कॉलेजमध्ये..
निहारिका कॉलेजमधून घरी जात असताना तिला जाणवत की तिच्या मागे कोणीतरी आहे. म्हणून ती झपझप पावले टाकत तिथून निघण्याचा प्रयत्न करते. पण अचानक तिला कोणीतरी एका क्लासरूममध्ये खेचून घेत.
निहारिका कोणी खेचलं बघते तर तो विश्वा असतो. जो तिचा मनगट घट्ट पकडून रागाने तिच्याकडे बघत असतो.
निहारिका त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते " विश्वा हात सोड दुखत आहे खूप. "
विश्वा तिच्या डोळ्यात डोळे घालून तिचा हात आणखी घट्ट पकडत " खूप दुखतय ना. "
त्याच्या डोळ्यातला राग बघून तिला भीती वाटत असते. पण आपण घाबरलो तर तो आणखी काही करेल. म्हणून ती तस चेहऱ्यावर दाखवत नाही आणि त्याने पकडलेला हात सोडवण्याचा प्रयत्न करते. पण विश्वाचा मजबूत हात असल्याने तिच्याने ते होत नाही.
विश्वा " आज मी तुला जेल मध्ये टाकूनच राहणार. तू गुन्हेगार असल्याचा पुरावा मी स्वतः आहे. आ.."
तो पुढे काही बोलणार इतक्यात निहारिकाने संधी साधून त्याच्या पायावर पाय मारला. आणि त्याला धक्का देत क्लासरूममधून बाहेर येत दरवाज्याला कडी लावली. जेणेकरून विश्वा तिच्या मागे नाही येणार.
निहारिका पळतपळतच काहीतरी विचार करून रूनालीला फोन करते. आणि महत्वाचं बोलायच आहे सांगून तिला एके ठिकाणी भेटायला यायला सांगते.
थोड्याच वेळात रूनाली निहारिकाने ज्या ठिकाणी बोलवलं तिथे येते. एके ठिकाणी बसलेल्या निहारिकाने रूनालीला आलेल बघून हात वर करून तिला आपल्याकडे बोलावून घेते. तस रुनाली ती जिथे बसली तिथे जात तिच्या समोरच्या खुर्चीवर बसते.
खुर्चीवर बसल्यावर रूनाली " काय झालं निहू? इतक्या घाईत कशाला बोलवलं? "
क्षणाचाही विलंब न करता निहारिका मुद्द्यावर येत " मी काय सांगते ते ऐक... " ती जे काही सत्य होत ते सगळ सांगून टाकते. सोबत त्या पुराव्याबद्दल आणि विश्वाचा झालेला गैरसमज तेही सांगून टाकते.
निहारिका जे काही बोलली ते ऐकून रूनाली काही क्षण सुन्न झाली. नंतर भानावर येत " निहु एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली. "
निहारिका " कारण मला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता. मी सांगितलं तर सगळ्यांना खर समजेल आणि मग त्या खूनीने कोणालाच सोडलं नसत. तू सांग आता मी काय करू. तो विश्वा तर मी गुन्हेगार आहे समजून मागे लागला आहे. "
रूनाली " निहु हे बघ मला अस वाटत तू सगळ पोलिसांना सांगून टाकावं. तेच एक आहे जे तुझी मदत करू शकतात. तू अस सगळ लपवून स्वतःलाच त्रास करून घेऊ नको. "
निहारिका " अग पण.."
तिला तोडत रुनाली " माझं ऐक आणि सगळ सत्य पोलिसांना सांगून टाक. पुढे जे काही होईल ते बघू आपण.मी आहे तुझ्यासोबत. राहिली गोष्ट विश्वाची तर त्याला नंतर समजेल खर काय आहे ते. तू अस स्वतः त्रास करून घेणं मला नाही आवडणार. "
रूनालीने समजावून सांगितल्यावर निहारिका काहीतरी विचार करून " ठीक आहे तू बोलतेय तर मी सगळ पोलिसांना सांगून टाकते. पण तुला माझ्यासोबत पोलिस स्टेशनला यावं लागेल. "
रूनाली " हो, मी तुझ्यासोबत येईन. "
दोघींनी उद्या पोलिस स्टेशनला जायचं ठरवून तिथून आपल्या घरी निघून गेल्या. पण या दोघींना माहीत नव्हत की आपल बोलणं कोणीतरी ऐकल आहे.
