तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥
शुभ लग्न......
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥
शुभ लग्न......
सावधान.... असं म्हणत तिने तिच्या खास मैत्रिणीच्या दिशेने अक्षता टाकल्या..
तिने म्हणजे रावीने...
रावी राघव पाटील..!
गुलाबी रंगाची सेमी पैठणी.. ज्यावर मोराची नक्षी आणि सोनेरी रंगाची बॉर्डर.. राघव ने आग्रह केला म्हणुन आज केसांना मोकळे सोडले.. आणि त्याने तिच्यासाठी आणेलला गजरा तिने स्वतःच्या मोकळ्या केसांवर मोकळाच सोडुन दिला होता. दिसायला जणु अप्सराच. त्यात जर ती अशी सजली तर तिच्या केसांपासुन ते पायांच्या नखांपर्यंत नजर फिरवल्याशिवाय तिच्या समोरून कोणी जात नव्हतं..
शेवटची मंगलाष्टका भेटजींनी म्हटली आणि रावीने पुन्हा एकदा मोठ्यानेच सावधान असे म्हटले..
हातातील अक्षता नवरीच्या दिशेने धुडकावून लावत तिने स्वतःचे हात दोन्ही झटकले. रंगीत तांदूळ हातावर रंग सोडुन गेलेले.
"ह्म्म्म... ह्याला पुस.." तिच्या शेजारी उभ्या असलेला राघवने स्वतःचा हातरूमाल तिच्या समोर धरला.
ओठांवर स्मित आणत तिने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट त्याला कळायची..
"थेंक्स..! " असं म्हणत त्याच्या हातुन रुमाल काढुन घेतला तिने..
हात पुसले आणि ती पुन्हा खुर्चीवर बसली.
"अग रावी.. कशी आहेस? " तिच्याच कॉलेज मधली मैत्रीण पल्लवी तिला भेटली.
" तु कशी आहे..? आणि किती दिवसांनी भेटलीस..? तरी मी राघवला बोलली... मला काहीही करुन साक्षीच्या लग्नात घेऊन चल.. सगळेच मिळतील मला.. "
असं म्हणत खुर्चीवरची उठुन ती उभी राहिली आणि तिने पल्लवीला घट्टशीर मिठीच मारली..
राघव मात्र स्वतः च्या मुलाला स्वतःच्या मांडीवर घेऊन बसला होता.. रावीला खुश झालेलं बघुन तो सुद्धा खुश होतं होता.
"हा तूझा नवरा का? " चेहऱ्यावर विशिप्त भाव आणत रावीने राघव वरून नजर टाकली आणि दबक्या आवाजातच रावीला प्रश्न केला.
"हो.. " रावी ने ओठांवर स्मित उमटवत म्हटले.
रावीचा हात पकडत पल्लवीने तिला बाजुला आणले..
"काय झाल? " रावीने तिला विचारलं.
"काय करतो तूझा नवरा .?? " पल्लवीने विचारलं.
"कंपनीत कामाला आहे.. " ती म्हणाली.
"कंपनीत? आय मिन कंपनीला नाव आहे कि नाही.? " पल्लवी जणु रावीचा इंटरव्हिव घेण्याच्या मुड मध्ये होती..
"मोटो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड..! तिथे अकाउंटच सगळ बघतो.."
"काय म्हणतेस.. अशी कोणती तरी कंपनी आहे, हे पहिल्यांदाच ऐकलं तुझ्या तोंडून.. आणि काय ग रावी... तुला दुसर कोणी भेटलं नाही का लग्न करायला.. लूक एट यु एन्ड लूक एट हिम.. काय दिसतो ग तो. ह्याच्या पेक्षा तुझ्यावर लाईन मारणारा तो रतिश किती भारी होता ग. इथे मुंबईतच असतो असं ऐकलं मी. बिझिनेस सुरू केलाय त्याने स्वतःचा लाखोंचा गल्ला आहे त्याचा.. मी तर ऐकलंय अजुनही तुझ्याच प्रेमाचं भुत त्याच्या डोक्यात आहे म्हणुन लग्न करत नाही. तु पुन्हा एकदा त्याचा विचार करू शकतेस. " पल्लवीने हसतच रावीला हातकोपर मारले..
"पल्लू... प्लिज...! लग्न झालंय माझं.. आणि राघव दिसायला सावळा आहे पण मनाने खुप छान आहे. माझी आणि अबीरची खुप काळजी घेतो तो.. खुप प्रेम करतो तो आम्हां दोघांवर.."
"प्रेमाने पोट नसतं भरत.. पैसे पण हवे असतात..
आत्ता आपली साक्षीच बघना.."
असं म्हणत पल्लवीने स्टेजवर लग्न विधित बिझी असलेल्या साक्षी वर नजर टाकली.. आणि पुढे बोलायला सुरुवात केली.
"लग्न करुन नवऱ्यासोबत दुबईला शिफ्ट होईल.. हनिमूनला तर मॅडम पॅरिसला जाणार. तु सुद्धा थोडं विचार करुन लग्न केलं असतंस तर कदाचित ह्या राघव पेक्षा खुप सुंदर मुलगा भेटला असता तुला.. खूपच घाई केलीस. मला तुझ्याबद्दल थोडी तरी भनक असती तर ह्या मुलासोबत तुझं लग्न होऊच दिलं नसतं."
रावी थोड्या हळव्या मनाची.. तिला रागवायला फक्त राघववरच जमायचं. राघव सोबत लग्न केल्यावर आई बाबा कायमचे तुटले तिच्यापासून. माणसं आपल्यापासून लांब जातील अशी अनामिक भीती तिच्या मनात घर करुन असायची..
डोळ्यांत पाणी जमा होऊ लागलेलं तिच्या.. पण तिने स्वतःवर कसे बसे नियंत्रण मिळवलं..
"बरं जे झाल ते जाऊ देत.. आत्ता काय करणार तु??पण पुढे जाऊन मात्र विचार कर. रतिश पण येतोय आज. " पल्लवी मिश्किल पणे हसली..
रावी ने तिच्यावरून सपशेल दुर्लक्ष केलं.. आणि गप्प गुमान राघव जवळ येऊन बसली.
मुंबई सोडुन पुण्यात सेटल झालेली रावी आज फक्त नी फक्त साक्षीच्या लग्नासाठी मुंबईत आलेली. ते सुद्धा एसटी ने प्रवास करुन..
तिच्या 5 वर्षाच्या मुलाला प्रवासाचा भरपूर त्रास झालेला. त्यात पल्लवीचं बोलणं ऐकुन, लग्नात आलोच नसतो तर बरं झाल असतं असं तिला वाटलं.
"राणी सरकार, काय झाल? चेहरा का पडलाय? "
स्वतःचा उदास चेहरा राघव पासुन ती लपवू शकली नाही..
तिने नकारार्थी मान डोलवली.. उसण हसु ओठांवर आणत ती समोर दिसणाऱ्या स्वतःच्या जिवलग मैत्रिणीकडे पाहु लागली..
" हनीमुनला ती पॅरिसला जाणार, दुबई शिफ्ट होणार..! "
मगाशी पल्लवी जे काही शब्द बोलली ते तिच्या कानभोवती घुमू लागले.
तिने एक नजर राघव वर टाकली.. जो तिच्याकडेच बघत होता.
"काय झालय ग सोन्या...? मला तु नाराज नाराज का वाटतेयस? तु तुझ्या मित्र मैत्रिणीना भेटुन खुश रहावं म्हणुन तुला. इथे घेऊन आलेलो मी.. मुश्किल ने सुट्टी काढुन आणि तु चेहरा पाडून आहेस. आपलं लग्न मिस करतेस का?" राघव ने विचारलं.
तिने जबरदस्तीने ओठ ताणून नाही म्हटले.
"ऐकना जान.. थोडा गरीब आहे मी पण आय प्रॉमिस.. आपली 10 एनीव्हर्सरी असेलना तेव्हा आपण अशीच सेलिब्रेट करू.. थोडी जास्तच मेहनत करायचं ठरवलंय मी.. तुला आणि अबीरला घेऊन आउट ऑफ इंडिया जायचं स्वप्न पण आहे माझं.."
बोलताना राघवचा हात रावीच्या खांद्यावर होता.
तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकल.. थोडं भरून आलेल तिला पण पल्लवीचे शब्द राघवला ऐकवून तिला त्याला दुखवायचं नव्हतं..
"ऐक ना राघव मी एक मिनिट आली..! " अस म्हणत ती राघव शेजारची उठली.
हॉलवर असणाऱ्या गर्दीत ती पल्लवीला शोधू लागली..
हॉलच्या असणाऱ्या कोपऱ्यात फोनवर बोलण्यात व्यस्त असणारी पल्लवी तिला दिसली.
हाताची घडी घालुन ती पल्लवी च्या समोर उभी राहिली. पल्लवी ने फोन कट केला.
"तूझा नवरा कुठेय? " रावीने पल्लवीला प्रश्न केला.
"हि इज सो बिझी.. इम्पॉर्टन्ट मिटिंग होती त्याला. यु नो XX सारख्या मल्टीनेशनल कंपनीत कामाला आहे तो.."
बोलताना पल्लवीचा तोरा काही वेगळाच वाटला.
"आणि तु काय करतेस? "
रावी ने विचारल.
"नवरा कमवता असताना मला. जॉब करायची काय गरज.? "
असं म्हणत ती हसु लागली.
असं म्हणत ती हसु लागली.
"ओह्ह...! एवढं शिकून घरीच बसुन असते वाटत तु. बेरोजगार आणि रिकामटेकडी...! "
रावीचा पल्लवी सोबत बोलतानाचा तोराच बदलला होता.
"व्हॉट? तु मला रिकामटेकडी म्हणालीस? "
"राग आला का? "
नाही म्हणजे दुसऱ्याच्या नवऱ्याबद्दल नको ते बोलताना समोरच्याला सुद्धा राग येईल असा विचार नाही करत तु.. आणि तुला काय माहिती ग माझ्या नवऱ्या बद्दल?
माझा नवरा सगळ्यात बेस्ट नवरा आहे.
माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी मला मुंबईत घेऊन आलाय तो. इम्पॉर्टन्ट मिटिंग त्याला सुद्धा होती.
पण मिटिंग पेक्षा माझा आनंद त्याला महत्वाचा आहे.
दिसणं म्हणशील तर त्याच्या सावळेपणात लपलेल सौंदर्य तुझ्या सारख्या पैस्याने पोट भरणाऱ्याला नाही कळत, त्यासाठी प्रेमाची भाषा कळावी लागते..
साक्षी दुबईला शिफ्ट होतेय, हे मला पण माहितीय..
हनिमूनला ती पॅरिसला जाईल हे सुद्धा ती मला बोलली. पण माझ्या मनात तिच्याबद्दल इर्शा अजिबात नाही...
आणि असं सुद्धा नाही कि, तिचं बघुन माझ्या नवऱ्याने सुद्धा मला पॅरिस फिरवावं असा हट्ट मी राघव जवळ करेल आणि माझ्या नवऱ्याने मला पॅरिस फिरवल्यावरच मी हॅप्पी होईल..
माझे विचार आणि मी थोडी वेगळी आहे..
माझं मन जपण्यासाठी आणि मला खुश करण्यासाठी पुण्यातील सारसबाग जरी त्याने मला फिरवली तरी मी माझ्या संसारात खुश आहे आणि खुश राहील.
दुसऱ्याच सुख बघुन माझ्या पदरी असणाऱ्या सुखाची किंमत न करणारी मी नाही..
आणि दुसऱ्याच्या नवऱ्याला वाईट बोलणारी तर मी अजिबात नाही..
माझं मन जपण्यासाठी आणि मला खुश करण्यासाठी पुण्यातील सारसबाग जरी त्याने मला फिरवली तरी मी माझ्या संसारात खुश आहे आणि खुश राहील.
दुसऱ्याच सुख बघुन माझ्या पदरी असणाऱ्या सुखाची किंमत न करणारी मी नाही..
आणि दुसऱ्याच्या नवऱ्याला वाईट बोलणारी तर मी अजिबात नाही..
आत्ता तु तुझंच बघना.. तुझं लग्न झालंय.. पण खासं मैत्रिणीच्या लग्नात सिंगल असल्यासारखी फिरत बसलीस..
तु व्यवस्थित हॉलवर पोहचलीस का? जेवलीस का? हे विचारायला तुला तुझ्या नवऱ्याने साधा कॉल सुद्धा केला नसेल कारण तो मिटिंग मध्ये बिझी आहे..
पण तरीही...
लाखोंचा गल्ला गाठणाऱ्या रतिशचा विचार कर तो अजुनही सिंगल आहे अस मी तुला अजिबात बोलणार.... नाही... "
रावीने पल्लवीला तोडीस उत्तर दिले. रावी पुढे ती काही बोलूच शकली नाही..
"आई..." 5 वर्षीय अबीर पळतच रावी जवळ आला.
तिने त्याला उचलून घेतल..
"राणी सरकार तुला भूक लागली असेल. जेवून घे.. असं बाबा बोललाय.. जेवूयात..? " अबीरने राघवचा निरोप रावीला दिला..
"तुझ्या बाबाला माझी किती ती काळजी..? असा नवरा सगळ्यांनाच मिळत नाही.. " तिरपी नजर तिने पल्लवीवर टाकली आणि स्वतःच्या मुलासोबत तिथुन निघुन गेली.
रावीच्या शब्दांनी पल्लवीच्या गालावर चपराक मारली होती. तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आजू बाजुला बघत पल्लवी हॉलमधुन बाहेर पडली..
रावीने मात्र राघवसोबत तिच्या जिवलग मैत्रिणीच लग्न मस्त पैकी एन्जॉय केलं..
"शुभ लग्न सावधान... " असं म्हणत मैत्रिणीला लग्नाच्या शुभेच्छा
होळी सारख्या सणाला आपण रंगाचा विचार नाही करत.. प्रत्येकाला रंग लावण्यास आपण सज्ज असतो. प्रत्येक रंग हा गोड वाटतो.. पण वास्तववादी जीवनात मात्र राघवसारख्या व्यक्तीची निंदा करणारे पल्लवी सारखे कधी कधी आपण सुद्धा बनतो..
रावी कडुन बघा काही शिकायला मिळत असेल तर..
कथा कशी वाटली हे नक्की कळवा.. अश्याच कथा वाचायला आवडतील का हे पण नक्की कळवा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा