दुसऱ्या दिवशी सकाळी..
११:०० वाजता..
११:०० वाजता..
' ग्रीन वूड ' बिल्डिंगमध्ये गडबड चालू होती. आज शिबीर ठेवण्यात आलेले. त्यात बिल्डींगमधली सगळीच माणसं जमा झालेली. शिबीरमध्ये निहारिका पण होती तेही टेन्शनमध्ये एके ठिकाणी रूनालीची वाट बघत उभी होती. रूनाली अजून आली नव्हती. त्यात शिबीर एक तासाने सुरू होणार होत आणि वेळ पण कमी होता. म्हणून तिला लवकरात लवकर त्या बाटल्या बदलून घ्यायच्या होत्या.
निहारिका टेन्शनमध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत असताना तिला रूनालीचा फोन आला.
ती लगेच फोन उचलून, " हॅलो रूनाली, कुठे आहेस ? किती वेळ ? "
रूनाली " सॉरी निहू. मला यायला उशीर होईल. त्यात बाबा हजार प्रश्न विचारत आहेत. तू एक काम कर . तू पुढे निघून जा. मी येते तुझ्या मागून. "
निहारिका समजून " ठीक आहे. मी जाते पुढे. तू ये मग लवकर. "
बोलून झाल्यावर निहारिका तिथून निघून गेली. ती गेल्यावर तिच्या मागोमाग विश्वा पण गेला.
जिथे बाटल्या बदलण्यात येणार होत्या. ते ठिकाण पाच मिनिटाच्या अंतरावर असल्याने निहारिका तिथे लवकर पोहोचली. त्या ठिकाणी येऊन बघते तर तिथे खूप खोल्या होत्या. तिला कोणत्या खोलीत बाटल्या ठेवण्यात आल्या आहेत हे माहिती नव्हत. त्यामुळे तिला सगळ्या खोल्या तपासाव्या लागणार होत्या. ती वेळ न घालवता एक एक खोली तपासायला सुरुवात करते. तेवढ्यात तिथे विश्वा पण येतो आणि तिला एका खोलीमध्ये जाताना बघतो.
तिला खोलीमध्ये गेलेलं बघून तो पटकन त्या खोलीसमोर येत त्या खोलीचं दार बंद करून कडी लावतो. आणि तिथून निघून जातो. तर इथे दरवाजा लावण्याचा आवाज ऐकून निहारिका पळत दरवाज्याकडे येते. आणि उघडण्याचा प्रयत्न करते तर ते उघडत नाही. ती जोरजोरात ठोठावत आणि मोठ्याने आवाज देत दरवाजा उघडायला सांगत असते. पण तिथे कोणी नसत. तिला आता खूपच टेन्शन येत होत. त्यात लवकरात लवकर बाटल्या बदलून लोकांचा जीव वाचवायचा होता. निहारिका लगेच रूनालीला फोन करणार तर फोनला रेंज नव्हती. ती आता काय करता येईल म्हणून इकडे तिकडे बघून काय भेटत का बघत होती. पण आजूबाजूला अस काहीच नव्हत. ती एक रिकामी खोली होती. त्यात खिडकी खूप उंचावर आणि छोटी होती. आपल्याला काहीच करता येत नाही समजून हताश होऊन रडू लागली.
नंतर शांत होऊन इथून बाहेर कस निघता येईल सतत विचारात असताना अचानक खिडकीतून धूर येऊ लागला. आणि हळू हळू ते धूर खोलीमध्ये पसरत होता. तर इथे त्या धुरामुळे तिची शुद्ध हरपत होती. निहारिका बेशुध्द होण्याच्या मार्गावर आलेली. तरी ती कसबस शुद्ध राहण्याचा प्रयत्न करत होती. पण शेवटी सहन न होऊन ती तिथेच बेशुध्द पडली.
थोड्यावेळाने..
' ग्रीन वूड ' बिल्डिंग..
' ग्रीन वूड ' बिल्डिंग..
सिया , प्रिया आणि विश्वा आणि त्याचे मित्र प्रफुल्ल , आतिश आणि साहिल सगळे गप्पा मारत जिथे शिबीर होत तिथे येत होते. गप्पा मारत येत असताना त्यांना रूनाली टेन्शनमध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत फोनवर काहीतरी करत असताना दिसली. तस ते तिच्याजवळ येतात.
प्रिया " रूनाली , काय झालं ? इतकी टेन्शनमध्ये का आहेस ? "
रूनाली " निहारिका माहीत नाही कुठे आहे ? ती फोन पण उचलत नाहीये."
सिया " अग असेल इथे कुठे तरी. चल शोधू आपण तिला."
सियाच्या बोलण्याला विश्वा सोडून सगळे तिला शोधायला जाणार तर विश्वा त्यांना रोखत " काही गरज नाही तिला शोधण्याची. "
विश्वाच्या अश्या बोलण्यावर रूनाली आणि साहिल सोडून बाकीचे त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतात.
आतिश " म्हणजे? "
विश्वा " तुमच्या माहितीसाठी सांगतो. ती एक गुन्हेगार आहे. हे जे बिल्डिंगमध्ये खून होत आहेत ते ती करत आहे. "
विश्वाच ऐकून प्रफुल्ल रागात " विश्वा काय बोलत आहेस ? तुला तरी समजतंय का?"
विश्वा " मला सगळ समजतंय. ती फक्त भोळे बनण्याचा नाटकं करत आहे. आणि लोकांना फसवत आहे. ती एक गुन्हेगार आहे बस. तिला आता लवकरच मी जेलमध्ये टाकणार आहे. "
विश्वाच ऐकून रूनालीला खूप राग येतो आणि ती रागातच त्याच्या कानाखाली मारते.
रूनाली " तुझ डोकं फिरलय का रे. तू कोणाला गुन्हेगार म्हणत आहेस. अश्या एका निर्दोष व्यक्तीला जे की तिचं व्यक्ती लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. समजतंय का तुला ? "
विश्वा तितक्याच रागाने " खर काय आहे ते तुला नाही माहिती. ती तुला पण फसवत आहे. दिखावा आहे फक्त. "
रूनाली " खर ? अरे तुलाच नाही माहिती खर. काय आहे खर ऐकायचं आहे ना. "
विश्वा " नाही ऐकायचं मला."
रूनाली " तुला ऐकावचं लागेल. खरा गुन्हेगार जयप्रकाश पाटील आहे. तेच नाही याच्यासोबत संकेत आणि त्याचे वडील केशव केळकर पण आहे. जयप्रकाश पाटील आणि केशव केळकर म्हणजेच जे.पी आणि के.के यांचा शोध पोलीस घेत आहे. तुला हे पण माहीत नसेल की पोलीस नक्की कोणाचा शोध घेत आहे. याची माहिती काढायची तसदी पण घेतली नसेल तू. "
रूनालीच ऐकून विश्वासोबत बाकीच्यांना पण धक्का बसतो
विश्वा " मग त्यादिवशी ते रात्री बारा वाजता. नंतर संकेतला क्लासरूममध्ये भेटण हे सगळ काय होत."
विश्वा " मग त्यादिवशी ते रात्री बारा वाजता. नंतर संकेतला क्लासरूममध्ये भेटण हे सगळ काय होत."
रूनाली " ते सगळ जे.पी आणि के.के यांना पकडण्यासाठी आणखी पुरावा शोधत होती. "
विश्वा " काय ? "
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा