||श्री गुरुदेव दत्त||
दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना ईश्वराचे अढळ स्थान आहे. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटात असताना,देहत्यागाला न जुमानता, त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची भार्या अनसूया यांचे पुत्र असून त्यांना दुर्वास व सोम असे दोन भाऊ आहेत.दत्तांचा उल्लेख त्यांचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे ऋग्वेदातल्या पाचव्या मंडलातील ऋचांचे संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, तर महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे पुत्र. ही दत्तांची नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत. पुराणांत वर्णन केलेल्या दत्तशिष्यांपैकी यदु, आयु, अलर्क, सहस्रार्जुन व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे आहेत तर उपनिषदांत उल्लेख असलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.
हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात. पुरातन काळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्तांचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात रुपांतरीत झाले.या तीन दैवी शक्ती या विश्वाची निर्मिती, निरंतरता आणि विनाश दर्शवतात. ज्याला जन्म नाही, ज्याला अंत नाही तो म्हणजे दत्त आणि या युगातील स्वामी अवतार म्हणजेच दत्त ही दत्तांची साधी,सोपी परंतु अनमोल अशी महती,व्याख्या म्हणता येईल.दत्त्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे, अशी मान्यता आहे.
दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झाले आहेत. मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे.या थोर देवतेचा उल्लेख मल्लीनाथ, बाण, कालिदास इत्यादींनी तसेच शूद्रकाने केलेला आढळतो. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम आदी संतांनी दत्तांच्या त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केला आहे.दत्तात्रेय या देवतेचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ हे आहेत.या अवताराची मुख्य देवता ब्रह्मा, विष्णू, महेश (शिव) आहेत.दत्तांचा मंत्र “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा आहे.
या देवतेचे स्वरूप म्हणजे ही तीन शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते.त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंगावर भस्माचे पट्टे आहेत. दत्तांच्या समोर चार कुत्री, मागे गाय असा परिवार दिसून येतो. चार कुत्री हे चार वेद आणि गाय म्हणजे शंकराचे भैरव आहे असे मानले जाते. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते.दत्तगुरूंचे एकूण १६ अवतार आहेत.
श्रीगुरुचरित्र,दत्तप्रबोध,दत्तमाहात्म्य,गुरुलीलामृत,नवनाथभक्तिसार,नवनाथ सार ,दक्षिणामूर्ती संहिता,दत्तसंहिता या ग्रंथांमध्ये दत्तगुरुंची महती वर्णिलेली आहे.
जन्म आख्यायिका:
दत्त महाराज यांची आई अनसूया यांच्या पतिव्रतेची ख्याती सर्वदूर पसरली होती. एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात. हे तिघेही त्यांच्या आश्रमात ऋषींचा वेष धारण करून भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा म्हणून स्तनपान करण्यासाठी मागणी करतात. परंतु माता अनसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकांत रूपांतर करते व स्तनपान करून त्यांना जेवू घालून झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवत वर मागण्यास सांगतात. अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागते. तेव्हापासून ह्या तिघांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय होय.
सारांश स्वरूपात श्री दत्तगुरूंची माहिती खालीलप्रमाणे आहे.
मराठी नाव: दत्तात्रेय
संस्कृत नाम :दत्तात्रेयः
निवासस्थान:श्री क्षेत्र गाणगापूर, माहूर, पांचाळेश्वर
शस्त्र:त्रिशूळ, चक्र
वडील:अत्री ऋषि
आई: अनसूया
पत्नी:अनघालक्ष्मी
अन्य नावे/ नामांतरे:दत्त, अवधूत, गुरुदेव, श्रीपाद, दिगंबर
या देवतेचे अवतार:श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ
या अवताराची मुख्य देवता:ब्रह्मा, विष्णू, महेश (शिव)
मंत्र: “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
नामोल्लेख-गुरुचरित्र ,नवनाथ भक्तिसार
तीर्थक्षेत्रे-औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत
श्री दत्तमहात्म्य:
श्री दत्तमहात्म्य या ग्रंथात भगवान श्रीदत्तात्रेयांसारख्या जगत्कल्याणास्तव सगुण व साकार झालेल्या परतत्त्वाच्या माहात्म्याचा विषय व परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांसारखे सिद्ध पुरुष हे ग्रंथकार, असा दोहोंचा आलेला योग श्रीमद्भागवतासारखाच अलौकिक आहे. सांस्कृतिक मूल्यांचा वर्तमान युगांतील दीपस्तंभ म्हणून प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींचे स्थान अनन्यसामान्य आहे. “ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन रक्षित: स्याद्वैदिको धर्म:” असे भगवत्पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवरील आपल्या भाष्यांत म्हटले आहे. श्रीमदाचार्यांना जे ब्राह्मण्य अभिप्रेत आहे ते श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींच्या रूपाने साकारले होते. चारही आश्रमांच्या आचारधर्माचे यथार्थदर्शन ज्यांच्या जीवनग्रंथातून घडते असा दुसरा कोणता महापुरुष वर्तमान युगात दाखविता येईल? कडकडीत तपाचरणामुळे ब्राह्मणाचे सारे सामर्थ्य त्यांच्या जीवनातून प्रगट झालेले होते.
श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींच्या जीवनातून हे सर्व विशेष प्रगट झालेले होते. स्वत:च्या जीवनातून त्यांनी जसे धर्माचे व आध्यात्मिक ध्येयवादाचे स्वरूप प्रगट केले, त्याचप्रमाणे अनेक जीवांचे “आर्त” दूर करून त्यांना सन्मार्गाला लावले व कृतार्थ केले. भावी पिढ्यांसाठी त्यांनी साहित्य निर्माण करून पारमार्थिक क्षेत्रांतील साधकांची सदाची सोय करून ठेवली हे त्यांचे सर्वात मोठे कार्य होय. त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथसंपत्तीपैकी बरेचसे ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. त्या ग्रंथांची महत्ता कितीही मोठी असली तरी सर्वसामान्य लोकांना त्यांचा विशेष उपयोग होण्यासारखा नाही. हे ध्यानात घेऊन श्रीमहाराजांनी मराठीत जे साहित्य निर्माण केले आहे, त्यात प्रस्तुत ग्रंथाची योग्यता अनेक दृष्टींनी अलौकिक आहे. प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप व त्याच्या निर्मितीचे कारण यांवर महाराजांनी स्वत:च प्रकाश टाकलेला आहे. ते लिहितात,
“जगदुद्धारार्थ परमेश्वर । अत्रीच्या घरी धरी अवतार । त्याच्या चरिताचा विस्तार । वर्णिला सुंदर पुराणी ॥
तत्सारभूत दत्तपुराण । औट सहस्त्र निरूपण । ते अपरिचित गीर्वाण भाषण । प्राकृतजन नेणती ॥
म्हणोनि हा ग्रंथारंभ । ह्या योगे उमजेल स्वयंप्रभ । भक्तवत्सल पद्मनाभ । चित्तक्षोभहर्ता जो ॥
श्रीदत्तपुराणाचे तीन भाग । ज्ञानोपासनाकर्मयोग । त्यांतील उपासनाकांड भाग । ईश्र्वरानुराग दावी जो ॥
जेथे कार्तवीर्याचे आख्यान । अलर्काचे विज्ञान । आयुयदूंचे उद्धरण । हेंचि वर्णन मुख्यत्वे ॥”
श्रीगुरुचरित्राप्रमाणे महाराजांनी दत्तमहात्म्याचेही एकावन्न अध्यायच केले आहेत. याची ओवी संख्या पाच हजार चारशे केली आहे. यात श्रीदत्तमहाराजांचे सांगोपांग चरित्र व सहस्त्रार्जुन, अलर्क, यदु, आयुराजा, परशुराम, प्रल्हाद वगैरे भक्तांची व तद्नुषंगाने अत्रि, अनसूया, रेणुका, जमदग्नी इत्यादिकांचीही चरित्रे अत्यंत रसाळवाणीने वर्णन करून स्वस्वाधिकारानुरूप साधकांचे भक्तिज्ञान, वैराग्य, निष्कामकर्म इत्यादी परमार्थमार्ग अत्यंत स्पष्ट व निश्चित स्वरूपाने वर्णिले आहेत. साल व कोयरहित आम्रादि फळांचा गाभा जसा सर्वच अमृतमय असतो तसाच हा ग्रंथ अगदी अमृतमय आहे. त्यामुळे त्याच्या निरंतर सेवनाने मूळचाच अमृत असणारा मानव अमृतमय होईल यात बिलकूल संशय नाही.
