केस घेऊन तिचा मित्र निखिल आला होता . माझी सगळी फी द्यायला सुद्धा तो तयार झाला होता . खरं तर मी त्याला चांगल ओळखतो . तो बिल्डर असल्यामुळे त्याच्या जागेची बरीचशी काम मी केली आहेत , तो मला अमृता बद्दल सगळं सांगून गेला . मी सुद्धा तिची केस हातात घ्यायचं ठरवलं . पण त्याच वेळी मला धमक्यांचे फोन येऊ लागले . केस सोडा . निखिल ने ठरवाल्यापेक्षा दुप्पट पैसे देतो . आणि केस सोडली नाहीत , तर माझ्या आणि माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात असेल . मग काय करणार मी . मी त्यांच्याकडून पैसे स्वीकारले . "
शिवानी - " पैसे अकाउंट ला ट्रान्सफर झाले ?"
मिराशी - " इतके मूर्ख वाटले का ते ? त्यांचा माणूस येऊन कॅश देऊन गेला होता . "
शिवानी - "सी सी टी वी फुटेज ?"
मिराशी - " एका महिन्या पेक्षा जास्त बॅक अप नाही . "
शिवानी - " हरकत नाही . येते मी . कोर्टात भेट होईलच आता आपली . "
मिराशी - " कोर्टात ?"
शिवानी - " अर्थात . आता मी अमृताच्या बाजूने लढणार आहे . मग माझ्या विरोधात अमृताची केस लढयाला तुमच्याशिवाय दुसरा कोण वकील आहे . ते नक्कीच तुम्हाला हायर करतील . " असं म्हणत अमृता तिथून बाहेर पडली आणि तानाजी ना आता घर निघायला सांगितलं .
ताणें पोलीस स्टेशन ला अभय काम करत असतानाच त्याला त्याच्या बदली च्या ऑर्डर मिळतात . ठाणे सोडून आता त्याला चंद्रपूर ला जावं लागणार असत . तो घाबरून खंडागळे ना फोन करतो .
खंडागळे - " बोल अभय . "
अभय - " साहेब , का मागे लागला आहात गरीबाच्या . "
खंडागळे - " काय झालं आहे नीट सांगतो का आता ?"
अभय - " साहेब माझी बदली केली आहे चंद्रपूर ला . आणि माझ्या जागी अनिकेत जेधे येणार आहे . एन्काऊंटर स्पेशालिस्ट . "
खंडागळे - अरे अरे , असं होऊन उपयोगाचं नाही . तो अनिकेत म्हणजे आमच्यासाठी यम आहे यम, . नका काळजी करू मी बघतो ." असं म्हणतखंडागळे फोन ठेवतात आणि अभय ची बदली आडवण्यासाटःई प्रयत्न सूर करतात . पण सूत्र वरून हालली असल्यामुळे त्यांना काहीही करता येत नाही . अखेर अनिकेत ठाणे पोलीस स्टेशन ला येणार हे पक्के होत .
अनिकेत आल्यावर युवराज आणि खंडागळे चे गुन्हे सिद्ध होतील का ? पूजा युवराज विरुद्ध पुरावे मिळवण्यात यशस्वी होईल का ?मिराशी शिवानी च्या विरोधात मृत ची केस काढतील का ?हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा .

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा