Login

अलकसंग्रह भाग ८

गोष्ट छोटी भावना मोठी
दोन मैत्रिणी आज बऱ्याच वर्षानंतर भेटल्या होत्या म्हणून तिने आपल्या मैत्रिणीला घराजवळ असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आणले होते.......

" आपल्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी तुला जवळच फिरायला घेऊन आले...... तसे इकडे बघण्यासारखे काही नाही फक्त हा समुद्रकिनारा आहे...... " ती मैत्रीण आपल्या मैत्रिणीकडे बघून बोलते........

" तू असे कसे बोलू शकते की बघायला काही नाही........ या खळवळणाऱ्या लाटा , हा समुद्राच्या पाण्याचा खळखळणारा आवाज , ही ओलसर वाऱ्याची झुळूक, समुद्राच्या पाण्याची खारी चव, सूर्यास्ताचे सुंदर असे रम्य जनक वातावरण....... हे दिसणाऱ्यांना खूप काही दाखवून जातात........ " दुसरी मैत्रीण आनंदाने समुद्राचे पाणी स्पर्श करत , आपले हात हवेमध्ये पसरत बोलू लागते......

आपल्या अंध मैत्रिणीचं बोलणं ऐकून मात्र दुसऱ्या मैत्रिणीच्या डोळ्यातून जणू समुद्राचे पाणी वाहू लागते..........


अलककार - एकता निलेश माने

🎭 Series Post

View all