Login

अलक भाग १०

गोष्ट छोटी भावना मोठी
आयुष्यात आलेला एकटेपणा जाणवत असताना एकटेच समुद्रकिनारी बसून एवढ्या वर्षात आपण काय कमावले याचा विचार करतच होते की , एक जवळची मैत्रीण धावतच येताना दिसली.

" अग वेडी, तू एकटीच इकडे अशी का बसली आहेस ? मी कधीपासून वेड्यासारखी तुला सगळीकडे शोधत होते...... चल माझ्यासोबत , तू सोबत नसलीस की आयुष्यातला एकटेपणा जाणवतो........ " असे बोलतच ती हाताला पकडून तिच्या सोबत घेऊन जाऊ लागली.......

तेव्हाच मला माझ्या आयुष्यात मी कमवलेली महत्त्वाची व्यक्ती माझ्यासमोर चालताना दिसली.........


अलककार - एकता निलेश माने

🎭 Series Post

View all