ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
काही महिन्यांपूर्वी धुमधडाक्यात गायकवाडच्या घरी त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं म्हणजे आरवचे लग्न लागले. नववधूच्या वेशात कावेरी खूपच सुंदर दिसत होती. तिच्या वडिलांनी म्हणजेच राघव शिंदे यांनी त्यांच्या लग्नात कोणतीच कमतरता ठेवली नव्हती. मुलाकडचे पाहूणे, त्यांचे पाहुणे, इतर नातेवाईक सगळ्यांचाच मानपान त्यांनी अतिशय योग्य रीतीने आणि चांगलाच केला होता.
आरव एका आयटी कंपनीत हेड डिपार्टमेंटमध्ये कामाला असल्यामुळे पगार देखील चांगला होता त्याला. हाताखाली चारचाकी, नावावर एक फ्लॅट असताना देखील त्याच्या आईने म्हणजेच सुविधा काकूंनी शिंदे यांच्याकडे हुंडा मागितला होता.
कावेरी मध्ये सगळे चांगले गुण असताना, ती चांगली शिकलेली असताना देखील फक्त कामाला नाही म्हणून, आणि आमच्या मुलालाच तिला आयुष्यभर सांभाळायचे आहे असं सांगून त्यांनी काही रोख रक्कम शिंदे यांच्याकडून साखरपुड्या नंतर हुंडा म्हणून घेतली होती.
लग्न झाल्यावर आरव आणि कावेरी दोन दिवसांसाठी फिरायला शहराबाहेर जाऊन आले. जाण्याआधी असलेली आईच्या रुपातील सुविधा काकू आणि कावेरी तिकडून आल्यानंतर तिच्या समोर आलेली सुविधा काकू यात जमीन अस्मानचा फरक होता. सुरुवातीला कावेरीला वाटले की त्या स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला घेऊन हळव्या झाल्या असतील. म्हणूनच त्या आपला राग राग करत आहेत. परंतु, तिचा हा भ्रम लवकरच दूर झाला.
एकेदिवशी...
" काय गं... लग्नाला दोन महिने झाले तरी तुझे बाबा आले नाहीत तुला भेटायला? विसरले की काय तुला एवढ्या लवकर?' संध्याकाळच्या वेळी झाडू मारत असताना सुविधा काकूने कावेरीला चांगलेच धारेवर धरले.
" ना... नाही आई. असं का बोलत आहात पण तुम्ही?" कावेरी गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली.
" असं नाही, मग कसं गं? हं... तुझा बाप म्हणाला होता राहिलेले पैसे लग्नानंतर देतो म्हणून. मग... कुठे आहेत पैसे?" सुविधा काकूने तिच्या हातातला झाडू हिसकावून तिच्या पायावर जोरात मारला.
" आईss आईss गं... कुठले पैसे आई? बाबांनी सगळे पैसे तर दिले ना साखरपुड्या नंतरच तुम्हाला. आता कुठले पैसे?"
" मला उलट बोलतेस?" ती बोलत असताना सुविधा काकूने अजून एक फटका तिच्या पायावर मारला.
" नाही आई. मी तुम्हाला उलट नाही बोलत. परंतु, माझ्या बाबांनी खरंच तुम्ही सांगितले तेवढे पैसे दिले तुम्हाला." पाय चोळत कावेरी रडू लागली.
" मग काय झाले? ते तेवढ्या पुरतेच होते. आता नको का अजून पैसे? तुला दोन महिने पोसले ना आम्ही. तुला फिरायला पाठवले. तुझ्यासाठी कपडे, दागिने घेतले. याचा खर्च कोण देणार? तुझाच बाप देणार ना..." सुविधा काकूने तिचे केस पकडले.
" आsss आईss सोडा मला. हे बघा, आता पर्यंत तुमचा मान ठेवायचा म्हणून गप्प होते पण आता नाही. माझ्या बाबांनी तुम्हाला दिले पैसे ते दिले आता यापुढे ते एक नवा पैसा तुम्हाला देणार नाही. समजलं ना..." कावेरीने त्यांच्या हाताला हिसका दिला.
" अच्छा... इतकी तुझी मजल. थांब दाखवते तुला आता या सुविधाचा धाक." सुविधा काकू तिला बोलून आत किचनमध्ये आल्या. हाताला काही भेटतंय का ते पाहू लागल्या. तेवढ्यात त्यांची नजर एके ठिकाणी स्थिरावली. ती वस्तू पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी हास्य उमटले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा