Login

शिवकाव्य कौस्तुभ -भाग १८

Shivkavya Kaustubh Part 18
मागील भागात..
शहाजीराजांना दग्याने कैद केले गेले. ही बातमी राजगडावर आल्यावर, गडावर जीव घेणी शांतता पसरली. जिजाऊ चे सौभाग्यच जणू हातात पकडले होते. कुंकवावरच हा घाव घालण्याचा बेत होता. जिजाऊंच्या आणि शिवबाच्या काळजावरच जणू हे घाव घातले होते. मागचा सगळा इतिहास आठवून दोघांनाही धसका बसला होता. काय घडेल? काहीच अंदाज येत नव्हता

कैद झालेल्या शहाजीराजांना आणण्यासाठी, अफजल खान याची नेमणूक झाली होती. आणि अफजलखानाने या अवस्थेतही त्यांची धींडच काढली होती.
शहाजीराजे व त्यांचे चिरंजीव, म्हणजे संभाजी राजे आणि शिवाजी राजे या पिता-पुत्रा विरोधात विजापूर च्या दरबारी,चांगलीच खलबतं शिजलेली होती.

फत्तेखान पुण्यावर चालुन येत होता.त्यालाहि थोपवणे गरजेचे होते.
प्रथम यास प्राधान्य द्यावे. असे सुनिश्चित झाले.
पण तरीही शिवाजी महाराज यांना काहीतरी वेगळं हवं होतं ..!

वेगळं काय?? तर सह्यागिरीतील महामंत्र म्हणजेच 'गनिमी कावा'होय.
ठरले तर.. या मंत्राप्रमाणेच कार्य करायचे.
आणि तशी मग तशीच सुरूवात केली.
कशी?ती या पुढील काव्यात गुंफलेली आहे..

*गनिमी कावा*

घेऊनी मंत्र 'गनिमी कावा' केली तयारी मनाची।।
युक्तीचा टाकुनी डाव, करविली सुटका पित्याची।।धृ।।

सरळ युद्ध करता, मावळे आहेत थोडे,
होताच हल्ला तग धरणार नाही घोडे,
म्हणून युद्धाशिवाय जिंकावी नीती बादशहाची।।
युक्तीचा टाकून डाव करविली सुटका पित्याची।।१।।

गाठुनी फत्ते खानास पुरंदर गडापाशी,
दगडांचे करून वार पळविले सैन्याशी, किल्ल्यावर लाविली पताका आपल्या विजयाची।।
युक्तीचा टाकून डाव करविली सुटका पित्याची।।२।।

मैत्रीचे बंध बांधूनी दिल्ली दरबारी,
आणूनी दडपण मोगलांचे विजापुरी,
टाकुनी असे जाळे,
झोप उडवलीआदिलशाहीची।।
युक्तीचा टाकून डाव करविली सुटका पित्याची।।१।।

घेऊनी माघार, केली सुटका शहाजीची,
एका शूरवीर धुरंदर सरदाराची,
वटपौर्णिमा त्यादिवशी
जणू सावित्रीच्या सत्यवानाची।।
युक्तीचा टाकून डाव करविली सुटका पित्याची।।३।।