Login

शोध सत्याचा भाग-१

कोण असेल तो खुनी ? ती आणू शकेल का खुनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर? जाणून घेण्यासाठी वाचा शोध सत्याचा..

ग्रीन वूड बिल्डिंग , दिल्ली.


आज परत ' ग्रीन वूड ' बिल्डिंगमध्ये एक खून झालेला.

एका फ्लॅटमध्ये एका बाईला खूपच वाईट पद्धतीने मारले होते. तिच्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचे विचित्र लाल डाग दिसत होते. तसेच हाता-पायावर पण डाग दिसत होते, कसले होते कोणालाच समजत नव्हते. त्या डागामुळे मृत्यू होत होता हे समजल होत.


वैज्ञानिक त्या डागाचा शोध घेत होते , पण त्यांच्या हातात काहीच लागत नव्हते.

असेच कोणी ना कोणी ग्रीन वूड बिल्डिंगमध्ये दर महिन्याला त्या लाल विचित्र डागामुळे  एक खून होत होता आणि यामागे एकच कोणी तरी होत ते हे सर्व करत होता. त्याला काय पाहिजे होत. अजूनपर्यंत कोणालाच समजत नव्हतं , बिल्डिंगमधली राहणारी लोकं पण यामुळे वैतागलेली , काही जण घाबरलेली , काही जण ही बिल्डिंग सोडून जायचं म्हणत होते.


पण त्यांना जाता येत नव्हत कारण पोलिसांचं म्हणणं होतं की या खूनाच्या मागे याच बिल्डिंगमधले कोणी एक जण आहे , ते शोधण्याचा खूप प्रयत्न करत होते पण खून करणारा एकही पुरावा न सोडता एकदम चालाखीने त्याने मारल होत.


जिथे खून झाला तो फ्लॅट शिंदे कुटुंबाचा होता , त्यात नवरा बायको राहायचे. नवरा आपल्या कामाला निघून गेलेला. तो जाताच ठीक चार तासाने हा खून झाला होता. खून करणारा घरी कोणी एकटेच असले तरच तो येत असतो हे समजलेलं. म्हणून त्या बिल्डिंग मध्ये कोणी एकट राहत नसे. एकट असेल तर तो ही बाहेर निघून जातो जोपर्यंत कोणी सोबत नसेल तोपर्यंत.


सगळी तपासणी करून झाल्यावर,

पोलीस " डॉक्टर , ते डाग कसले आहेत काही समजलं का ? "

डॉक्टर " नाही, आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. अगोदरच्या खूनामध्ये पण असचं झालं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये एकच खुनी आहे."


पोलीस " हो मलाही तेच वाटतंय , पण नक्की याला पाहिजे तरी काय ? सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या आहेत. यावरून वाटत आहे की मिस शिंदे आपला जीव वाचण्यासाठी पळत होत्या. दागिन्यांसाठी तर हे खून नाही, कारण दागिने आणि पैसे जागेवरच आहेत. नक्की समजत नाही की हा खून का करत आहे ?"


डॉक्टर " खून करणाऱ्याला लवकरात लवकर पकडाव लागेल. हे असच चालू राहील तर आणखी माहीत नाही किती जणांचा बळी जाईल."


पोलीस " हो, खून केलेल्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बस, त्याच्याविरुद्ध पुरावा मिळाला तर त्याला लवकरात लवकर पकडता येईल. "


पोलीस आणि डॉक्टर बोलून पुढच्या कामाला लागतात.



सायन्स कॉलेज , दिल्ली.


कॉलेजमध्ये एके ठिकाणी तीन - चार मुले एका मुलीला छेडत होते.


पहिला मुलगा तिचा हात पकडुन, " हाय मेरी जान , आज रूम पर आना हा में तेरा इंतजार कर रहा हुं."


दुसरा मुलगा पहिल्या मुलाला जोरात हसत " अरे रूम पर क्यूं बुला रहे हो , मेहल मे बुलाओ वहां मज़ा आयेगा. काय आयटम चालेल ना तुला."

ती मुलगी रडत त्यांना विनवणी करत " प्लीज मला जाऊ द्या सोडा मला."

तिसरा मुलगा " नाही अस कस आमची भूक तरी मिटवून जा , हो ना रे संकेत."


संकेत त्या तीन मुलांचा लीडर " हो तू बरोबर बोलत आहेस , ( त्या मुलीकडे घाणेरड्या नजरेने बघत.) आमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय तू जावू शकत नाही."


या मुलांचं छेडणं चालू असताना बाजूला काही अंतरावर असलेल्या विश्वाला खूपच राग आला.

त्याच्या चेहऱ्यावर ज्वालामुखीचा उद्रेक उफाळून दिसत होता. आणि त्या मुलांच्या अश्या वागण्याने त्याच पूर्ण शरीर आगीने तापत होतं. त्याचा डोळ्यांत इतका राग होता की जणू काही त्याचा डोळ्यांकडे कोणी बघितलं तर तो समोरचा व्यक्ती एका क्षणात तिथेच राख होऊन जाईल अशी त्याची त्या मुलांकडे पाहण्याची नजर होती.


विश्वा हाताच्या मुठी घट्ट आवळून हळू हळू पावले टाकत त्यांच्या कडे जात होता , आणि त्याची नजर त्यांच्यावर तशीच खिळली होती.


तो हळू हळू पावले टाकत त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि संकेतच्या खांद्यावर हात टाकून त्याला घट्ट पकडून.


विश्वा असुरी हसत म्हणाला " हो ना इच्छा पूर्ण केल्याशिवाय नाही जाऊ शकत. " बोलून त्याने त्या मुलीवर नजर टाकली.


संकेत विश्वा मध्येच आल्यामुळे चिडून " हे , तू कोण आहेस रे ? आणि इथे आमच्यात तुझ काय काम ? जा इथून तुझ तू बघ आम्ही आमचं बघतो."


विश्वा " अरे मी तुला मदत करायला आलो आहे , आणि मला का हकलतो आहेस हे बरोबर नाहीये हा. "


संकेत " हे तू जा इथून मला मदत नकोय तुझी. निघ चल."


विश्वा " अरे भावा मी फक्त मदत करतोय तुझी. ती तरी करू दे."


संकेतचा मित्र संजय " अरे संकेत, त्याला मदत करू दे. बघू काय मदत करतो ते."


संकेत विचार करून " ठीक आहे चल कर मग."


त्यांनी होकार दिल्यानंतर विश्वा संकेत समोर येऊन उभा राहतो. आणि खट्याळपणे हसत त्याच्याकडे बघून रागातच जोरदार त्याच्या कानाखाली वाजवतो.


विश्वाने संकेतला कानाखाली मारताना  आवाज इतका भयंकर असतो की सगळीकडे एका सेकंदात शांतता पसरते. आणि सगळे जण त्या जागी थांबून हा नजारा बघत असतात.


संकेतला कानाखाली बसल्यामुळे त्याला आधी काही समजत नाही आणि नंतर समजल्यावर भानावर येत संकेत  जिथे मारल त्या ठिकाणी गालावर हात ठेवून  विश्वाला दात ओठ खात रागाने लालबुंद होऊन बघतो.
विश्वा पण संकेतकडे बघत होता.


संजय , अंकित आणि राज संकेतचे मित्र
संकेतला विश्वाने मारल्यामुळे हे तिघे पण रागात त्याला बघत असतात , आणि दुसऱ्याच क्षणी विश्वाच्या अंगावर धावून येतात.

पण त्या तिघांवर विश्वा खूपच भारी पडतो. त्यांना पण विश्वाने तीन - चार वेळा ठेऊन दिलेली असते. आणि हे तिघे संकेतच्या बाजूला गालावर हात ठेवून विश्वाला बघत असतात.


इकडे संकेत सगळ्यांसमोर त्याचा अपमान झाला म्हणून त्याला अजूनच विश्वाचा राग येतो.


संकेत रागातच विश्वाला " तू माझा असा अपमान करून चांगलं नाही केलं.मला असे मारणे तुला महागात पडेल."


विश्वा हसत " ठीक आहे बघून घेऊ कोण कोणाला महागात पडतो ते."


संकेत " मी कोण आहे हे तुला माहीत आहे का , ऐकशील तर लगेच माझे पाय पकडून माफी मागशील."


विश्वा " तू कोणीही असो मी नाही घाबरत कोणाला. मी फक्त एका मुलीची मदत केली आणि समोरचा चुकीचा असेल तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी. हा विश्वा समोरच्याला चुकीची शिक्षा देताना कोण मोठं आणि कोण छोटं काही बघत नाही समजलं."


विश्वाचे बोलणे ऐकून संकेतला अजूनच राग येतो. " माझा सगळीकडे दरारा आहे. एक एक व्यक्ती मला घाबरतो आणि हा मला ओळखत पण नाही. मी याला सोडणार नाही. बघून घेईन."
असा विचार त्याचा मनात येतो.