वेळ दुपारी ४:०० वाजता..
निहारिका घरचं काहीतरी सामान आणायला दुकानात जात होती. ती चालत असताना कोणीतरी फोनवर बोलतानाचा आवाज तिला येतो. जेव्हा तिला केमिकलबद्दल काहीतरी बोलत आहे हे ऐकल्यावर ती तिथेच थांबते आणि त्या व्यक्तीचं बोलणं ऐकते.
त्या व्यक्तीचं फोनवरच बोलणं ऐकून तिला मोठा धक्का बसतो आणि भीतीने तिचे अंग थरथरायला लागतात. नंतर स्वतःला शांत करत काहीतरी विचार करून रूनालीला फोन लावते. आणि तशीच घाईत पुढे निघून जाते.
तिला पुढे जाताना बघून तो व्यक्ती कुस्तित फोन कानापासून बाजूला करतो. म्हणजे त्या व्यक्तीने तिला घाबरवण्यासाठी हे सर्व नाटकं केलेल होत.
ती गेल्यावर तो व्यक्ती मनात " वाह जे.पी , कसली भारी योजना सुचते तुला. आता ही पूर्णपणे माझ्या जाळ्यात फसणार. मग मी माझं काम फत्ते करू शकतो." बोलून तिथून निघून जातो.
निहारिकाचा फोन आलेल बघून रूनाली लगेच फोन उचलून , " हॅलो, बोल निहू."
निहारिका " मी काय सांगते ते ऐक. तो जे.पी त्याने नवीन योजना आखली आहे. मी त्याला कोणासोबततरी फोनवर बोलताना ऐकल आणि माझ्या माहितीनुसार तो के.के सोबत बोलत असेल. त्यात समजल की तो उद्या जे शिबीर आयोजित केलं आहे त्यात फॉरेन्सिकमधून तपासून आणलेल्या ज्या बाटल्या आहेत. त्या बाटल्या बदलून त्या जागी केमिकलच्या बाटल्या ठेवणार आहे. म्हणजे एकाचवेळी तो सगळ्यांना मारून टाकणार. "
हे सगळ ऐकून रूनालीला पण धक्का बसतो. नंतर भानावर येत " निहू, आता काय करायचं ?"
निहारिका " माझ्याकडे एक योजना आहे. जेव्हा तो केमिकलच्या बाटल्या ठेवणार. त्यानंतर आपण त्या बाटल्या बदलून त्या जागी खऱ्या बाटल्या ठेवू."
रूनाली " चालेल , मी येते तुझ्यासोबत. पण आपल्याला कस समजेल की बाटल्यांची हेराफेरी कुठे होणार आहे. "
निहारिका " हेराफेरी कुठे होणार आहे. ते मला माहीत आहे. बस आपण त्या ठिकाणी जाऊया. आणि त्या बाटल्या बदलून घेऊया. "
रूनालीशी बोलून तिथे फोन ठेवून दिला आणि सामान घेऊन आपल्या घरी निघून गेली.
पण इथे विश्वाने तिच शेवटचं बोलणं ऐकलेले. त्यानुसार त्याला समजले की उद्या होणाऱ्या शिबिरात ज्या बाटल्या इंजेक्शनसाठी वापरण्यात येईल त्या बाटल्यांची निहारिका हेराफेरी करणार आहे. असे समजून त्याला निहारिकाबद्दलचा राग आणखी वाढला. त्याने मनात काहीतरी निश्चित करून तिथून निघून गेला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा