Login

श्शू! आवाज कोणाचा? भाग ९

एक कथा
श्शू! आवाज कोणाचा? भाग ९

मागच्या भागात आपण बघीतलं की नयनाला यातून बाहेर काढण्यासाठी उपाय शोधायला हवा हे ठरलं.बघू या भागात काय होईल?

प्रतिक नयनाला या अवस्थेमधून बाहेर काढण्यासाठी डाॅक्टरांबरोबर इतरही उपचार करायला तयार झाला हे नयनाच्या आईबाबांसाठी समाधानाची गोष्ट ठरली.

नयनाच्या आईची एक मैत्रीण सुगंधा हिला एका स्वामींची माहिती आहे जे ध्यान लावून कोण त्रास देतय हो ओळखतात हे नयनाच्या आईला सुगंधाच्या तोंडून ऐकून माहिती होतं.

नयनाच्या आईने सुगंधाला फोन करून त्यां स्वामींचा नंबर विचारला.

"अहो माझ्या मैत्रिणीकडून सुगंधाकडून मी त्या स्वामींचा नंबर मिळवला आहे. कधी फोन करायचा?"
नयनाच्या आईने नयनाच्या बाबांना विचारलं.

" प्रतिकला विचारू मग कर फोन."
बाबा म्हणाले.

तेवढ्यात प्रतिक ऑफीसला जायला तयार होऊन आला तेव्हा त्याला नयनाच्या आईने विचारलं.

" प्रतिक त्या स्वामींचा नंबर मिळाला आहे. कधी करू फोन?" नयनाच्या बाबांनी प्रतिकला विचारलं.

"मला द्या नंबर मी आत्ताच फोन लावतो."

"बरं. हे घे. "
नयनाच्या आईने प्रतिकला नंबर दिला. प्रतिकने फोन लावला.
बराच वेळ फोन वाजला नंतर उचलल्या गेला.

"हॅलो"

"हॅलो मॅडम मी प्रतिक व-हाडपांडे बोलतोय. मला स्वामीजींना भेटायचं होतं."

"कशासाठी?" त्या फोनवर बोलणा-या मॅडमनी विचारलं

प्रतिकने फोनवर बोलणा-या मॅडमना काय काम आहे ते सांगितलं.

"एक मिनिट थांबा.मी अपाॅंईटमेट कधी देता येईल ते डायरी बघून सांगते."

"ठीक आहे."

"हॅलो स्वामीजींना परवा सकाळी अकरा वाजता वेळ आहे नंतर स्वामीजी महिनाभर इथे नाहीत. तुम्हाला चालणार आहे का ही वेळ?"
एक मिनिट विचार करून म्हणाला,

"हो चालेल. मला पत्ता सांगितला तर बरं होईल."

मॅडमने पत्ता सांगितला.

"वेळेच्या आधी दहा मिनिटे आश्रमात या. स्वामीजी वेळेचे फार पक्के आहेत." मॅडम म्हणाल्या.

"हो आधीच येऊ. आपली फी किती आहे?"

"दोन हजार रुपये."

"ठीक आहे. ते कसे द्यायचे?"

"इथे आल्यावर द्या. मग तुमच्या नावानी परवाची सकाळी अकरा वाजताची वेळ पक्की करू?"

"हो मॅडम पक्की करा." प्रतिक म्हणाला.

"ठीक आहे."

प्रतिकने फोन ठेवून परवा भेटण्याची वेळ मिळाल्याचं सांगितलं.

"बरं झालं लगेच फोन केला." नयनाची आई समाधानी चेह-याने म्हणाली.

"ठीक आहे मी निघतो आता ऑफीसला. नयना अजून झोपली आहे."

"हो जा तू ऑफीसला." नयनाचे बाबा म्हणाले.

प्रतिक ऑफीसला जायला निघाला.

***

सकाळी साडेदहा पर्यंत प्रतिक, नयनाचे आईबाबा नयनाला घेऊन त्या स्वामी सदानंदांच्या आश्रमात पोहचले. आश्रमात एकदम शांत आणि सात्विक वातावरण होतं कुठेही कसलाही भपका नव्हता.

स्वामी सदानंदांच्या शिष्या आणि शिष्य आश्रमातील कामांमध्ये गर्क होते. प्रतिक आणि नयनाचे आईबाबा आश्रमाची निरीक्षण करण्यात गुंतले होते पण नयना मात्र आपल्याच विचारात होती.

गेले पाचसहा दिवस ती कानात येणा-या आवाजाने हैराण झालेली होती. झोप तिला स्वस्थ लागत नसल्याने तिचे डोळे खोल गेले होते. डोळ्याभवती काळी वर्तुळ आली होती. खूप दिवसांच्या आजारपणाने माणूस जसा दिसू लागतो तशी नयना या गेल्या सहा दिवसातच दिसायला लागली होती.

प्रतिकचं मध्येच नयनाकडे लक्ष गेलं. त्याला तिच्याकडे बघून खूप वाईट वाटलं. इतकी हसरी खेळकर नयना या सहा दिवसांत कशी दिसायला लागली आहे. चेह-यावर आजारपणाची काळी सावली पसरलेली दिसतेय. जेवणखाण नीट जात नसल्याने तिची तब्येतही कृश झाली आहे. दु:खाने प्रतिकने एक ना: श्वास सोडला.

नयनाच्या आईबाबांच्याही डोक्यात नयनाचेच विचार चालू होते. या स्वामीजींच्या कृपेने नयना लवकर बरी होवो हीच प्रार्थना दोघेही मनातल्या मनात करत होते.

" तुझ्या मैत्रिणीला या स्वामींचा नंबर कोणी दिला सांगितलं तू?"
नयनाच्या बाबांनी नयनाच्या आईला विचारला.

" सुगंधाच्या मामेभावाला असाच काहीसा त्रास झाला होता तेव्हा त्यांना त्यांच्या ओळखीतल्यांनी या स्वामींच्या बद्दल सांगितलं होतं.सगळे उपाय करून थकल्यामुळे ती मंडळी आपल्या मुलाला घेऊन इथे स्वामींकडे आली होती."

" त्यांना फायदा झाला म्हणाली तू."

" हो. झाला नं फायदा.अहो तो मुलगा फक्त वीस वर्षांचा होता. सगळं आयुष्य त्याच्या पुढे होतं. आयुष्य काय त्याचं शिक्षणही पूरतं झालं नव्हतं. म्हणून सुगंधाचा मामा मामी फार चिंतेत पडले होते."

" खरय तो मुलगा वीस वर्षांचा होता आपली मुलगी अठ्ठावीस वर्षांची आहे.आपल्या मुलीचं लग्न झालंय पण अवघं आयुष्य आहे समोर.या स्वामींमुळे आपली नयना बरीच व्हायला हवी."
बाबा हळुच आपले डोळे पुसत म्हणाले.

" खरय.आता सगळ्या आशा स्वामीजींवर आहेत. आमची लेक या दुखण्यातून बाहेर काढा स्वामीजी."
नयनाच्या आईच्या डोळ्यातून मी कुठे गळत होती पण त्यांनी ती वाहून जाऊ दिली.

प्रतिकचं नयनाच्या आईबाबांसाठी लक्ष होतं. तोही त्यांच्या सारखा स्वामींवर आशा ठेवून होता.
विज्ञाननिष्ठ प्रतिक आता खूप‌वेगळा झाला होता.
परवाचं नयनाचं वाक्य त्याने जेव्हा ऐकलं.

'मला वेडं व्हायचं नाही.मी वेडी झाली तर माझा नवरा मला ठेवणार नाही'

या वाक्याने नयनाची अगतिकता,तिचं दु:ख प्रतिकच्या मनाला टोचलं आणि त्याने ठरवलं आपली विज्ञाननिष्ठा बाजूला ठेवून नयनांचे आईबाबा जसं म्हणतात आहे तसं करू.

***

एक शिष्य प्रतिकजवळ आला,
" सर तुम्हाला स्वामीजींना भेटायचं आहे नं?"

" हो." प्रतिक म्हणाला.

" स्वामीजींनी तुम्हाला आत बोलावलं आहे."

" माझ्या बायकोला त्यांना दाखवायचं आहे."

" हो. पण आधी तुम्ही आत चला स्वामीजींना भेटा मग तुमच्या बायकोला आत बोलावलं की घेऊन जाता येईल."

तो शिष्य हे प्रतिकबरोबर बोलत असताना नयनांचे बाबा उठून प्रतिक आणि तो शिष्य उभे होते तिथे आले.

" काय म्हणतात आहे?"

" बाबा मला आत बोलावलं आहे. मी त्यांना सांगतो सगळं.मग त्यांनी सांगितलं की तुम्ही नयनाला आत घेऊन या.असं हे म्हणतात आहे."

" ठीक आहे.जा तू."

प्रतिकने एकदा नयना कडे बघितलं. तिच कुठेही आजूबाजूला लक्ष नव्हतं. ती त्यांच्यातच होती. प्रतिक आणि तो शिष्य नयनाच्या इतकं जवळ उभं राहून बोलत होते तरी तिला या दोघांच्या बोलण्याची चाहूल लागली नव्हती याचं प्रतिकला आश्चर्य वाटलं.
तो शिष्याच्या पाठोपाठ आता गेला.

प्रतिक निरीक्षण करत होता. आतला हाॅल प्रशस्त होता. तिथे काही समुपदेशन पर विचार लिहिलेले होते.अगदी माफक सजावट होती हाॅलमध्ये. शांत आणि सात्विक वातावरण निर्माण करणारं श्लोक आणि संगीत इथेही अगदी हळू आवाजात ऐकू येत होतं जे बाहेरच्या खोलीत सुद्धा ऐकू येत होतं.

हाॅल नंतर डावीकडे आणखी एक मोठा हाॅल होता जिथे काही जण ध्यान धारणा करत होते. उजव्या बाजूला पण एक हाॅल होता तो कशासाठी होता हे प्रतिकला कळलं नाही. समोरचा व्हरांडा ओलांडून समोर असणा-या खोलीचं दार शिष्याने उघडलं आणि प्रतिकला खुणेनेच आत जायला सांगितलं.

प्रतिक आत शिरला. समोर एका मोठ्या चौरंगावर स्वामीजी बसलेले होते. त्यांचा चेहरा प्रसन्न होता प्रतिकने त्यांना नमस्कार केला.
"सुखी भव"

स्वामीजी म्हणाले आणि एक मंद हास्याची लकेर त्यांच्या चेहऱ्यावर आली. स्वामीजींचा हसरा चेहरा बघून प्रतिकला मनातून हायस वाटलं. आत्ता पर्यंत त्याच्या मनावर ताण होता तो नाहिसा झाला.

"बसा त्या खुर्चीवर" स्वामीजी प्रतिकला म्हणाले.

प्रतिक खुर्चीवर बसला.

"बोला तुम्हाला काय त्रास आहे?"

"मला त्रास नाही स्वामीजी मी माझ्या बायकोला घेऊन आलो आहे."

"काय झालंय त्यांना?"

स्वामीजींनी हे विचारताच प्रतिकने गेल्या चार पाच दिवसांपासून नयनाबरोबर जे घडतंय ते सांगितलं.

स्वामीजींनी हाताजवळ असलेली बेल दाबली. तत्क्षणी एक शिष्य आता आणि हात जोडून उभा राहिला.
" यांच्या बायकोला घेऊन ये."
स्वामीजी म्हणाले.
शिष्याने डोलावली आणि तो बाहेर गेला.

काहीवेळात नयनाला तो शिष्य घेऊन आला आणि तिच्या आईबाबांना त्याने बाहेरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. नाईलाजाने दोघं बाहेर थांबले.

नयनाला बसण्यासाठी शिष्याने एक खुर्ची दिली.नयना यंत्रवत खुर्चीवर बसली. नयनाचं स्वामीजींकडेपण लक्ष नव्हतं.

स्वामीजींनी काही क्षण नयनाकडे बघीतलं आणि नंतर स्वामीजी डोळे मिटून बसले. जवळपास दहा मिनिटे स्वामीजींनी डोळे मिटले होते.

प्रतिकला स्वामीजी डोळे मिटून का बसले आहे ते कळत नव्हतं.

काही वेळाने स्वामीजींनी डोळे उघडले. प्रतिकला म्हणाले,

" तुमच्या बायकोच्या कानात खरच कोणीतरी बोलतं.

" कोण बोलत असेल?
प्रतिकने प्रश्न केला.

"मी ध्यान लावून तेच बघायचा प्रयत्न केला. एक अतिशय शांत आणि निरूपद्रवी स्त्री होती. जी आता नाही.तिला जो त्रास भोगावा लागला त्यामुळे तिने आत्महत्या केली. तिचा जीव गेला पण तिच्या अनेक इच्छा राहिल्या तसंच तिची काही चूक नसताना तिला दोषी ठरवल्या गेल्याने ती निराश झाली.आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ तिच्यात नव्हतं. त्यामुळे तिने आत्महत्या केली. असे आत्मे फिरत असतात.त्यांना पुढे वर जाता येत नाही.

जेव्हा त्यांच्या स्वभावाशी मिळत्याजुळत्या स्वभावाची व्यक्ती दिसली की त्यांना मदत करायला धावतात. तशी ही स्त्री तुमच्या बायकोला मदत करायला आली आहे.ही मदत तिने केली तर कदाचित तिचा पुढचा मार्ग सुकर होईल. हे मला कळलं.

"बापरे! म्हणजे नयनाच्या अंगात तो आत्मा आहे." प्रतिकने घाबरून विचारलं.

"नाही.तो आत्मा इतका आक्रमक किंवा दुष्ट नाही.त्याला फक्त तिच्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या बायकोच्या बाबतीत घडू नये असं वाटतं म्हणून त्यांना मदत करायचा प्रयत्न तो आत्मा प्रयत्न करतोय."

"मदतीपेक्षा माझ्या बायकोला त्रास होतोय. तिची अवस्था आम्हाला बघवत नाही. असच होत राहिलं तर माझ्या बायकोला मदत होणारच नाही याउलट ती वेडी होईल. हे असं नको व्हायला. यातून बाहेर पडण्यासाठी कोणता मार्ग आहे?" प्रतिकने विचारलं.

"मी पुन्हा ध्यान लावतो. त्या आत्म्याशी बोलतो मग सांगतो. पण याला वेळ लागेल. कोणताही आत्मा लगेच बोलत नाही.तुम्हाला थोडं थांबावं लागेल. " स्वामीजी म्हणाले.

"थांबतो मी माझ्या नयना चांगलं बरं करा."

स्वामीजी पुन्हा तसंच मंद हसले आणि त्यांनी ध्यान लावलं.
प्रतिक कधी नव्हे तो देवाचा धावा करू लागला.
_________________________________
स्वामीजींशी तो आत्मा बोलेल का? बघू पुढील भागात.


0

🎭 Series Post

View all