संकेत विश्वाला काहीही न बोलता तिथून निघून जातो, कारण आणखी काही केलं तर अजून महागात पडेल.
आणि शत्रूला पुढून नाही पाठून वार करू हा निर्णय घेऊन संकेत आपल्या मित्रांना घेऊन तिथून निघून जातो.
विश्वा पण त्या मुलीची विचारपूस करून आणि काही सूचना देऊन आपल्या गॅंगला भेटायला कॅन्टीनमध्ये निघून जातो.
कॅन्टीनमध्ये,
विश्वाचे मित्र कॅन्टीनमध्ये त्याची वाट बघत बसलेले असतात. तेवढ्यात त्यांना विश्वा येताना दिसतो.
विश्वा त्यांच्याजवळ येताच,
साहिल " काय यार इतक्या उशीरा कोण येतं? आम्ही किती वाट बघायची ? होता कुठे तू ? "
साहिल " काय यार इतक्या उशीरा कोण येतं? आम्ही किती वाट बघायची ? होता कुठे तू ? "
प्रफुल्ल "अरे बोल की पटापट. आता माईक आणून देऊ का तुला ?"
आतिश " अरे आधी तुम्ही दोघं गप्प बसा त्याला बोलू तरी द्या , तुमचं आल्या आल्या काय सुरू ? विश्वा तू बोल का इतका उशीर झाला यायला?"
विश्वा "ठीक आहे सांगतो.आतिश थँक्यू नाहीतर हे कधी गप्प नाही व्हायचे."
साहिल " हा बोल तू काय झालं ते."
विश्वा " ओके सांगतो."
विश्वा त्यांना आतापर्यंत काय झालं आणि त्याने काय केले ते सगळं सांगतो.
विश्वाचं बोलणं ऐकून त्याच्या मित्रांना धक्का बसला. साहिल, प्रफुल्ल आणि आतिश हे तिघे विश्वाचे खूपच जवळचे मित्र.
साहिल " अरे हे खूपच विचित्र आहे यार. बरं झालं विश्वा. तू तिथे वेळेवर पोहोचलास नाही तर माहीत नाही काय झालं असतं त्या मुलीचं."
आतिश " आपला विश्वा आहेच असा मदतीसाठी लगेच धाऊन येतो."
प्रफुल्ल " हो , आय एम प्राउड ऑफ यू विश्वा. तू आमचा मित्र आहेस सो लकी. त्या मुलांची तर चांगली हवा निघाली असेल."
साहिल " हो ना , कदाचित आपण तिकडे असतो त्यांचा चेहरा तरी बघितला असता. विश्वाने मारल्यावर त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल."
प्रफुल्ल " मला तर खूपच हसू येतंय , मी कल्पना करतोय त्यांचा चेहरा त्यावेळी कसा झाला असेल."
विश्वा " सोडा हे , तुम्ही अजून काही मागवलं नाही का ? मला खूप भूक लागली आहे यार. पोटात कावळे ओरडत आहे. लवकर ऑर्डर करा."
प्रफुल्ल " हो हो, आम्ही तुझ्यासाठी थांबलो होतो. म्हणून म्हटलं तू आल्यावर करू ऑर्डर. थांब, मी ऑर्डर देऊन आलोच."
विश्वा " हो लवकर कर."
प्रफुल्ल ऑर्डर देण्यासाठी काउंटरवर गेला आणि ऑर्डर देऊन आपल्या गॅंगमध्ये सामील झाला.
ऑर्डर येईपर्यंत ते गप्पा व मस्ती करत बसले होते.
थोड्यावेळाने ऑर्डर आली तस त्यांनी पटपट खायला सुरुवात केली. त्यांच्या अश्या खाण्यावरून वाटत होतं त्यांना खूपच भूक लागलेली दिसत होती.
खाऊन झाल्यावर त्यांनी दोन लेक्चर अटेंड करून आपापल्या घरी निघून गेले.
विश्वा पटेल त्याच शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न होते. तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याची आकर्षित पर्सनॅलिटी जिमने कमावलेली मेन्टेन बॉडी , ब्लॅक बेल्ट चॅम्पियन , विचाररचना एकदम टॉपर , गोरा रंग , काळे पाणीदार डोळे जे बघता क्षणी कोणालाही प्रेमात पाडण्यासारखे होते.तो म्हणजे जणू कॉलेजमधला हीरो. प्रत्येक मुली त्याच्यावर लट्टू होत्या, पण त्याला कोण काय बघतो, बोलतो नि करतो काहीच फरक पडत नव्हता. आपलं जीवन आनंदाने जगायचं आणि जशी मदत करता येईल तशी मदत तो करायचा.
विश्वाच्या कुटुंबामध्ये त्याचे आई - वडील आणि त्याची लाडकी छोटी बहीण एकत्र राहत होते.
आई शाळेत शिक्षिका तर वडील आपला बिझनेस त्याबरोबर दोन आश्रम पण सांभाळायचे.
त्याचं घर मुंबईमध्ये होत पण तो शिकण्यासाठी दिल्लीला आला होता आणि एका ३ बीएचके फ्लॅटमध्ये राहत होता.
त्याचं घर मुंबईमध्ये होत पण तो शिकण्यासाठी दिल्लीला आला होता आणि एका ३ बीएचके फ्लॅटमध्ये राहत होता.
साहिल , प्रफुल्ल आणि आतिश यांची ओळख अशी की, विश्वा ज्या फ्लॅटमध्ये राहत होता त्याचा आजूबाजूला हे तिघे राहत होते आणि हे तिघेजण दिल्लीतच लहानाचे मोठे झालेले होते.
पहिल्याच भेटीत क्लासरूममध्ये या तिघांची ओळख विश्वासोबत झाली.
हे तिघे विश्वाच्या स्वभावाशी मिळते जुळते होते.
पहिल्याच भेटीत क्लासरूममध्ये या तिघांची ओळख विश्वासोबत झाली.
हे तिघे विश्वाच्या स्वभावाशी मिळते जुळते होते.
संकेत हा खूप वाईट आणि एकदम खालच्या थरातला.
संकेतची आई लहानपणीच त्याला सोडून देवाघरी गेली आणि वडील त्यांची एक कंपनी होती. ज्यात खायच्या गोष्टी बनत आणि त्यामध्ये जबरदस्तीने कामगारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल मिसळवायला सांगत, त्यामुळे जे लोकं यांचा माल विकत घ्यायचे ते सारखे आजारी पडायचे.
या कंपनीच्या आत काय चालू आहे हे कोणालाच माहीत नव्हते आणि त्यांनी कामगारांना पण धमकी देऊन ठेवली होती त्यामुळे कोणी काहीच करू शकत नव्हते.
संकेतचे मित्र पण त्याच्यासारखेच क्रूर स्वभावाचे होते.
ग्रीन वूड बिल्डिंगमध्ये..
वेळ दुपारी १:३० वाजता.
एक मुलगी तिचं कॉलेज संपवून घरी आलेली असते. आल्या आल्या तिची आई तिला आज काय झाल ते सगळ रामायण सांगते.
ती आईचे ऐकून शॉक होते आणि पळतच आपल्या खोलीमध्ये निघून जाते आणि दरवाजा लावून तिथेच बसते.
ती मुलगी घाबरतच " तो... तो... का अस करत आहे. त्याला अस करून काय भेटणार आहे ? लवकरच त्या डागामागचं कारण शोधायला हवं. नाहीतर आधीच मी त्याच्यासमोर आले तर खूप अवघड होईल.आता आई आणि बाबांना नीट सांभाळावं लागेल. माझ्या एका चुकीमुळे त्यांना शिक्षा नको भेटायला."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा