सुलक्षणा आलेली देवींना कळलं होतं, पण त्यांनी तिकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं. आपणच सुरुवात करावी असं वाटून ती चाचरत म्हणाली, " आज्ञा देवी........ " आणि पुढील प्रतिक्रियेसाठी थांबली. न लागलेल्या झोपेतून जाग्या होत देवी म्हणाल्या, " आलीस ? अशी मंचकाच्या जवळ ये. " दिवसाचा प्रहर असूनही कक्षात अंधारलेलं वातावरण ठेवण्यात देवींना चांगलीच रुची असायची. म्हणजे आलेल्या माणसावर दडपण येतं. आणि त्याच्या स्वतःच्या क्षमतेच्या भ्रामक कल्पनेला तडा जातो असलं काहीतरी त्यांचं तर्कट होतं. ते काही प्रमाणात खरं होतं. सुलक्षणा तशी चांगलीच अनुभवी दासी होती. तरीही देवींच्या लहरी स्वभावाचं तिला फार भय वाटे. तितकी ती महाराजांना घाबरत नसे. कारण महाराज विचार करूनच शासन करीत असत.एकदा देवींनी तिच्याकडे आपादमस्तक पाहिलं आणि उठून बसत त्या नाजुक आवाजात म्हणाल्या, " जीव नकोसा झालाय का सुलक्षे ? .... " त्यांना उत्तराची अपेक्षा नव्हती. हे सुलक्षेला लक्षात आलंय हे त्यांच्याही लक्षात आलं होतं. मग त्या म्हणाल्या, " किती प्रमाद पोटात घालायचे ?(संतराम त्यांच्या कक्षात येणार नसल्याचे कळल्यापासून त्यांचा ताबा सुटला होता ) काही वर्षांपूर्वी त्या दोन सरदारांना विषप्रयोग करून नष्ट करण्याचं साधं कर्मही तुझ्याने झालं नाही. उलट भोजनाची अशी थाळी तू आमच्या चौरंगावर ठेवती झालीस. किस्त्रीचं लक्ष होतं म्हणून बरं नाहीतर आज तुला शासन करायला आम्ही अस्तित्वातच राहिलो नसतो. ....... " सुलक्षणेने मान अधिकच खाली घातली. यांना बहुतेक महाराज जे काही बोलले ते कळलेलं दिसतय. पण आपण तर त्यांच्या आज्ञेनेच महाराजांकडे गेलो होतो. .... तिची चर्या जवळून पाहत त्या म्हणाल्या, " तुझ्यावर आमचा जीव होता म्हणून प्रकरण महाराजांपर्यंत आम्ही जाऊ दिलं नाही. पण त्यानंतर तुझे प्रमाद वाढतच गेले. इतक्या जर आम्ही तुला नकोश्या झालो आहोत तर तुझे प्राण न राहिलेलेच बरे. " आता मात्र सुलक्षणेला घाम फुटला. पण कपाळावरचे घर्मबिंदू आणि पाठीवरून कमरेच्या घळीत शिरणारे घामाचे थंड थेंब तिला थोपवता आले नाहीत. अंगाला थरथर सुटली. थोडावेळ दडपण असेच ठेवून देवी म्हणाल्या, " चल समोरच्या भिंतीतला गुप्त मार्ग उघड आणि कूपाकडे चालू लाग. " असं म्हटल्याबरोबर सुलक्षणेने त्यांच्या पायांवर लोळण घेतली. त्यांचे पाय अश्रूंनी भिजवीत ती म्हणाली, " देवी आपण मला कारागृहात आजन्म ठेवा पण देहांत शासन देऊ नका. " असं कोणी पायावर लोळण घेऊ लागलं की देवींना राक्षसी आनंद होत असे. वास्तविक पाहता शासन आणि गुन्हा यांचं प्रमाण अयोग्य होतं. महाराज असते तर त्यांनी त्याचा तौलनिक विचार करूनच शासन केलं असतं. पण त्या देवी होत्या. आणि लहरी व आसुरी आनंद मिळवण्यात त्यांना फार सुख वाटे. देवी कुत्सित हसत म्हणाल्या, " सांगितल्याप्रमाणे कर, सुलक्षे. " मध्येच कोणी आलं तर फार बरं होईल म्हणजे तेवढं तरी जगता येईल असं तिला वाटलं. पण कुणालाही आत न येऊन देण्याची काळजी देवींनी घेतलीच असणार. काही न बोलता सुलक्षा उठली. आणि समोरच्या भिंतीकडे चालू लागली. मंचकावरून न उठता देवी म्हणाल्या, " समोरचं गवाक्ष उघड, सुलक्षे. या क्षणीचा प्रकाश एकदा डोळे भरून पाहून घे. पुढे सगळा अंधकारच आहे. .......... " आज्ञेप्रमाणे सुलक्षेने भिंतीतले गवाक्ष उघडले. सूर्यनारायण पण क्रोधाविष्ट दिसत होते. तिला आपल्या एकुलत्या एका पुत्राची आठवण झाली. काहीही बोलणं म्हणजे निव्वळ निर्दयपणाला साद घालण्यासारखं होतं. देवींना इच्छा झाली तर त्या स्वतः गुप्त दरवाजा उघडून थेट कूपातही ढकलतील , त्यापेक्षा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तरी करावं. पाषाणासारखे जड झालेले पाय तिने उचलले आणि भिंतीतली कळ दाबली. एक लहानसा चौकोन उघडा झाला. ज्यातून एकावेळेला एकच माणूस उभा राहून जाऊ शकेल इतक्या रुंदीचा मार्ग अंधुक दिसू लागला. थोड्यावेळाने डोळे अंधाराला सरावताच खाली उतरणाऱ्या पायऱ्या ज्या एका कूपाकडे वळत होत्या त्या दिसल्या. मागून देवींचा कठोर आवाज आला. " चल हो पुढे. ...... " थंड होणारे निर्जीव पाय यांत्रिकपणे हालवीत सुलक्षणा आत उतरू लागली. तिचा हात तिच्या गळ्यातल्या चमकणाऱ्या हिऱ्यांच्या माळेवर गेला, जी देवींनीच तिला दिली होती. आता या माळेचा काय उपयोग ? असे म्हणून तिने ती खेचली, आणी हिरा गिळून जीव नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण नियतीला देवींची इच्छा पुरी करायची असावी. त्यामुळे एकही हिरा हातात न येता ते सगळेच उड्या मारीत इतः स्ततः विखुरले गेले. हे देवींच्या लक्षात आले नाही. सुलक्षणेची निराशा झाली. पण कोणी या मार्गाने कधी गेला तर त्याला हिरे सापडले असते आणि जर ही गोष्ट महाराजांपर्यंत पोहोचली तर केव्हातरी देवींना काही ना काही शासन झालच असतं. अर्थात तसा तपास झाला तरच ही शक्यता होती. मात्र सुलक्षणेच्या मनात तसं काही नव्हतं. ............... देवींनी दिवाणखान्यातला एक लहानसा पलिता हातात घेतला व तिच्या मागून उतरू लागल्या. शासनाची तामिली त्यांच्या समोरच व्हावी असं त्यांना वाटत होतं. ........ दहा बारा पायऱ्या संपल्यावर एक सपाट पण उतरत्या जागेचं कातळातलं वर्तुळ दिसलं . मध्ये लहान पण खोल असा एक कूप होता. तिथे कठडा नव्हता की खांब. विचार करायला कुठेतरी धरावं लागतं. निदान जिवावरच्या संकटात तरी. तिने परत एकदा प्रयत्न करून पाहिला. पुढचा पाय वर्तुळातल्या सपाट जागेवर लगेचच पाऊल ठेवणं म्हणजे मृत्यूला त्वरित आमंत्रण देणं ठरलं असतं. म्हणून सुलक्षणा कातळाच्या भिंतीला पाठीकडून चिकटत सरकत पुढे गेली. मध्येच थांबून शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या कठोर मुद्रेच्या देवींकडे तिने एकवार पाहिलं. त्यांच्या हातातल्या उंच धरलेल्या पलित्याच्या उजेडात त्यांचा चेहरा तिला एखाद्या रानटी लोकांच्या उग्र रूपाच्या देवी सारखा वाटला. जड श्वासामुळे लहान मोठ्या होणाऱ्या त्यांच्या नाकपुड्या आणि एकूणच तोंडावरले विकट सैतानी हास्य त्यांच्या विस्फारलेल्या डोळ्यांमध्ये उतरलेलं होतं. त्याची पर्वा न करता सुलक्षणेने काकुळतीने म्हटले, " देवी , पाहिजे तर मला इथेच बंद करून ठेवा, पण कूपात उडी मारायला सांगू नका. मी आपण म्हणाल तर माझ्या एकुलत्याएक मुलालाही आपल्या सेवेत आजन्म ठेवीन, पण मला मारू नका हो. मला जगू द्या. " ........... तिथून देवींचे पाय धरणं तिला शक्य नव्हतं नाहीतर तिने तेही केलं असतं आणि त्यांचे पाय सोडलेही नसते. उत्तरादाखल फक्त देवींची आज्ञा तेवढी बाहेर पडली, " भिंतीचे हात सोड सुलक्षे आणि पुढे वाक " तिने तसे केले असते तर तिचे पाय सरकून ती घसरत आपोआपच कूपात ओढली गेली असती. तिने एकवार कूपाकडे पाहिले. पलित्याच्या उजेडात तिला अंधार जास्तच भयावह वाटला. जणू काळ्या शाईनेच कूप भरला असावा असे तिला क्षणभर वाटले. घामाने डबडबलेले अंग फार काळ भिंतीला चिकटून राहिले नसतेच. तरीही जिवाची आशा भयंकर असल्याने तिच्या मनात एक खुनशी विचार आला. देवी तिच्यापासून एक हातच दूर उभ्या होत्या. फक्त थोडं धैर्य धरून जर देवींचा हात पकडला असता तर त्याही तिच्या सोबत कूपात पडल्या असत्या. तेवढं धैर्य तिला गोळा करणं भाग होतं. जणू तिच्या मनातले विचार वाचल्यासारखे करून देवी म्हणाल्या, " दगाफटका करण्याचा विचारही करू नकोस सुलक्षे, चल लवकर आत उडी मार " तरीही तिची तयारी होईना तिने पुन्हा एकदा कूपाकडे पाहिले. आतला अंधार तिला गिळण्यासाठी आतूर झालेला दिसला. देवी मुद्दामच दोन पायऱ्या वर चढल्या. तरीही सुलक्षा कूपाकडे जाण्यास तयार होईना. मग मात्र देवींनी हातातला पलिता तिच्या अंगावर फेकला. पलित्याचा प्रहार चुकवण्याच्या प्रयत्नात सुलक्षेचा तोल जाऊन ती कूपाकडे घसरली. आता गडद अंधार पसरला. पडता पडता तिला मानवी आवाज ऐकू आला तो फक्त देवींच्या विकट हास्याचा ......... त्वरेने वळून देवींनी वरच्या पायऱ्या काही क्षणांत पार केल्या आणि त्या कक्षात परतल्या. त्यांचाही श्वास वेगाने होत होता. त्याच स्थितीत त्यांनी भिंतीतली कळ दाबली. दगडी चौकोन पुन्हा निर्जीवपणे जागेवर बसला, पुन्हा उपयोगात येईपर्यंत......
देवी परत मंचकावर बसल्या. का कोण जाणे पण त्यांना सुलक्षेचे शब्द आणि हीन दीन झालेली चर्या आठवू लागली. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांकडे त्या पाहत राहिल्या. जणू काही त्या ते प्रथमच पाहत होत्या. मन असं निर्विचार आणि पोकळ का झालेलं आहे त्यांना कळेना. कूप तसा भयावह होता. तिथे जायला कुणीही घाबरलं असतंच. असा थोडा लेचापेचा विचार अचानक त्यांच्या मनात आला आणि त्यांना आपल्या मनात दयेचा उदय झाल्याची जाणीव झाली. मग मात्र त्यांनी तो विचार झुरळासारखा झटकून टाकला. सुलक्षेसारखी यःकश्चित दासी ती काय , तिचा एवढा विचार करण्याची आपल्याला काय आवश्यकता असा दांड्गट विचार त्यांच्या मनात आल्या बरोबर त्यांचं मन लवकरच पाषाणासारखे निर्दय झाले. वेळ जावा म्हणून त्या आरशासमोर उभ्या राहिल्या. आरशात चेहरा पाहताच त्यांना शेजारी दुसरा एक चेहरा दिसला. तो होता. सुलक्षेचा. त्या भय वाटून आजूबाजूला पाहू लागल्या. हिचा जीव गेलाय की नाही ? का आपण परत एकदा कूपाच्या तळघरात जाऊन पाहायला हवं . त्यांना खात्री वाटेना. मन असा पर्याय का सुचवतंय ? त्यांना कळेना. आजपर्यंत ज्या पुरूषांना यमसदनाला पाठवले त्यांच्या बाबतीत असा विचार कधी आला नाही. फार कशाला त्यांना फेकले तेव्हा सुद्धा त्या किती शांत आणि अविचल होत्या. त्यांना ते सगळं आठवलं. पण सुलक्षेने तर उगाचच मनात प्रवेश केला होता. इतका काय तिचा विचार करायचा. म्हणून त्यांनी स्वतःचं डोकं जोरात हालवलं. तिच्या मुलाला आपल्या सेवेत ठेवणं म्हणजे स्वतःला न संपणारं शासन करून घेण्यासारखं होतं. फार तर त्याला जगण्यासाठी मदत करायला हरकत नाही . तीही गुप्तपणे. आपलं नाव उघड होणार नाही याची काळजी घेऊनच. मग त्यांनी उगाचच पुन्हा चेहरा जवळच ठेवलेल्या तस्तामधल्या गुलाबपाण्याने धुतला. हळुवार पणे पुसला. आज रात्री महाराज कक्षात येणारे होते. सुलक्षेचे कोणतेही चिन्ह इथे ठेवून चालणार नाही हे लक्षात येऊन त्यांनी स्वतःच्या कक्षाची पाहणी केली.

काही दिवसांपूर्वीची गुप्त बातमी महाराजांनी आचार्यांपुढे ठेवली. ती अशी की सुदेश पंडित शेजारच्या राज्यातून आलेल्या एका स्त्री मार्फत आपल्या राज्यातील बातम्या पाठवण्याची व्यवस्था करीत आहे. त्यात महाराजांच्या कोषागारातल्या बातम्या आणि सैन्याच्या सुरक्षिततेच्या हालचाली समाविष्ट केल्या आहेत. आता पंडिताला एकदम ताब्यात घेऊन शासन करावे की अधिक अपराध करून देऊन मग त्या राज्यातली खास बातमी काढावी किंवा पंडिताकडे एखादी असत्य बातमी पाठवून त्याच्यावर कडक नजर ठेवावी व पुराव्यांसहित धरावे. हा सध्याचा पेच आहे. आपला काय सल्ला आहे? कारण राज्याच्या अर्थव्यवस्थेला कीड लागण्याची शक्यता आहे, असा हेरांचा अंदाज आहे. महाराजांनी सोमूचं नाव घेतलं नाही. आचार्यांनी थोडा विचार केला. मग ते संतरामला पुढे काढण्यासाठी म्हणाले, "\" काही उपाय सुचतोय का? \"" कोणतेही उत्तर न देता संतराम म्हणाले, "\" समय फार चंचल आहे. महाराजांनी काहीतरी खेळी करून पंडितांचा रहस्यभेद करावा. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, तीही लवकरच. "\" आचार्यांना समाधान वाटलं. तरीही त्यांनी परत एकदा विचारले, \"" म्हणजे नक्की काय करावं, ते स्पष्ट करा. "\" जरा वेळ चिंतन करून संतराम म्हणाले, " सध्याच्या आचार्यांच्या कारभाराबाबत महाराज साशंक आहेत असे असत्य सांगून सध्या पुरते उप आचार्य पद निर्माण करावे व ते सुदेश पंडिताला दिले जाईल अशी बातमी पोचवावी व त्याला अधिकृत रित्या भेटीसाठी बोलावून यथोचित सत्कार करावा. तसेच त्यास खासगीमध्ये घेऊन व्यवस्थित कारभार सांभाळल्यास आचार्यपद देण्याचे आमिष दाखवावे. किंवा थोडा विचार करून आणखी काही उपाय सुचत असल्यास आम्ही आपणास विदित करू. थोडक्या दिवसांचा समय तरी त्यासाठी आवश्यक आहे. आपल्या आज्ञेप्रमाणे होईल. पण नुसते दैवावर विसंबून राहिल्यास मात्र काही विनाशकारक घटनाही निर्माण होऊ शकतात. याचीही महाराजांनी नोंद घेतल्यास बरे होईल. दैवी खेळीवर सामान्य जन विसंबून राहतात, राजकारणी नव्हे. स्पष्ट वचनाबद्दल क्षमा असावी. "........ आवश्यक योजना ठरवून आणि एक दोन दिवसात तिची व्यवहार्यता पाहून मगच ती अमलात आणण्याचे महाराजांनी ठरवले. परंतु तसे काही न बोलता त्यांनी सल्ला मसलत बरखास्त केली. त्यांना देवींच्या कक्षात रात्री जाण्याची आठवण झाली. पण त्यांच्या मनात सुदेश पंडिताबद्दल विचार येत राहिले. त्याचे घातकी मार्ग त्यांना नको वाटत. सुरुवातीच्या काळात एक दोन प्रसंगांमध्ये त्यांनी त्याची सल्ला मसलत केवळ देवींनी जोर दिल्याने विचारात घेतली होती. पण त्यांबरहुकूम कोणतीही कृती न केल्याने राज्याची सुरक्षितता आजपर्यंत अबाधित राहिली होती. पण राजकारणात कोणाचीही मदत घ्यावी लागते याची त्यांना जाणीव होती.
देवींनी दिवस कसाबसा काढला. का कोण जाणे पण त्यांना आजूबाजूला सुलक्षा फिरत असल्याचे भास होऊ लागले. साजशृंगार करण्यातही त्यांचे मन फारसे रमेना. शेवटी त्यांनी प्रज्ञा नावाच्या दासीला बोलावून घेतले. ती साजशृंगार करण्यात चलाख होती पण तिला महाराज येणार असल्याचे सांगावे लागले. तिने जवळ जवळ दोन घटिका त्यात घालवल्या, तेव्हा कुठे देवींचे समाधान झाले. आता देवींनी रेशमी नारिंगी रंगाची काचोळी घातली होती. पण वर कोणतेही अंग झाकणारे वस्त्र नव्हते. नाही म्हणायला एक शेला तेवढा त्यांनी आपल्या दोन्ही खांद्यांवरून ओढला होता. एखाद्या नृत्यकला निपुण स्त्री सारखे त्यांचे रुप दिसत होते. तश्या त्या आकर्षक होत्याच. खरतर त्यांना सौंदर्यप्रसाधनांची फारशी गरज पडत नसे. लांबट सुंदर टपोरे डोळे त्यांच्या लंबवर्तुळाकार चेहऱ्यावर रत्नांसारखे दिसत होते. कोरलेल्या भुवयांचे धनुष्य आणि त्यांमध्ये पडणारी बाणाच्या आकारासारखी उभी आठी पाहून कोणालाही घायाळ व्हायला झाले असते. मांजरीसारखे गाल खालच्या बाजूला म्हणजे जिवणीच्या रेषेत फुगलेले होते. जिवणी म्हणजे या फुगलेल्या गालांमध्ये एखादी माफक फट असते तशी होती. पण पातळ ओठ मात्र त्यांच्या लबाड हेतूंचे द्योतक दिसत असे. एखाद्या पुरुषाला भुलवण्याचे कसब त्यांच्यात मूळचेच होते. आजच्या काचोळीचा रंग जरी नारिंगी असला तरीही आतली गडद रंगाची स्तनाग्रे त्यातून सहज दिसत होती, इतकी काचोळी झिरझिरीत होती. घाटदार उरोजांचे बुरुजच जणू समोरच्यावर मारा करीत आहेत असे वाटावे. कंबर लहान असूनही तिने खालच्या भरगच्च नितंबांचा भार पेलला होता. महाराजांना कक्षात यायला अजूनही निदान दोन घटिका बाकी होत्या. तिसऱ्या प्रहराची सनई वाजली आणि कंटाळलेल्या देवींनी सुस्कारा सोडला. दासीने आणलेला अल्पोपहार त्यांनी अल्पच केला. देवींना कामज्वराची इतकी भावना होती की त्यांना काही सुचेना. वास्तविक महाराज त्यांच्या कक्षात कधीच आलेले नव्हते असे झाले नाही. पण महाराज कामेच्छेवर स्वतःची हुकुमत ठेवून होते. कोणत्याही भावनेत वाहवत जाणं हा त्यांचा पिंडच नव्हता. पण त्यांना देवींची पूर्ण माहिती असल्याने क्वचित का होईना त्यांची इच्छा पूर्ण करीत असत. खरंतर देवींना आताशा म्हणजे सुलक्षा गेल्यापासून त्यांना हा कक्षच नकोसा वाटत होता. त्यात असलेला कूपाचा मार्ग त्यांनी स्वतःच बांधवून घेतला होता. पण आत्ता त्यांना तो नकोसा झाला होता. गवाक्ष उघडून बाहेर पाहावे म्हणून त्या गवाक्षापाशी गेल्या. गवाक्षा बाहेरील बगिच्या कडे त्या कुतूहलाने पाहू लागल्या. अंधारणाऱ्या आभाळात त्यांनी एकदा टक लावून पाहिले, पण त्यांना घरट्यात शिरणाऱ्या विहंगांशिवाय काहीही दिसले नाही. बाहेरील दृश्य एखाद्या चित्रकाराला वेडावून सोडणारे होते. पण देवींना मात्र उबग आला. त्या पुन्हा एकदा आरशा समोर जाऊन उभ्या राहिल्या. स्वतःचे सावकाश आणि सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी वार्धक्य तर कुठे डोकावीत नाही ना याची खात्री करून घेतली. वाढत्या वयाची कोणतीही छटा न दिसल्याने त्या प्रसन्न झाल्या. एकदम त्यांनी संतरामांचा विचार केला. महाराजांपेक्षा किती तेजस्वी आणि तरुण आहेत याची त्यांना जाणीव झाली. मग त्या आरशा समोर उभ्या उभ्याच स्वप्न रंगवू लागल्या. बराच काळ लोटला........... अचानक आलेल्या रक्षकाने लवून अभिवादन केले आणि त्यांना महाराज येत असल्याची वर्दी दिली. संतरामांपुढे महाराज त्यांना फारच वृद्ध वाटू लागले. त्यांना अशा प्रौढ पुरुषा बरोबर कशासाठी प्रणय करायचा असे त्यांच्या मनात येऊन त्या नाराज झाल्या. पण ती नाराजी त्यांना लपवावी लागली. कारण महाराज कक्षात प्रवेश करते झाले होते.
रक्षक निघून गेल्यावर महाराज मंचकावर बसले. नाराजीने का होईना देवी पण मंचकावर बसल्या. महाराजांची नजर संपूर्ण कक्षातून फिरत राहिली. अचानक त्यांची बारीक नजर कूपाच्या कोनाड्याकडे गेली. ते तिथे पाहत राहिले.
ते सहजच पाहत होते. पण अपराधीपणाची जाणीव असलेल्या देवींना मात्र अस्वस्थ वाटू लागले. महाराज कक्षात रात्र घालवण्यासाठी आले आहेत की सखोल निरीक्षण करण्यासाठी हे न उमजून देवींना नाराजी पेक्षा जास्त क्रोध आला. पण त्या बोलू शकल्या नाहीत., नजर फिरता फिरता त्यांना शेल्याच्या आचळ्यांमधली लाल रंगाची एक आचळी तिथे पडलेली दिसली. कक्षात मोठाल्या दिव्यांचा उजेड भरपूर होता. ते मंचकावरून उठले. कूपाच्या भिंतीकडे गेले. त्यांनी ती लाल रंगाची आचळी उचलली. साधारणपणे दासींच्या उत्तरीय वस्त्राला अशा रंगाच्या आचळ्या ठरवलेल्या होत्या.. पृच्छा करण्यासाठी ते म्हणाले, " सांप्रत तुमची सुलक्षा दासी दिसत नाही ती? "....... उत्तर ऐकण्यासाठी ते थांबले. अंगावरील हलकासा घाम शेल्याला पुसणाऱ्या देवींना या प्रश्नाने चांगलेच हादरल्यासारखे झाले. इतक्या लवकर हे सुलक्षेकडे कसे पोहोचले. स्वतःवर ताबा ठेवीत त्या म्हणाल्या, " सुलक्षा? तिच्या मुलाचे स्वास्थ्य बिघडल्याने ती त्याला आरोग्यप्राप्ती व्हावी म्हणून नगराबाहेर घेऊन गेलेली आहे. काही दिवसातच ती येणार असल्याचे म्हणाली होती. किती काळ लागेल ते सांगितले नाही. आपण मंचकावर यावे. प्रतीक्षेत बराच काळ व्यतीत झालेला आहे........ " त्या पुढे बोलणार होत्या पण त्यांनी वाक्य अर्धवट सोडले. महाराज थोडावेळ विचार करून मंचकावर आरूढ झाले. पुढच्या चौकश्या बंद व्हाव्यात म्हणून देवी त्यांना बिलगल्या. महाराजांच्या लक्षात आले की देवी काहीतरी लपवीत आहेत. पण सांप्रतच्या प्रसंगाला अनुरूप वागावे असे त्यांनी ठरवले. त्यांनी उचललेली आचळी सोमूकडे देऊन आपल्याला काही तर्क करता येतो का ते पाहिले पाहिजे असा विचार करून ती स्वतःच्या कमरेस खोचली. देवींच्या चेहऱ्याचा थोड्या वेळासाठी तरी उडणारा रंग पाहून त्यांना अघटिताची शंका आली. त्यांनी देवींच्या केशकलापातून हात फिरवण्यास सुरुवात केली. त्या स्पर्शाने देवी महिरून गेल्या. अनेक दिवसांची इच्छा आज नक्कीच पूर्ण होणार याची त्यांना खात्री वाटू लागली. त्यांनी आपले मस्तक महाराजांच्या छातीवर टेकवले. अजूनही महाराज काय घडले असेल त्याबद्दल विचार करीत होते. नकळत त्यांचा हात देवींच्या पाठीवर फिरला. काचोळीची गाठ सोडल्याबरोबर देवींचे ताठर उरोज डचमळल्याप्रमाणे बाहेर आले. आता जास्त विचार न करता महाराजांनी देवींची वस्त्रे उतरवण्यास सुरुवात केली. पूर्णपणे नग्नावस्थेत असलेल्या देवींच्या तप्त कायेवरून हात फिरवताना महाराजांना पण अनेक दिवसांनी मिळणाऱ्या सुखाचा स्पर्श होऊ लागला. थोडावेळ जाऊन देऊन देवींना आलिंगन देत महाराज काही बोलणार एवढ्यात देवींच्या डोळ्यासमोर संतरामाची मूर्ती आली. महाराजांच्या स्पर्शात त्या संतरामांचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण महाराजांच्या निबर अंतःस्पर्शात देवींना कोवळ्या तारूण्याच्या स्पर्शाचा अनुभव येण्यात अचानक निराशा भासू लागली. त्या सरशी त्या मागे सरल्या. त्यांच्या मनात आले, शेवटी महाराज म्हणजे संतराम नाहीत. आलिंगन आणि चुंबनाच्या वर्षावात त्यांना तसले सुख मिळेनासे झाले. त्या दूर सरल्या. आपली वस्त्रे गोळा करीत त्या उभ्या राहिल्या. उत्तेजित झालेले महाराज असल्या अचानक झालेल्या बदलाने क्रोधित होत म्हणाले, " याला काय म्हणावे, देवी? आपल्या इच्छेनुसारच आम्ही आलो होतो. पण प्रणयाच्या अर्ध्या मार्गावरच आपण माघार घेतलीत, हे योग्य नाही. या पुढे असला कडेलोट आम्ही सहन करणार नाही आणि उपेक्षेस पात्र व्हाल याची जाणीव ठेवा. "........... परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून देवी परत महाराजांजवळ येत म्हणाल्या, " काहीतरीच, अचानक आम्हाला भोवळ आल्यासारखे झाल्याने आम्ही दूर झालो इतकेच. "........ स्वतःवर ताबा ठेवीत त्यांना जवळ घेत महाराज म्हणाले, " आणि अचानक भोवळ नाहीशी झाली वाटतं? " आम्ही आपणास चांगलेच ओळखतो असे त्यांना म्हणायचे होते.
पण महाराजांनी विवेक केला व पुढील प्रणयाराधन सुरू केले............

************ ********************** ***************************** ********************** *******************
सुदेश पंडित आपल्या मंचकावर सुखासीनतेत लोळत होता. पण त्याला आचार्यांची महानता एखाद्या काट्यासारखी सतत बोचत असल्याने त्याने प्रणयमग्न झालेल्या नर्तिकेला दूर सारले व तो वस्त्रे सावरीत उठला. तिला त्वरित जाण्याची आज्ञा करीत तो आपल्या आसनावर विराजमान झाला. सारखं प्रणयामध्ये मग्न होणं आपल्याला परवडणारे नाही, याची त्याला जाणीव झाली. नर्तकी गेल्यावर त्याने टाळी वाजवली. सेवक नम्रपणे आज्ञेसाठी हजर झाला. शेजारच्या राज्यातून आलेल्या स्त्री हेराला त्याने बोलावण्यास सांगितले....... शेलाट्या अंगाची स्वेच्छा आपले आकर्षक उरोज हालवीत हजर झाली. तिची ही सवय फारच मोहक होती. पाहणारा त्यातच अडकून पडत असे. तिची नजर जरी चंचल असली तरी बुद्धी अतिशय तल्लख होती. तिने कोठेही शिरतानाच वातावरणाची नोंद केलेली असल्याने ती कधीच भूतकाळात अथवा भविष्यकाळात रममाण होत नसे. समोरच्याच्या हालचालींवर तिचे बारीक लक्ष असे. पंडिताच्या मनातले विचार तिने आधीच ओळखले होते. तिला त्याने आपल्या जवळच आसनस्थ होण्यास सांगितले. तिच्या सौंदर्याकडे लक्ष न देता तो थोडा उपरोधिकपणे म्हणाला, " ज्या प्रमाणात तू विशद केले होतेस त्याप्रमाणात तुझे कार्य दिसत नाही, लवंगलतिके. सांप्रतच्या काळापर्यंत तू कोणत्या कृतीची अंमलबजावणी केलीस? "...........
त्यावर थोडे थांबून ती म्हणाली, " पंडितांनी थोडा धीर धरावा, अजून काळ आपल्याच हातात आहे. माझ्या हालचाली सुरू आहेत. नुकतेच मी गुप्तहेर सोमूच्या मागावर होते....... " ती पुढे काही बोलणार ते बोलू न देता पंडित म्हणाला, " आपल्याला त्याचा काय उपयोग? "
"तेच तर महत्त्वाचे आहे. राजवाड्यात काहीतरी विपरित घडले असावे असा माझा अंदाज आहे त्यामुळे महाराज सध्या वेगळ्याच चिंतेत आहेत आणि त्यांना तसेच चिंतित ठेवले तर माझा राजवाड्यातील प्रवेश अगदी सुलभ होईल. ".......... तरीही पंडिताचे समाधान झालेले दिसले नाही. तो म्हणाला, " ते ठीक आहे पण काळ आपल्या हातात असला तरी तो कधी निसटेल हे सांगता येत नाही. दोनतीन दिवसातच काय
केलंस तर बरे. अन्यथा तुला इथे आश्रय देऊन मी चूक केली आहे असेच मला वाटत राहील. "
"महाराणी कामिनीदेवी हाच तर महाराजांचा कच्चा दुवा आहेत, तोच मी पकडणार आहे आणि विनाशाची सुरुवात करणार आहे. सांप्रत आपण ठरल्याप्रमाणे माझ्याशी विवाह करावा व लवकरच माझे पलायन झाले असल्याची अफवा आपण उठवावी, म्हणजे त्या धूम्रकाळात मी राजवाड्यात प्रवेश करती होईन. ".......... आता कृतीची जबाबदारी पंडितावर आल्याने तो थोडा चिंतित झाला. पण क्षणभरच. एकच चर्चा राज्यात आणि राजवाड्यात व्हावी ती ही की एवढ्या उतारवयात पंडिताला विवाहापासून काय लाभ होणार आहे. असे होत असतानाच वेष बदलून स्वेच्छा राजवाड्यात प्रवेश करील.
ती कामिनीदेवींकडेच दासी म्हणून कार्यरत होईल म्हणजे पुढील सर्व कार्य सहजी करता येईल अशी त्याची योजना होती......... तसा सुदेश पंडित एक विक्षिप्त चेहऱ्याचा व्यक्ती होता. त्याचे आचार म्हणण्यापेक्षा अनाचारच जास्त होते. तो जारण मारण व इतर अघोरी विद्येचा वापर करीत असल्याचा त्याचा लौकिक होता. त्यामुळे त्याच्याकडे असाधारण जनांचाच राबता फार होता. त्यात महाराजांच्या शिस्तप्रियतेमुळे दुखावलेले काही राजकीय अधिकारीही होतेच. त्याने काही राजकीय लोक पकडून स्वतःच्या खास भुयारी कारागृहात ठेवलेले होते व त्यांचे मंत्रविद्येच्या साहाय्याने काहींचे पशू व पक्षांमध्येही रुपांतर केले होते अशीही वदंता होती. आणि ते काही प्रमाणात खरेही होते.
पंडित एक उभट चेहऱ्याचा, थोडा बसक्या गालांचा, गरूड नाकाचा पण भेदक डोळे असलेला, सुरकुतलेल्या त्वचेचा माणूस होता. जर तो कधी हसला तर त्याचे टोकदार दात पाहणाऱ्याच्या नजरेत भरत असत. जणू तो समोरच्या माणसाचा घासच घेणार, असे वाटावे. त्याच्या वयाचा नक्की अंदाज येत नसे. त्याचे शरीर मात्र चांगले भरलेले होते. अश्या चेहऱ्याखालचे शरीर हडकुळे, आणि कुणालाही आकर्षित न करणारे हवे. पण अगदी विरुद्ध होते. त्याला पाहणारे त्याचे वेगवेगळे चेहरे आणि व्यक्तिमत्व असल्याचे सांगत. त्यामुळे तो एक वादग्रस्त आणि भीषण असा माणूस होता. त्याचप्रमाणे तो प्रसंगाला साजेसा देह धारण करतो वगैरेही म्हटले जायचे. त्याच्याजवळ असलेल्या गुप्तवार्ता तो फक्त स्वतःजवळच ठेवीत असे. कोणी कितीही जवळीक साधली तरी त्याला ते कळत नसे. असो. प्रसंगानुसार त्याचे वर्णन पुढे येईलच.
(क्र म शः )

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा