आम्ही सहा वर्षा पूर्वी अमेरिकेला आलो त्यावेळी मोठा मुलगा तिसरी आणि धाकटा Sr. KG करून आले होते.
मोठयाला मराठी बर्यापैकी लिहिता वाचता येत होते. पण छोट्याला मात्र मराठी लिहिता वाचता येत नव्हते. दोन-तीन वर्ष गेली आणि माझ्या लक्षात आलं "अरे, हा (धाकटा ) मराठी नीट बोलत नाहिये. त्याची मराठीची शिकवाणी चालू केलीच पाहीजे आता." लगेच त्याला बसवलं.
"आजपासून मराठी वाचायला, लिहायला सुरूवात करायची "
" I don't want to do मराठी!"
"तुला पाहिजे का नको चा प्रश्नच नाही , ती आपली मातृभाषा आहे. बेसिक लिहिता, वाचता, बोलता आलचं पाहिजे "
"मराठी! मराठी!! मराठी!!! I don't care!! how many people in the world speak मराठी? If I don't speak मराठी what will go wrong? "
प्रत्येकाला मातृभाषा आलीच पाहिजे , तिचा सन्मान केला पाहिजे. आपल्या लोकांशी फक्त भाषेचा अडसर म्हणून अंतर वाढणं काही बरोबर नाही हे सगळे विचार एकाच वेळी घोंघावायला लागले. तो इतका हट्टाला पेटला होता, हे सगळ ह्याला कसं समजावणार? पण मराठी तर मनापासून केलचं पाहिजे. काय करावं कही सुचेना पटकन. मग एकदम click झाल
"काय रे, शिवाजी महाराजांची कुठली भाषा होती सांग ? मराठीचं ना ? आणि तू असं बोलतोस ? वागतोस?"
येवढा वेळ आरडा ओरडा करणारा तो जादुची कांडी फिरवल्यासारखा एकदम गप्प झाला.
"Sorry !"
आणि आमचा मराठीच्या अभ्यासाचा श्रीणेशा झाला.
साडेतीनशे वर्षानंतरही महाराज (आणि त्यांची थोरवी) अशी मदतीला धावून आली.
शिवाजी महाराज कि जय !
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा