Login

शांता आणी बोलक्या भाज्या

शांता आणी भाज्याची मस्ती
शांता आणी बोलक्या भाज्या.

शांता सकाळी पिशवी घेऊन बाजारात पोचली.
सगळीकडे गजबज  कुणी कोथिंबीर तोलतंय, कुणी टमाटे उचलून बघतंय, तर कुणी मोलभाव करतंय.

शांता इकडे-तिकडे बघते.
"काय घेऊ… सगळीकडे इतक्या भाज्या आहेत की डोकंच फिरतंय!"  शांता मनात म्हणते.

अचानक शेपू पिशवीतून मान बाहेर काढून हळू आवाजात म्हणालं,
"मला घे ग बाई… माझी मस्त भाजी कर. शेपू म्हणजे आरोग्याचं भांडार!"  शेपू म्हणते.

शांता थबकली.
"अगं… कोण बोललं?"
आजूबाजूला बघते,  कुणीच नाही.

इतक्यात बटाटा गोलगोल डुलवत म्हणतो,
"मला घे! मस्त वडापाव बनव. पाऊस पण पडतोय, भारी लागेल!"

शांता गोंधळून गेली.
"हं? बटाटा बोलतोय? माझं डोकं फिरलं की काय?" शांता म्हणते.

तेवढ्यात जाड हिरव्या मिरच्या डावीकडून हसत म्हणाल्या,
"अगं, बटाटा घेतोस तर मला पण घे! वडापावसोबत मस्त तळून खा, तोंडाला झणझणीत चव येईल!"  मिरची म्हणते.

आता शांता बिचारी कुणाचं ऐकेल?
कोथिंबीर उड्या मारत म्हणाली,
"अगं, मला विसरू नकोस! बटाट्याच्या भाजीवर मी गेली की काय सुगंध येते!"  ती  म्हणते.

आणि शेवटी कढीपत्ता हातातल्या देठातून लहरत म्हणतो –
"मला फोडणीत टाकलंस की स्वयंपाकघर सुगंधाने भरून जातं. मला घे ग!"

शांता   पिशवीत बटाटा, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, शेपू सगळं कोंबते…
आणि मनात म्हणते
"अगं, हा बाजार तर बोलका आहे, पण घरी गेल्यावर सगळे शांत बसले पाहिजेत… नाहीतर कुकरमध्ये भांडणं सुरू होतील!"  शांता  हसत म्हणते.  घरी   निघून जाते.


शांता बाजारातून घरी आली.
पिशवीतल्या भाज्या उड्या मारत होत्या.
"अगं, हळू चाल बाई… गडबड झाली तर साली निघून पडतील!" बटाटा कुरकुरला.

शांता त्रासून,  "गप्प बसा सगळे! आता शांत बसा, मी भाजी करणार आहे."   शांता  म्हणते.

पण कुणी ऐकणार?
मिरच्या "अगं, मला आधी धुऊन तळ! वडापावची वेळ झालीये."  ती म्हणते.

शेपू, "नाही! आधी माझी भाजी! बघ किती टवटवीत आहे मी."  शेपू म्हणते.

कोथिंबीर  "सगळ्यात शेवटी मी टाकायची, पण तरीही माझं महत्त्व सर्वात जास्त आहे बरं का!"  ती  म्हणते.

शांता गॅस पेटवते, कढई गरम होते…
कढीपत्ता आवाज काढतो  "आता माझी एन्ट्री! टाक मला फोडणीत, सगळीकडे वास पसरू दे." तो  म्हणतो.

तेवढ्यात… कुकरमधून आवाज   "पाणी कमी टाकलंस तर मी शिटी वाजवणार नाही!", डाळ चिडली.

शांता थक्क   "अगं, आता डाळही बोलतेय! हे काय भूतबाधा आहे का?"  शांता  मनात  बोलते.

स्वयंपाकघरात सगळे आवाज, भाज्या, डाळ, मसाले…
आणि बाहेरून शेजारी ओरडले,
"शांते, इतके लोक आलेत का घरी? एवढा गोंधळ का?"

शांता हसत उत्तर देते,
"लोक नाही रे, भाजी मंडळाची मिटिंग चालू आहे!" 


बाजारातील आणि स्वयंपाकघरातील गोंधळानंतर शांता बसली जेवायला.
पण घास तोंडात टाकते तोच पोळी बोलली
"अगं, मला नीट तुपात बुडवून खा! असं कोरडं खाल्लंस तर माझा अपमान आहे."

  "मी इतकी मेहनत घेऊन तयार झालेय, मला आधी खा!"  भाजी म्हणते 

चटणी पण मध्ये उडी,  "अरेरे, तुम्ही भाजी-भाजी करताय, पण खरा रंग तर माझ्यामुळे येतो जेवणाला!"  चटणी  म्हणते.

शांता डोकं धरते  "देवा, आता थाळीतली भाजीसुद्धा बोलायला लागली!" शांता  म्हणते.

इतक्यात घराचा दरवाजा उघडतो आणि    शेजारची  मालती आत डोकावते,
"शांते, कुणाशी गप्पा मारतेस? मी तर बाहेरून सगळं ऐकल ती म्हणते.


"अगं, काही नाही… हे बघ, आज माझं जेवण स्वतःचं जाहिरात करतंय!" शांता  म्हणते.

मालतीला मजा वाटते. दुसऱ्या दिवशी ती पण बाजारातून भाज्या आणते…
आणि मग काय – मालतीच्या घरातूनही आवाज यायला लागतात.
संपूर्ण वाड्यात चर्चा,
"या आठवड्यात बाजारातल्या भाज्यांना गप्पांचा व्हायरस   व्हायला लागल्या !"

शांता, मालती आणि वाड्यातील सगळ्यांकडे आता बोलक्या भाज्या होत्या.
गप्पा, भांडणं, रेसिपी,  सगळं स्वतःच ठरवत होत्या त्या.  बायकांना  काही त्रास  नव्हता.

एके दिवशी वाड्याचा सरपंच आले,   "अहो, इतका गोंधळ लावणार असाल तर या भाज्यांचा उपयोग करून काहीतरी करूया!"    ते  म्हणाले.

मग ठरलं – “भाजी स्पर्धा”!
संपूर्ण वाडा जमला, स्टेज सजवलं, भाज्यांना माळा घातल्या.

सर्वात आधी टोमॅटो आला स्टेजवर. गोल गोल नाचत म्हणाला –
"माझ्याशिवाय सूप, भाजी, सॉस – काहीच होत नाही. मीच हिरो!"
सगळे टाळ्या वाजवतात.

मग बटाटा आला,
"माझ्याशिवाय लोकांना पोटभर जेवण मिळेल का? मी बहुगुणी आहे – वडापाव, फ्रेंच फ्राईज, भाजी…"   तो  गर्वाने म्हणाला 

मिरच्या झणझणीत पद्धतीने,  "मी नाही तर जेवण फिकी! मी टाकले की तोंड सुन्न!"  ती  म्हणते.

शेपू डुलत, "मी आरोग्याचा राजा, पण मला लोक टाळतात. तरीही मी हट्टाने प्लेटवर पोहोचतो!"  शेपू  म्हणतो.

शेवटी कोथिंबीर आली, हात वर करून,  "तुम्ही सगळे जेवण तयार करतात, पण माझ्याशिवाय त्याला ‘फिनिशिंग टच’च मिळत नाही!"  ती  म्हणते.

संपूर्ण वाडा हसून लोटपोट!
शेवटी बक्षीस? – सगळ्या भाज्यांना मिळालं एकच मोठं भांडं… आणि त्यात सगळ्यांनी मिळून ‘मिश्रभाजी’ बनवली!



तुम्हांला  बोलक्या  भाज्या आवडल्या असतील तर,  लाईक आणी कमेंट करा.