देव दाखवा
देव दाखवा, देव दाखवा
मजा कुणीतरी देव दाखवा
मजा कुणीतरी देव दाखवा
त्रिविध तापांचा, जाळीतो अंगार
जग मायेचा बाजार
किती खेळू संसार - संसार
जीव विटला अपारंपार
हात जोडूनी करिते प्रार्थना
या साऱ्यातून मज सोडवा
जग मायेचा बाजार
किती खेळू संसार - संसार
जीव विटला अपारंपार
हात जोडूनी करिते प्रार्थना
या साऱ्यातून मज सोडवा
साश्रू नयनात दृढ भाव दर्शनाचा
परी धीर सुटे पहा आज मनाचा
वाटे आता सुसाट जावे
स्वर्ग गाठावा सुरवरांचा
श्रद्धेवरी न पडो घाला
करिते अखंड भगवंताचा धावा
परी धीर सुटे पहा आज मनाचा
वाटे आता सुसाट जावे
स्वर्ग गाठावा सुरवरांचा
श्रद्धेवरी न पडो घाला
करिते अखंड भगवंताचा धावा
देव कृपाळू देव कनवाळू
स काय ह्या वल्गना
दुःख देऊनी छळ मांडीतो
प्राक्तनाचा भोग सरेना
मामा प्राणा तली आर्त हाक
का त्यास कळेना
चैतन्याचा स्त्रोत मिळेना
तळमळणाऱ्या हृदयाचा स्वामी
कोणीतरी मज दाखवा
देव दाखवा, देव दाखवा
.... योगिता मिलिंद नाखरे