ग्रंथातील आस्तिकता:
प्रस्तुत ग्रंथात प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराजांनी ज्यांचे माहात्म्य वर्णिले आहे, तो ईश्र्वर प्रत्यक्ष अस्तित्त्वात आहे की नाही असा प्रश्न अत्याधुनिक व स्वत:ला प्रागतिक समजणाऱ्या आजच्या शिक्षित मनाला पडतो. ईश्र्वरास्तित्त्ववादी लोक तर्कशास्त्रीय पद्धतीने ईश्र्वराचे अस्तित्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करून या प्रश्नाचे उत्तर देतातही पण हा प्रश्न बुद्धिवादाच्या आश्रयाने वस्तुत: सुटणारा नसल्यामुळे तार्किकवादांनी कुणाचेच खरे समाधान होत नाही. ईश्र्वर हा वस्तुत: तर्कवादाचा विषय नसून तो अनुभूतीचा विषय आहे पण अनुभूति म्हटले की, एकतर ती आहे त्या स्थितीतल्या आजच्या इंद्रियांना आली पाहिजे अथवा आजच्या विज्ञानाच्या संशोधनाचा आधार असलेल्या प्रयोगशाळांतून तेथील उपकरणांच्या द्वारे सिद्ध झाली पाहिजे असे आजच्या आक्षेपकांचे म्हणणे असते.
दुर्लभ मानवजन्म लाभला असता मनुष्याने त्याचे सार्थक करावे म्हणजेच तो जन्म देणाऱ्या ईश्र्वराचे अंशत: का होईना आपण उतराई झालो असे म्हणण्यास हरकत नाही व कृतघ्नताही आपल्या पदरी पडणार नाही.
सच्चिदानंद ईश्र्वर हे आपले स्वरूप असूनही, अज्ञानाने त्याची विस्मृती आपणास झाली असल्याने, जागेपणी सार्वभौम राजा असून, स्वप्नात भिकारी होऊन नाना प्रकारची दु:खे भोगणाऱ्या राजाप्रमाणे सर्व जीवांची अवस्था झाली आहे. ती दैन्यावस्था दूर होऊन पुन: आनंदमय अशा सम्राट राज्यपदावर आरूढ करण्याकरताच ईश्र्वर, संतमहंत या रूपाने जगात अवतीर्ण होऊन त्याला आपल्या पूर्वस्वरूपाची स्मृतिरूप जागृती करून त्याचे दु:ख, दैन्य नाहीसे करून कृतार्थ करतो.
सुलभबोध सुंदर ग्रंथ:
आबालवृद्धांस सुलभबोध करून देणाऱ्या दत्तमाहात्म्य ग्रंथासारखा सर्वांग सुंदर ग्रंथ वाङमयात अपूर्वच आहे. महाराजांच्या स्वरूपाप्रमाणे हा ग्रंथही अत्यंत चित्ताकर्षक असाच आहे. कितीही वाचन झाले तरी ‘नित्य नवं नवं’ असाच तो आहे. सगुण स्वरूपसाक्षात्काराची ज्ञानशक्ती व वैराग्यरूपसाधने रसभरित वाणीने महाराजांनी यात सांगितली आहेत. महाराज अल्पकाम असल्याने देवाजवळ काही मागत नसत. परंतु या ग्रंथात सान्निध्य ठेवण्याकरता त्यांनी श्रीदत्तप्रभूंजवळ प्रार्थना केली आहे. ते म्हणतात,
‘हे प्रभो दत्तात्रेया, मी मागतो पसरूनी हात । ह्या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी ।’ (अ. ५१ ओ. ११०)
या प्रार्थनेप्रमाणे दत्तमहाराजांचे या ग्रंथात सान्निध्य आहे. असा अनुभव वाचकांसही येतो. त्यांच्या इतर कोणत्याही ग्रंथात याप्रमाणे महाराजांनी प्रार्थना केलेली दिसत नाही. यावरून या ग्रंथची थोरवी किती आहे, हे सहजच लक्षात येण्यासारखे आहे.
श्रीदत्तमाहात्म्य या ग्रंथाची रचना भाविक जनांच्या आग्रहावरून महत्पूर येथे शके १८२३ (इ.स.१९०१) च्या चातुर्मासांत झाली असें श्री स्वामीमहाराजांच्या पत्रावरून कळते.
ग्रंथातील ५१ अध्यायांचा संक्षिप्त (पात्ररुपी व कथारुपी )सारांश:
१. मंगलाचरण, नवविध भक्ति, सृष्टिक्रमण, दत्तात्रेयाचे मातापिता, दीपकाख्यान.
२. योगभ्रष्ट पुत्राची कथा, कौशिकसतीचा सूर्याला शाप, देवाच्या विनंतीने अनसूयेचे आगमन.
३. कौशिकाचे संजीवन, मांडव्य ऋषींची सुटका, दत्तावतार.
४. कार्तवीर्याचा जन्म, गर्ग ऋषींचा त्याला उपदेश व दत्तमाहात्म्याचे कथन.
५. दैत्यांकडून पराभूत देवांची दत्तसेवा व दत्तप्रभूंकडून त्यांना स्वर्गाची प्राप्ती.
६. कार्तवीर्याची दत्तभेट, परीक्षा व त्याला दत्तप्रभूंचे वरदान व राज्यारोहण.
७.कार्तवीर्याची विरक्ति, दत्तप्रभूंकडे आगमन, स्तुति, पुनःपरीक्षा व त्याचे प्रश्न.
८. बृहस्पति-इंद्र संवाद, सप्तगाथा, शिल्पज्ञ कथा, कामशास्त्रज्ञ ब्राह्मण कथा.
९.गायत्रीजापक सुशीलाची सात संमंधांपासून मुक्ति, विष्णुदत्ताची कथा.
१०. रोगग्रस्त ब्राह्मणाला कर्मविपाकाचा उपदेश व त्याला आरोग्य, झोटिंगाचे बंधन, शास्त्रतत्त्वनिरूपण.
११. जीवाचे विविध योनींत भ्रमण, गर्भवास, अवस्था, लक्षण, जडपुत्राला आश्वासन.
१२. सृष्टिक्रम, व्यष्टि-समष्टि, विक्षेप-आवरण, सदाचरण, गुरुसेवा, श्रवण, मनन, परोक्षापरोक्ष ज्ञान, जीवरूपाचे वर्णन.
१३.वाक्यविवरण, षड्लिंग व तत्त्वपदार्थ, तत् व त्वं यांचे ऐक्य, यांचे निरूपण.
१४.अष्टांगयोग, यम, नियम, आसन, प्राणायाम यांचा राजाला उपदेश.
१५.अवधूतज्ञान, सजातीयप्रत्ययलक्षण, विजातीयनिरसन, निदिध्यासन यांच्या अभ्यास्याने समाधीचा राजाला उपदेश व त्याला समाधिलाभ.
१६. राजाला अनासक्त प्रारब्ध भोगण्याचा उपदेश व पाठवणी. कार्तवीर्याकडून समुद्राचे गर्वहरण, यज्ञ, दानादिक अनुष्ठाने.
१७.अतिथिरूप सूर्याला वृक्षांचे दान व त्यामुळे वसिष्ठांचा राजाला शाप.
१८.ऋचीक-सत्यवती विवाह, जमदग्नि व विश्वामित्र यांचा जन्म.
१९. परशुरामावतार, मातेची हत्या व संजीवन, पितृसेवा.
२०. कार्तवीर्याचे जमदग्नींच्या आश्रमांत आतिथ्य व राजाकडून कामधेनुचे हरण.
२१. परशुरामाचे व कार्तवीर्याचे युद्ध व अर्जुनाचा वध, पित्याकडून त्याला दूषण व प्रायश्चित्तासाठी तीर्थयात्रेची आज्ञा.
२२.अर्जुनाच्या पुत्रांकडून जमदग्नींची हत्या, रेणुकेचा शोक, रामाचे आगमन व शत्रूचे हनन.
२३. मातापित्यांना घेऊन परशुरामाचे दत्ताश्रमांत आगमन, रेणुका व दत्त यांची परस्परांची स्तुति, रेणुकेचे सहगमन.
२४.रामाला क्रियाकर्मानंतर मातापित्यांचे पुनर्दर्शन, रामाकडून क्षत्रियहनन, कश्यपाला भूमिदान व समुद्रतीरी वास.
२५.गालवाच्या यज्ञरक्षणासाठी ऋतुध्वजाचे पातालकेतुसह युद्ध, पातालगमन व गंधर्वकन्या मदालसेची भेट.
२६.ऋतुध्वजाचा मदालसेशी विवाह व नगरास आगमन, पातालकेतुच्या भावाच्या कपटाने मदालसेचा अग्निप्रवेश.
२७. विरहातुर राजाचे नागपुत्राशी सख्य व त्यांच्याद्वारे अश्वतर नागाला राजाच्या व्यथेचे ज्ञान,नागाला सरस्वतीचा वर तसेंच शिवप्रसादाने मदालसेची प्राप्ती.
२८. अश्वतर नागाकडून मदालसेचे राजाला दान व पुत्रप्राप्ती, पुत्राला मातेचा तत्त्वबोध.
२९ .पुत्राचे जाड्य पाहून राजाचा शोक, मातेकडून ज्ञानप्राप्तीचे पुत्राकडून कथन, राजाचा कोप व मदालसेपुढे प्रवृत्तिमार्गाची स्तुती.
३०. राजाच्या इच्छेनुसार अलर्काला व्यवहारज्ञान व त्याला साम्राज्य. त्याचा अधःपात पाहून सुबाहूचे त्याच्याशी युद्ध.
३१. अलर्काचा पराजय व मातृवचनास अनुसरून दत्तप्रभूंकडे गमन व बोध.
३२.अलर्काला तत्त्वज्ञानाचा तसेच मनोभंग व वासनाक्षय यांच्या उपायांचा तसेच अष्टांगयोगाचा उपदेश.
३३. धारणा, अभ्यासाचे दोष व गुण.
३४ .अणिमादि सिद्धिंचा निषेध, सगुण व निर्गुण ध्यान, योगचर्या व भिक्षा यांचे निरूपण.
३५.योगसाधन, नादानुसंधान, प्रणवध्यान.
३६. मृत्युज्ञान व क्रममुक्ती.
३७. अलर्काची दत्तस्तुति, बंधूच्या उपकाराची जाणीव व दत्ताज्ञेनें बंधूभेट.
३८.सुबाहूचा काशीराजाला उपदेश व वनांस गमन,अलर्काच्या पुत्रास राज्याभिषेक व अलर्काचे वनांस प्रयाण.
३९.आयुराजाची पुत्रप्राप्तीकरीतां दत्तसेवा व दत्तप्रसाद.
४०.राणीची गर्भधारणा व स्वप्नांत दत्तदर्शन, हुंडासुराच्या प्रयत्नांस अपयश व दत्तकृपेने नहुषाचा जन्म.
४१. नहुषाचे हरण, त्याचे रक्षण व वसिष्ठाश्रमांत संगोपन.
४२. पुत्र दिसेनासा झाल्याने राणीचा व आयुराजाचा शोक.
४३ .दत्तप्रेरणेने नारदाचे आगमन व उपदेश.
४४ .नहुषाला वनांत आकाशवाणी व वसिष्ठांकडून स्वतःच्या इतिहासाचे ज्ञान व देवांच्या साहाय्याने हुंडासुरावर आक्रमण.
४५.हुंडासुराचा वध, नहुष व अशोकसुंदरीचा विवाह व मातापित्यांशी भेट.
४६.ययाती-देवयानीचा विवाह, ययातीचा शर्मिष्ठेशी संयोग व शुक्रशापाने वार्धक्य, पुरूनें वार्धक्य घेतल्याने त्याला राज्य, दुःखित यदुची वनांत दत्ताशी भेट.
४७. यदु-अवधूत संवाद, पृथ्वी, वायु आणि आकाश यांचे उपादेय गुण.
४८.जल, अग्नि, चंद्र, सूर्य व कवडा यांच्यापासून घेतलेले शिक्षण.
४९.अजगर, समुद्र, पतंग, मधुकर, गज, मृग, मत्स्य यांचे हेयलक्षण गुण.
५०. पिंगला (वेश्या), टिटवी, बालक, स्त्रीकंकण, सर्प, शरकार, पेशस्कार, कोळी. देहापासून शिक्षण.
५१. अवतरणिका.
खरंच श्री गुरुदेव दत्त्तांची थोरवी अगाध आहे.त्रिमुखी दत्तरूप आपल्या सर्वांमध्ये काही अंशी का होईना सानिध्य ठेवून सर्वांना सत्कर्म करण्याची बुद्धी देवो हीच ईश्वरचरणी श्रद्धा!
||श्री गुरुदेव दत्त||
माहिती संकलन: साभार गुगल
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा