श्रद्धेचे वारकरी_भाग २
प्रत्येकाला आपण ज्या रेल्वेने प्रवास करतो त्याचा थोडाफार अभिमान असतोच. तसाच तो मीनलला
पण होताच. एकदा मिहिरला चिडवत ती म्हणाली,
पण होताच. एकदा मिहिरला चिडवत ती म्हणाली,
"काय तुमच्या वेस्टर्नच्या फास्ट गाड्या. फास्ट असून किती स्टेशन्स वर थांबतात आणि ज्या स्टेशनवर थांबत नाहीत तिथे दोन स्टेशनच्या मध्ये थांबतात."
"हो तुमच्या सेंट्रलच्या गाड्या किती
वेळावेळाने असतात. तुमची स्टेशन्स पण किती अस्वच्छ आणि काळोखी असतात. आमच्या ट्रेन्स आणि पब्लिक सगळंच छान असतं."
वेळावेळाने असतात. तुमची स्टेशन्स पण किती अस्वच्छ आणि काळोखी असतात. आमच्या ट्रेन्स आणि पब्लिक सगळंच छान असतं."
मीनल आणि मिहिर दोघेही आपल्या बाजूची रेल्वे किती मस्त ह्यावर मजेत वाद घालत होते. मीनल आता बोरिवलीला चांगलीच रुळली होती. कधी विषय निघाला की मिहिर म्हणायचा,
"नशीब त्या दिवशी मी सरू कडे आलो नाहीतर आपली भेट झालीच नसती आणि तू कदाचित त्या सेंट्रल रेल्वेवाला कोणतरी बघितला असता."
"असं काहीही झालं नसतं. 'त्याने ' लग्नाच्या गाठी वरच बांधलेल्या असतात."
सकाळी दोघेही वेगवेगळ्या वेळी ऑफिसला जायचे. संध्याकाळी मात्र मिहिर चर्चगेटहून जी बोरिवली लोकल पकडायचा तीच लोकल मीनल दादरला पकडायची. फक्त ती लेडीज डब्यात असायची. बोरिवलीला उतरून दोघं रमतगमत घरी यायचे. कधी बाहेरच चहा प्यायचे, कधी भेळ पाणीपुरी खायचे. त्यामुळे दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळायचा. आठवड्यातून एकदा मीनल प्रभादेवीला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायची. कधी मिहिर तिच्याबरोबर जायचा किंवा त्याची इतर काही कामे करायचा.
असंच एक दिवस मिहिरने चर्चगेटला त्यांची नेहमीची ट्रेन पकडली. नेहमीप्रमाणे दादरला ट्रेन आल्यावर मीनू चढली असेल असं त्याच्या मनात आलं. दोघं वेगवेगळ्या डब्यात असले तरी दोघांनाही आपण एकत्र आहोत अशी एक भावना निर्माण व्हायची. मिहिरच्या मनात आलं उद्या मिनूचा वाढदिवस आहे तेव्हा आपण रजा घेणारच आहोत पण मिनू साठी काहीतरी गिफ्ट घ्यायला हवं. गेल्या वर्षी सरप्राईज गिफ्ट घेऊन झालं होतं. यावर्षी आपण तिच्या आवडीचे काहीतरी घेऊया असं त्याने मनाशी ठरवलं. आज बोरिवलीला उतरल्यावर नेहमीच्या पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी खाऊन मिनूसाठी फक्कड काहीतरी घेऊया. तो त्याच्या विचारांमध्ये दंग होता. इतक्यात वांद्रे स्टेशनात गाडी शिरत असताना प्रचंड आवाज झाला. आधी कोणालाच काही कळलं नाही. नंतर मीहिरला कळलं की मिडल लेडीजच्या डब्यात बॉम्बस्फोट झालाय. त्या वाक्याने तो खूप कासावीस झाला. तरी पण तो कसाबसा प्रचंड गर्दीतून वाट काढत मिडल लेडीज जवळ पोहोचला. तिथे त्याला कळलं की दहा-बारा बायका जगाच्या जागी गेल्या. काही किरकोळ जखमी झाल्या आहेत तर काही गंभीर जखमी झाल्या आहेत. पूर्ण गाडी रिकामी करण्यात आली होती त्यामुळे प्लॅटफॉर्मवर मुंगीला शिरायलाही जागा नव्हती. रेल्वेचे सुरक्षा रक्षक गर्दीला पांगवायचा प्रयत्न करत होते. त्यांनी जखमी आणि मृत स्त्रियांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. नीट काही दिसतच नव्हतं. त्याही परिस्थितीत कसाबसा खिशातून फोन काढून त्याने मीनूला फोन करण्याचा प्रयत्न केला. नुसतीच रिंग वाजत होती. हतबलता काय असते हे तेव्हा त्याला कळत होतं.
मीनू मध्येच दादरला चढत असल्या कारणाने तिच्या तशा खास कोणी मैत्रिणी नव्हत्या. कोणाला काय विचारणार. प्रत्येक जण भयभीत चेहऱ्याने वावरत होतं. इतक्यात त्याचा फोन वाजला. खूप मोठ्या आशेने फोन हातात घेतला पाहिलं तर अननोन नंबर होता. त्याला इतर कोणाशी बोलण्याची इच्छाच नव्हती. त्याने तो फोन घेतलाच नाही. रोज मिहिर मिनुच्या आधी घराबाहेर पडायचा त्यामुळे तिने कोणते कपडे घातले त्याला काहीच कल्पना नव्हती. त्या गर्दीत त्याला एवढेच दिसत होतं की काही महिला अगदीच किरकोळ जखमी झाल्या होत्या. त्या इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करत होत्या. गंभीररित्या जखमी झालेल्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्याची व्यवस्था केली जात होती. पण त्यात मिनूशी साधर्म्य असलेलं कोणीच दिसत नव्हतं. म्हणून तो देवाला प्रार्थना करत होता देवा माझ्या मीनूला सुखरूप ठेव. इतक्यात पुन्हा त्याचा फोन वाजला. यावेळी त्याने विचार केला कदाचित मिनूचीच खबरबात ह्या फोनद्वारे मिळू शकेल म्हणून त्याने फोन उचलण्याचा निर्णय घेतला.
(तो फोन कोणाचा असेल आणि या बॉम्बस्फोटातून मिनूचे काय झालं असेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा