शुभारंभ भाग ५
क्रमश: भाग ४
प्राजक्ता " छे आता कुठे .. किती वर्ष झाली मी पेंटिंग्स बनवणे सोडून दिले . आणि आता मला ते जमेल असे वाटत नाही . "
ओम " अरे .. पेंटीग्स हि कला आहे जी येते ती यतेच .. जरी गॅप पडली तरी काही विसरायला होत नाही .. मुख्य म्हणजे यात तुला आनंद मिळेल . "
प्राजक्ता " काय करू पण पेंटीग्स बनवून .. आता काही स्पर्धा वगैरे पण नाहीये . कॉलेज मध्ये होते तेव्हा अशा वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या "
ओम " अग , तु करायला तर सुरुवात कर ?मग बघू त्याचे काय करायचे ते .. सुरुवात केलीस कि आपोआप त्यातून काहीतरी मार्ग निघेल . "
प्राजक्ता " हमम.. " तिला काही ते फारसे पटलेले नव्हते .. हे काय ?आता चित्र कशी काढणार ? तेव्हा लग्नाच्या आधी कशा छान कल्पना यायच्या .. आता काय तिला तरी हे शक्य वाटत नव्हते .
झाले बोल बोलता जेवण झाले .. ११ वाजले तसे दोघे घरी आले . घरी मुले जेवून झोपून गेली होती . प्राजक्ता ने मुलांच्या अंगावर चादर वैगरे टाकली आणि ती पण झोपायला गेली .
ओम " उद्या मी येईन घरी तेव्हा मला एक चित्र तयार पाहिजे .. काय ?"
प्राजक्ता " उद्या .. लगेच .. नाही रे सगळे सामान आणायला लागेल .. कॅनवास , पेंट्स , ब्रश , सगळे सामान आणावे लागेल .. आणि आणायला आणू रे पण त्याचा उपयोग झाला तर बरे नाहीतर उगाच पडून राहील ते सामान "
ओम " पडून ठेवायचं का नाही हे तुझ्या हातात आहे .. "
बोलता बोलता त्याने तिला एक बॅग दिली त्यात तिचे पेंटीग्स चे सगळे सामान होते . ऑफिस मधून येताना त्याने आधीच आणून ठेवले होते .
ओम "ह्यातले मला काही कळत नाही .. जर काही राहिले असेल तर उद्या तू जाऊन आणशील "
प्राजक्ताने ती बॅग ओपन केली आणि आज कितीतरी दिवसांनी तिने ते पेंटीग्स चे ब्रश हातात घेतले .. तिला आता रात्री १२ वाजता एखादे चित्र कागदावर रेखाटावे असे वाटू लागले होते .
प्राजक्ता ला आज पॉसिटीव्हली विचार करावा सा वाटत होता .. ठीक आहे .. नोकरी तर नाहीच मी करू शकत . पण मी नक्की काय करू शकते .. मला काय केल्यावर सगळ्यात जास्त आनंद होईल .. पैसा कमवणे हा तर नक्कीच हेतू नाहीये ..
ओम ने लगेचच त्याच्या वागण्यात बदल करून एकाच दिवसात तिला त्याच्यासाठी ती किती महत्वाची आहे हे दाखवून द्यायला सुरुवात केली होती . quality टाईम एकत्र घालवणे हे अतिशय महत्वाचे आहे मग नाते कोणतेही असो .. त्याला योग्य ती स्पेस आणि योग्य तेवढा quality time देणे गरजेचे आहे . आपल्या घरासाठी आपण किती महत्वाचे आहोत हे तिला माहित तर होतेच पण आता त्यावर विश्वास पण बसला होता . एका गृहिणीला हा विश्वास असणे फार महत्वाचे आहे . आणि हा तिचा विश्वास डळमळणार नाही याची जवाबदारी घरातील बाकीच्या सदस्यांची असते . म्हणजे तिला स्वतःच्या अस्तित्वाची लाज वाटत नाही . आधी स्त्रीला आपल्या घरातल्या लोकांकडून सन्मान मिळाला पाहिजे तो जर नाही मिळाला तर तिला आपल्या अस्तित्वाची लाज वाटयला लागते. त्यात सुद्धा तिच्या नवऱ्याची जवाबदारी जास्त असते .
असे म्हणतात " ट्रीट हर लाईक अ क्विन(queen ) शी विल मेक यु हर किंग "
किती छान ना .. तिच्या मनाचा राजकुमार होण्यासाठी तिला राजकुमारी सारखे वागवा .. तुम्ही आपोआप तिच्या मनाचे राजे बनाल .
मोटिव्हेशन आणि इन्स्पिरेशन हे दोन वेगळे शब्द आहेत पण ते एकमेकांना पूरक आहेत . इन्स्पिरेशन मिळाल्यावर माणूस मोटिव्हेट होऊन काम करतो . आता हे इन्स्पिरेशन कुठून मिळते .. तर ते विचारातून मिळते . चांगल्या थॉट्स, चांगल्या गोष्टी पाहिल्याने मिळते आणि ते मग माणसाला काहीतरी करावेसे वाटते आणि मग तो काहीतरी असे करतो कि जे करायची ताकद त्याच्या मध्ये नव्हती .
या सगळ्या आधी आत्मविश्वास जागृत होणे पण गरजेचे होते . विनाकारण माणूस एखाद्या गोष्टीला नकार घंटा लावायला लागला कि समजा त्याचा आत्मविश्वास कमी झालाय . प्राजक्ताचा पण आत्मविश्वास तिला मागे खेचत होता जोपर्यंत ती एकदा पेंटींग करत नाही तोपर्यंत तिचे एक मन तिला मागे खेचतच राहणार .. त्यामुळेच कि काय ओम ने तिला सर्व सामान आणून दिले .. आणि लगेच उद्या पेंटिंग बनवायला सुरुवात कर असे पण सांगितले " शुभस्य शिघ्रम "
प्राजक्ता संसारिक जवाबदारी मध्ये इतकी अडकून गेली होती कि साधा ९ ते ५ जॉब ती करूच शकत नव्हती त्यामुळे तिला असेच काहीतरी करावे लागणार होते कि ज्यात यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम करावे लागणार होते . पेंन्टींग्स हा एक हॉब्बी असू शकतो पण त्यातून जर अर्थाजन करायचे झाले तर त्याची शक्यता दूर दूर पर्यत दिसत नाही .
कदाचित हाच एक मुद्दा तिला कुठे तरी सारखा जाणवत होता कि “आता चित्र काढून मी काय करू ? काय घरात प्रदर्शन मांडू?” असे ती पटकन ओम ला म्हणाली
ओम " अरे .. ग्रेट .. सही आयडिया दिलीस .. आपण तुझी आर्ट गॅलरी तयारी करु . आपण त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन भरवू शकतो .. आणि मला खात्री आहे ह्या प्रदर्शनाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल .. कारण मी तुझी पेंटीग्स पहिली आहेत .. यु आर अँन अमेझिंग आर्टिस्ट "
प्राजक्ता " काही पण काय बोलतोस ओम "
ओम " अरे .. तू कर तर सुरुवात .. बाकीचे मी बघतो .."
त्या रात्री प्राजक्ता एकदम शांत पणे झोपली . तिचे अर्धे टेन्शन तर गेलेच होते .. आता अगदी खूप मोठी आर्टिस्ट म्हणून नावा रुपाला नाही आले तरी आपला नवरा मला समजून घेऊन माझ्या साईडला उभा आहे हे कळल्यावर तिच्या मनाला उभारी आली होती .
दुसऱ्या दिवशी सगळी कामं झाल्यावर तिने स्वतःची सगळी सर्टिफिकेट बाहेर काढली . दोन मोठ्या फाईल भरून ढीग भर अशी तिची शाळा कॉलेज मधली सर्टिफिकेट्स होती .एकेक करून ती स्वतःची सर्टिफिकेट्स पाहू लागली .. एकेक सर्टिफिकेट पाहुन झाल्यावर तिला असे वाटायचे कि काय उपयोग याचा? नुसता कागद आहे माझ्यासाठी ? काही उपयोग नाही ? उलट माझ्या पेक्षा कशातच न भाग घेणाऱ्या मुली आज कुठेतरी छोटा मोठा का होईना पण जॉब करतच आहेत. .. ठीक आहे जॉब नाही तर नाही पण मी माझ्यासाठी यातलं काहीतरी केलंच पाहिजे .. ओम म्हणतो तसं मला आनंद मिळेल असे काहीतरी मी केलच पाहिजे .
सर्टिफिकेट्स बघताना तिला हे तर कळलेच होते कि ह्या सगळ्या सर्टिफिकेट मध्ये सगळ्यात जास्तीची सर्टिफिकेट्स ड्रॉईंग आणि पेंटीग्स ची आहेत .. मनात वीज संचारावी तशी ती पटकन उठली आणि ओम ने काल दिलेले पॅकेट ओपन केले त्यातले सगळे बाहेर काढले . पेंटीग्स चे सर्व सामान पेपर , कलर्स, ब्रश , स्टॅन्ड , कॅनवास बाहेर गॅलरीत आली .
घरातल्या गॅलरीत खूप फुलझाडे तिनेच लावलेली होती .
घरातले थोडे काम उरकून सासूबाईंना आणि स्वतःचे जेवण करून घेतले आणि गॅलरी मध्ये बसली . त्यातल्याच एका झाडावर तिची नजर सारखी जात होती . एक कुंडीतल्या झाडाला एकच ऑरेंज कलर चे मोठे फुल आले होते .
आज बऱ्याच दिवसन्नी प्राजक्ताने ब्रश हातात घेतला होता .. त्यामुळे आधी डायरेक्ट कॅनवास वर न करता तिने कागदावर ब्रश ने चित्र काढायला सुरुवात केली .. पटापटा ब्रश च्या रेघोट्या त्या कागदावर मारू लागली .. एकमेकात रंग मिसळू लागली ..एकमेकांत रंग मिसळताना तिच्या चेहऱ्यावर चे भाव पण बदलत होते.. त्या कामात इतकी गर्क झाली होती .. तिचे पाठमोरे रूप जर पाहिले तर एक सौदर्यवती आपल्या बोटांनी त्या कागदावर जादू करून ते कुंडीतले झाड तसेच्या तसे त्या कागदावर उमटवत होती .हे सर्व काम ती गॅलरीत बसून करत असल्याने मध्ये हवेची एखादी झुळूक यायची आणि तिच्या केसांची बट हलकीशी हलून तिच्याच गालावर तिला गुदगुल्या करत होती आणि अनावधानाने ती ते मऊ केस ती त्याच रंगाच्या हाताने बाजूला करताना तो ऑरेंज रंग तिच्या गालाला लागल्याने तिच्या रूपाला चार चांद लागले होते .. काश कि हा नजारा ओम ला बघायला मिळाला असता .. तिला पुन्हा लग्नाची मागणी घालायला गेला असता .
हो . हे अगदी खरं आहे .. ओम तिच्यापेक्षा २ वर्षांनी सिनिअर होता .. तिच्याच कॉलेज मध्ये होता .. कॉलेज मध्ये अशाच पेंटींग च्या एका स्पर्धेत प्राजक्ताने भाग घेतला होता .. आणि आता आज जशी तेजस्वी दिसत होती ना तेव्हा पण ती तशीच त्या पेंटींग च्या रगांमध्ये मध्ये स्वतः हरवून गेली होती .. तिच्या बाजूला अनेक मुलं ,मुली तिचे पेंटींग बघत होते .. त्यातच एक ओम होता .. ओम तिच्या या बोटांच्या जादूवर इतका भाळला होता आणि तिला अशीच पाठमोरी पाहून तो तिथेच थांबला होता .. तिला गुदगुल्या करणारे केस स्वतःच्या हाताने बाजूला करू कि काय असा मोह त्याला झाला होता ..
आणि मग ह्या प्राजक्ता नावाच्या मनमोहिनी च्या प्रेमात पडला .. तिला तर पटवलेच होते पण तिच्या घरी एकटा जाऊन मागणी घालून आला होता .. तिला आपली सहचहरणी बनवे पर्यंत त्याने तिचा पिच्छा सोडला नाही .
आज हे चित्र काढताना प्राजक्ता दोन मिनिटे भूतकाळातच गेली होती
बोल बोलता प्राजक्ताने कुंडीतले ते झाड आणि झाडावरचे ते मोठे फुल हुबेहूब ब्रश आणि कलर च्या साहाय्याने कागदावर उमटवले . जसे जसे चित्र तयार होत गेले तसा आनंद वाढत गेला .
सासूबाई " प्राजक्ता .. आता निघ हो .. नाहीतर मुलांना वाट बघावी लागेल तुझी "
थोडेसे फिनिशिंग टच राहिले होते तर मुलांना आणायला जायची वेळ झाली आणि ती तशीच मुलांना आणायला गेली ..
प्रथमेश " आई .. तुझ्या हाताला काय लागलेय ?"
प्राजक्ता " अरे ते रंग लागलेत .. "
प्रथमेश " आई तू आज काय लहान मुलांसारखी रंगात खेळत होतीस का ?"
प्रिया " आई .. तू माझे रंग का वापरलेस ? माझे शाळेचे आहेत ना ते रंग ?"
प्राजक्ता " नाही ग ,, बाळा तुझे रंग नाही वापरलेत .. तुम्हला घरी गेल्यावर कळेल मी रंगात काय करत होते ते ?"
मुलांचे नाश्ता पाणी झाल्यावर प्राजक्ताची ऍक्टिव्हिटी तिने प्रियाला दाखवली ..
प्रिया " वॉव आई .. मला पण शिकव ना .. किती छान ड्रॉईंग काढलेस तू ?"
आज स्वतःवर प्राजक्ताला थोडासा तरी अभिमान वाटला होता.. तिला आज ओम घरी लवकर यावा आणि मी काढलेले हे चित्र त्याने बघावे असे वाटू लागले होते . बहुदा आज तिला तिचा नक्की आनंद कशात आहे ते कळले होते ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा