मागील भागात आपण बघीतलं की स्वामीजींनी नयनाची समस्या दूर केली. पुढे बघू.
त्या दिवशी नयनाला स्वामीजींकडून घेऊन आल्यावर प्रतिकने नयनाच्या आईबाबांना स्वामीजी काय म्हणाले ते सांगितलं.
या गोष्टीला आता चार पाच दिवस होत झाले. नयना आता ब-यापैकी सावरली होती. आता एकदोन दिवसांत नयना ऑफीस जाॅईन करणार होती.
प्रतिक आणि नयनाचं आयुष्य छान सुरळीत चालू होतं. आणि अचानक या अनोळखी आवाजाने दोघांच्या आयुष्यात धुमाकूळ घातला.
त्या उठलेल्या वादळातून बाहेर पडताना प्रतिक आणि नयना दोघांचाही चांगला कसं लागला.
आज खूप दिवसांनी प्रतिक निश्चिंत मनाने ऑफीसला जाणार होता.
माणसाने स्वतःचं आयुष्य जगताना माफक इच्छा अपेक्षा ठेवाव्यात हे प्रतिकला स्वामीजी म्हणाले तेव्हा त्याला ते पटलं.
स्वामीजी म्हणाले होते,
" माणसाच्या या जन्मातील इच्छा; ज्या अपूर्ण राहिल्या आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा जन्म घ्यावाच लागतो.
शांत आणि सूखी जीवनाची गुरुकिल्ली आहे ती म्हणजे आपल्या इच्छांवर संयम ठेवणे.
शांत आणि सूखी जीवनाची गुरुकिल्ली आहे ती म्हणजे आपल्या इच्छांवर संयम ठेवणे.
या तरूण मुलीच्या इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे ती भटकतेय. तिला साजेस वातावरण जिथे मिळेल तिथे ही पुन्हा जन्म घेईल.
तुम्ही आता काही काळजी करू नका. पुन्हा तो आवाज तुमच्या बायकोच्या कानात येणार नाही. तुम्ही ही या आवाजाचा उल्लेख कधी करू नका"
स्वामीजी म्हणाले. त्यांना होकारार्थी मान हलवत प्रतिकने त्यांना पुन्हा नमस्कार करून नयनाला घेऊन त्यांच्या खोलीबाहेर पडला.
हे सगळं आत्ता प्रतिकला ऑफिसची तयारी करताना आठवलं.
" स्वामीजी म्हणतात ते खरच आहे. इच्छा अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेऊन माणूस जगू शकत नाही. आपणही तसं जगायचा प्रयत्न करायला हवा पण हा जाॅब, जाॅबमध्ये मॅनेजमेंट कडून एम्प्लाॅई कडून केल्या जाणा-या अपेक्षा इतक्या टोकाच्या असतात की त्या पूर्ण करता करता एम्प्लाॅईला जीव नकोसा होतो. स्वामीजींचं म्हणणं पटलं तरी आजच्या युगात आपण असं कसं जगू शकू! स्वामीजी तुम्ही सांगता ते पटलं तरी आताच्या जगात आम्ही नाही असं वागू शकत."
एक दीर्घ उसासा सोडून प्रतिक तयार होऊन ब्रेक फास्ट करायला बाहेर आला.
" प्रतिक ब्रेक फास्ट करतोय आणू का?"
नयनाच्या आईने प्रतिकला विचारलं.
नयनाच्या आईने प्रतिकला विचारलं.
" हो. "
असं म्हणून प्रतिक डायनिंग टेबलवर येऊन बसला. नयनाच्या आईने आज प्रतिकला आवडतात तसे आलू पराठे आणि टोमॅटोची चटणी केली.
ब्रेकफास्टला आलूपराठे आणि टोमॅटोची चटणी बघून प्रतिकच्या तोंडून
" वाॅव"
असा उद्गार सहज निघाला.
" वाॅव"
असा उद्गार सहज निघाला.
" आज खूप दिवसांनी तू शांत पणे ऑफीसला जाणार म्हणून तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवला."
नयनाची आई म्हणाली.
नयनाची आई म्हणाली.
" खरय आई. आज खूप रिलॅक्स वाटतय. गेले काही दिवस डोक्यावर ताणाचं गाठोडं आणून ठेवल्या सारखं वाटत होतं."
" प्रतिक आता संकटांचे ढग वितळले आहेत आता काळजी नको करू.आता भविष्याकडे वाटचाल सुरू करायची आहे.कळलं नं?"
प्रतिकला नयनांचे बाबा म्हणाले.
" हो बाबा. तुम्ही म्हणता ते खरंय.आता फक्त भविष्याकडे वाटचाल सुरू करायची.गेले आठ दिवस जे घडलं ते भूतकाळात जमा करून शांत बसायचं."
प्रतिक म्हणाला.
प्रतिक म्हणाला.
" गुड." नयनाच्या बाबांच्या चेहे-यावर आनंद झळकला.
***
आज ऑफीसमध्ये प्रतिक खूप आनंदात आलेला आहे हे प्रतिकच्या मित्राच्या आनंदच्या लक्षात आलं तसा तो प्रतिकच्या टेबलपाशी आला.
आज ऑफीसमध्ये प्रतिक खूप आनंदात आलेला आहे हे प्रतिकच्या मित्राच्या आनंदच्या लक्षात आलं तसा तो प्रतिकच्या टेबलपाशी आला.
" क्यां बात हैं! आज प्रतिकराव एकदम प्रफुल्लित चेहे-याने ऑफीसमध्ये आले. मस्त आज असं तुला असं आनंदी चेह-याने आलेला बघून खूप छान वाटतंय."
आनंद म्हणाला.
" हो यार मला पण आज खूप रिलॅक्स वाटतय. ते पाचसहा दिवस म्हणजे किती वर्ष आपण संकटात आहोत असं मला वाटत होतं. रोज आपलं आयुष्य किती निर्धोकपणे आणि सुरळीत चालू असतं हे आपल्या वर कोणतं संकट आलं की कळतं. मग तेव्हा वाटतं आपण नसलेल्या अडचणींना आणि संकटांना का महत्व देतो? एखादी छोटीशी गोष्ट नाही मिळाली की आपल्या आयुष्यात केवढी उलथापालथ झाल्या सारखं आपण वागतो. खरच माणसाचं मन हे कधीच तृप्त आणि समाधानी नसतं म्हणून असं घडतं. संकटाने आपल्याला वेढलं की मग सगळं जाणवतं."
एका दमात प्रतिकने मनातील कोंडमारा व्यक्त केला.
आनंदने प्रतिकच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं,
" खरय तुझं म्हणणं. आपण खूप अपेक्षा करतो आपल्या आयुष्याकडून. ठीक आहे आता सगळं संपलय. तेव्हा फार विचार करू नकोस. नयना वहिनी आता ठीक आहे म्हणजे तू त्या फाॅरेन डेलीगेट्स समोर द्यायचं प्रेझेन्टेशन आता तयार करू शकशील."
" हो आता करू शकेन. नयनाचे आईबाबा राहतील या आठवडाभर. मी सांगेन त्यांना. ते असले की प्राॅब्लेम नाही. तसही नयना काल म्हणाली की या एकदोन दिवसांत ती ऑफीस मध्ये जायला लागणार आहे."
" नयना ऑफीसमध्ये जायला लागल्यावर मग काहीच प्राॅब्लेम येणार नाही .प्रतिक तू खूप छान पद्धतीने हा प्राॅब्लेम हॅण्डल केला. अशावेळी पॅनिक झाला असतास तर कदाचित या प्राॅब्लेम वर उपाय सापडण्याऐवजी त्यात अजून कटकटी निर्माण झाल्या असत्या."
" हो अगदी बरोबर बोललास. चल जे काही घडलं तो आता इतिहास झाला असं समजून त्यावर फार विचार करणार नाही."
" शाब्बास पठ्ठे."
असं म्हणत आनंदने प्रतिकच्या पाठीवर शाबासकी दिली.
" प्रतिक साहेब तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलावलं."
तुकाराम चपराशीने साहेबांनी बोलावलंवल्याचं सांगितलं.
" हो" असं म्हणत प्रतिक जागेवरून उठला आणि साहेबांच्या केबिनमध्ये गेला.
***
नयनाच्या आयुष्यात त्या आवाजाने खूपच उलथापालथ केली होती पण त्यावेळी नयनाचा सहचरी म्हणून प्रतिकने खूप धीराने आपली वागणूक ठेवली. त्यामुळे नयनाच्या आयुष्यात निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढणं सहज शक्य झालं.
प्रतिक विज्ञाननिष्ठ असल्याने तो प्रथम निसर्गात वावरणा-या दुस-या जगावर विश्वास ठेवायला तयार नसतो पण प्रसंग ओळखून त्याने आपल्या विचारांवर संयम ठेवून स्वामीजींकडे जाण्याचा पर्याय मान्य केला. यातून एक गोष्ट आपण शिकू शकतो की वेळ काळ आणि प्रसंग कोणता आहे ते बघून आपल्या तत्वांना मुरड घातली पाहिजे. अशी मुरड घालून जर सद्य परिस्थितीत आलेली समस्या आपण दूर करू शकत असू तर भविष्यातील गोष्टींवर लक्ष ठेवून आपण आपल्या तत्वांना मुरड घालायला हवी.
तत्त्वांना मुरड घालणं म्हणजे तत्त्वांची नकोतशी गळचेपी करायचं असं नाही. काही काळापुरतं आपली तत्व बाजूला ठेवून सद्य परिस्थितीवर मात करण्यासाठी योजना आखणं हे होय. जे प्रतिकनं केलं. म्हणून नयनाच्या आयुष्यात उद्भवलेल्या प्रसंगातून मार्ग निघाला.
प्रतिक हा माझ्या कथेचा नायक असला तरी तो सर्व सामान्य माणूस आहे. सुशिक्षीत आहे विज्ञान निष्ठ असल्याने तो या प्रसंगांमुळे चटकन बावचळला नाही. न घाबरता बायकोचा त्रास समजून घेणारा, तिला जपणारा, वेळ आली तर स्वतःची तत्व बाजूला ठेवून नयनाच्या त्रासावर उपाय शोधणारा माझ्या कथेचा नायक हा बाॅलीवूडच्या हिरो एवढाच नाही तर काकणभर जास्तच सरस आहे.
ही कथा मालिका पूर्ण पणे काल्पनिक आहे. या कथेमधून खूप बीभत्स दृश्य दाखवायची नव्हती कारण माझा उद्देश होता की माणूस जेव्हा सरळपणे आयुष्य जगत असतो तेव्हा थोडंसं म्हणजे अगदी जवा एवढं दु:ख वाट्याला आलं तरी त्याला आयुष्यात वादळ आल्यासारखं वाटतं. या वादळाची फक्त चुणूक म्हणून हा कानात येणारा आवाज हा प्रसंग घेतला.
आयुष्याचं वस्त्र असंच सुख दुःखाने विणलेलं असतं. त्यात जर एकमेकांना समजून घेणारे समजूतदार जीवनसाथी मिळाले तर ते न कुरकुरता, न घाबरता संकटांचे डोंगर सहिसलामत पार करू शकतात.
या कथा मालिकेला जबरदस्त थरार असं म्हणण्याचा अट्टाहास नाही. संयमीत स्वरूपात थरार देऊन कुटुंबातील बाकी नातेसंबंध सुद्धा दाखवायचा प्रयत्न केला आहे.
वाचकांना ही थरार कथा आवडेल अशी आशा करते.
_________________________________
कथा मालिका समाप्त
_________________________________
कथा मालिका समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा