Login

शोध सत्याचा भाग - ८

कोण असेल तो खुनी ? ती आणू शकेल का खुनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर? जाणून घेण्यासाठी वाचत राहा शोध सत्याचा..

वेळ सकाळी ११:०० वाजता..

पोलिस परत एकदा गुन्हेगाराबद्दल काही भेटतय का  शोधण्यासाठी परत  ग्रीन वूड बिल्डिंगमध्ये आले. ते लोकांशी बोलत असताना कोणीतरी तिथे येत " तुम्हाला भेटले का पुरावे ? " बोलून सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतल.


त्या व्यक्तीचा आवाज ऐकून सगळ्यांच लक्ष त्या व्यक्तीकडे जात.

त्या व्यक्तीला बघून एक पोलिस अधिकारी पुढे येत त्या व्यक्तिसमोर उभ राहत " तुम्ही कोण ? "

पोलिसांचा असा प्रश्न ऐकून तो व्यक्ती तिरकस हसत हात जोडून " नमस्कार सर. मी इथला रहिवासी जयप्रकाश पाटील. "

पोलिस अधिकारी " नमस्कार. अजूनतरी काही पुरावे भेटले नाहीत. पण आम्हाला खूनीच नाव समजल आहे. त्या खुनीच नाव जे.पी आहे आणि हेही समजल आहे की खुनी एकटा नाही आहे. त्यासोबत कोणीतरी आहे तो खूनीची मदत करतोय. "

जयप्रकाश " हो. धावपळ न करता आरामात शोध घेतला तरी चालेल सर. "

जयप्रकाशच्या बोलण्यावर त्या पोलिस अधिकाऱ्याला विचित्र वाटत. तो विचित्र नजरेने जयप्रकाशकडे बघतो.

तेवढ्यात तिथे कोणीतरी येत आणि जयप्रकाशच्या बाजूला उभ राहत हात जोडून " नमस्कार सर मी केशव केळकर.अहो सर हा असाच आहे. याला कितीही उशीर झाला तरी सगळी काम आरामात करायची असतात. स्वतः तर हळूहळू कामे करतो सोबत दुसऱ्यांना पण हळू हळू कामे करायला सांगतो. तुम्ही याचे बोलणे मनावर नका घेऊ. तुम्हाला वाटेल तस काम करा. ( जयप्रकाशच्या हाताला धरून ) तू चल इथून यांना त्रास नको देऊ."

केशव जयप्रकाशला तिथून घेऊन जाणार तर जयप्रकाश त्याला रोखत " अरे थांब मला यांच्याशी महत्वाचं बोलायच आहे. "

केशव " आता काय बोलायचं आहे?"

जयप्रकाश केशवने पकडलेला हात सोडवत " मला यांच्याशी इंजेक्शन बद्दल बोलायचय. सर मी एक डॉक्टर आहे. तुमची परवानगी असेल तर मला इथल्या रहिवासींना आजारापासून वाचवण्यासाठी इंजेक्शन द्यायची आहे. रहिवासींना मान्य आहे पण इथला जो सेक्रेटरी आहे तो इंजेक्शन द्यायला नकार देत आहे. म्हणून म्हंटल थेट तुमचीच परवानगी घेऊया. हवं तर ( आपल्या पॅंटीच्या खिशातून एक बॉटल काढत ) तुम्ही या सँपलची तपासणी करू शकता. जरी तुम्हाला पटत नसेल तर मी तुम्हाला सगळेच बॉटल तपासणी करण्यासाठी देतो. "

पोलिस अधिकाऱ्याने जयप्रकाशच्या बोलण्यावर थोडावेळ विचार करून " ठीक आहे. तुम्ही सगळे बॉटल तपासणी करायला द्या. उद्यापर्यंत सगळी तपासणी होईल. नंतर तुम्ही तुमचं काम चालू करू शकता."

पोलिसांचा होकार आल्यावर जयप्रकाश आनंद झाला आणि जवळ असलेला कागद त्या पोलिसाच्या पुढ्यात पकडून शर्टच्या खिशातून पेन काढत " सर यावर सही करा. म्हणजे आमचा सेक्रेटरी आढेवेढे नाही घेणार. "

जयप्रकाशच बोलण समजून घेऊन त्या पोलिस अधिकाऱ्याने त्या कागदावर सही केली आणि पुढच्या कामाला निघून गेले.

जयप्रकाश आपल काम झाल समजून त्याला खूप आनंद झाला आणि केशवचा हात पकडत त्याला खेचत नेत " चल पटकन आपल्याला खूप कामे आहेत. आपल्याला बॉटल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवायचे आहेत. नंतर पोस्टर पण बनवायचं आहे म्हणजे सगळ्यांना समजेल की इथे इंजेक्शन देणं वगैरे चालू आहे. " बोलत दोघ तिथून निघून गेले.


कॉलेजमध्ये..

शेवटच लेक्चर होऊन कॉलेज सुटल होत. निहारिका घाईत कुठे तरी जात असताना विश्वाने बघितल तस विश्वा पण तिच्या मागोमाग निघाला.

निहारिका एका क्लासरूममध्ये आलेली जिथे कोणीच नव्हत. विश्वा दुरूनच कोणाला दिसणार नाही अश्या ठिकाणी उभा राहून तिच्यावर नजर ठेवून होता. सोबत व्हिडीओ रेकॉर्ड पण करणे चालू होत.

खूप वेळ झाल्यावर त्या क्लासरूममध्ये त्याला संकेत जाताना दिसला. त्याला बघून विश्वा स्वतःशीच " अच्छा हा पण आहे का हिच्यासोबत. "

खूप वेळ झाल्यावर संकेत आणि निहारिका त्याला बाहेर येताना दिसले. तेही एकमेकांकडे बघत हसत होते. दोघांना हसताना बघून इथे विश्वा रागाने लालबुंद झालेला. तो दात ओठ खात दोघांकडे बघत होता.

नंतर निहारिका आणि संकेत आपापल्या वाटेला निघून गेल्यावर विश्वा निहारिकाचा पाठलाग करू लागला.



ग्रीन वूड बिल्डिंग..

ग्रीन वूड बिल्डिंगमध्ये जे. पी आणि के.के अश्या ठिकाणी बोलत उभे होते जिथे त्यांना कोणी बघणार नाही.

जे.पी " उद्या ते बाटल्या तपासून झाल्या की त्या बाटल्या बाजूला करून आपण आपल्याकडील बाटल्या त्यात टाकू. मग बघ,कसा हाहाकार माजतो इथे. "

के.के " अरे वाह.. जे.पी मानल पाहिजे तुला. अशी योजना तर तूच करू शकतो. ज्यात समजणार पण नाही की हे सगळ कोणी केल आहे."

जे.पी " हम्म.. बस आपल्याला त्या कॅमिकलच्या बाटल्या त्यात ठेवायच आहे मग आपल काम झाल. म्हणजे आपला बदला पूर्ण होणार."

के.के " हो."


कॉलेजमध्ये..

निहारिका कॉलेजमधून घरी जात असताना तिला जाणवत की तिच्या मागे कोणीतरी आहे. म्हणून ती झपझप पावले टाकत तिथून निघण्याचा प्रयत्न करते. पण अचानक तिला कोणीतरी एका क्लासरूममध्ये खेचून घेत.