समुद्र किनारी त्या सांजवेळी,
तु मी आणि तो एकांत
जगण्याचे गुपित सांगत,
होंदोळे घेत होतो निवांत.....
न फिकिर जगाची,
न आस मज बहु सुखाची,
तुझा तो सुरेख सहवास,
वाट दाखवी मज उदयाची...
मावळतीचा तो भास्कर,
नाचणाऱ्या त्या सुरेख लाटा,
भगवी चादर ओढत ते नभ,
जसे भासे भगवी पताका....
तुझ्या साथीची रम्य ती सफर,
साठवण होती मी मनात,
अचानक काळरात्र ती
आली तुझ्या माझ्या आयुष्यात....
उठले वादळ ,निसटले ते क्षण,
क्षणात झाले क्षणभंगुर सारे,
निसटला तुझा हात माझ्या हातुन,
जीवनच माझे सारे उध्वस्त झाले....
कल्पनाच ती स्वप्न भंगले,
रंगवत होते ते स्वप्न संपले,
विधात्याची ती कु्र घडी
आपल्यालाच का ?त्यात पिसले....
वेदनांचा झाला बाजार ,
रिती रिती मी आज ह्या जगात...
मोकळा झुला बघताच आजही
शोधते सख्या मी त्यात तुलाच...
वैशाली देवरे....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा