शुभ्रानी केलेलं पेंटिंग भाग १
जलद कथालेखन मालिका
जलद कथालेखन मालिका
शुभ्रा माझी मैत्रीण. ऊत्तम चित्रकार आहे. ती बोलताना पण चित्रकलेच्या भाषेतच बोलायची. इतरांना तिची अतार्किक बडबड वाटायची. मला मात्र तिची ही बडबड आवडायची.
रंगांशी सुसंगत तिचं बोलणं असायचं.आपल्या आयुष्यात असे कितीतरी रंग असतात. ते डोळसपणे बघीतले तर कळतं.असं शुभ्रा नेहमीच म्हणायची.
शुभ्रा रंगांमध्ये इतकी बुडालेली असायची की हे बघून मला गंमत वाटायची. पेंटिंग करताना तिची देहबोली एका चैतन्याने भारलेली असायची.ती काही वेळा माझी तिथे असलेली उपस्थिती विसरायची. रंगांच्या छटां मध्ये ती रंगून जात असे.
तिच्या चित्रांची शैली मला आवडायची.चित्राबद्दल मला फार समज नाही आणि नव्हती.शाळेमध्ये चित्रकलेचा पेपर सोडवण्यापुरती माझी चित्रकलेबद्दलची समज. शुभ्राने काढलेली चित्र बघताना मी माझ्या अल्प बुध्दी ने काही प्रश्न तिला विचारायची.
मला चित्रकलेतलं फारसं समजायचं नाही असं मी नेहमीच म्हणत असले तरी पण शुभ्रा नेहमीच म्हणते,
"तुला चित्रकलेतलं कळतं ताई. म्हणून तू बारीक बारीक जागा मला दाखवतेस. त्यावर प्रश्न विचारतेस." तिने असं म्हटलं की माझी काॅलर टाईट व्हायची.
शुभ्रा अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. तिचं चित्र पूर्ण होईपर्यंत आमची गाठभेट बंद असायची. शुभ्रा स्वतःला एका खोलीत कोंडून घेत असे.तिच्या मनासारखं चित्र पूर्ण होईपर्यंत तिला कसलंच भान नसायचं.शुभ्रा…तिचे रंग…तो कॅनव्हास आणि ब्रश यांच्याशी एकनिष्ठ असायची.
तिचं चित्र पूर्ण झालं की आम्ही नेहमीच्या मामांच्या उपहारगृह मध्ये भेटायचो. बहुतेक शनीवारी भेटतो कारण मला हाफ डे असतो. दुस-या दिवशी रविवार म्हणजे सुट्टीचा वार. आदल्या दिवशी शुभ्राची झालेली भेट मी छान एन्जॉय करायचे.
दोघी भेटलो की मग असा गप्पांचा फड रंगतो की वेळ कसा सरकला आणि रात्र कधी झाली याचं भान राहत नाही. उपहारगृहात लोक येतात आणि खाऊन जातात. त्यांची बडबड, हास्यविनोद याचा आमच्यावर काहीही परीणाम होत नाही. कारण आम्ही आमच्याच विश्वात दंग असतो. सगळं उपहारगृह रिकामं होतं पण तरी आम्ही दोघी तिथेच असतो.
शेवटी मामा ओरडतात
" ए...पोरींनो घरला जायचं का नाय?"
तेव्हा आम्ही ऊठतो आणि आपापल्या घरी जातो.
मामांच्या अश्या ओरडण्याचीपण आम्हाला सवय झाली आहे. ते जोपर्यंत ओरडत नाही तोपर्यंत आम्ही त्या मामांच्या ऊपहागृहातून बाहेर पडत नाही.हां…हां…हां..
हे आठवून मला हसायला आलं.
उपहार गृहाच्या माणसांचं बोलणं, ओरडणं आम्ही दोघी फारसं मनावर घ्यायचो नाही.
" ए...पोरींनो घरला जायचं का नाय?"
तेव्हा आम्ही ऊठतो आणि आपापल्या घरी जातो.
मामांच्या अश्या ओरडण्याचीपण आम्हाला सवय झाली आहे. ते जोपर्यंत ओरडत नाही तोपर्यंत आम्ही त्या मामांच्या ऊपहागृहातून बाहेर पडत नाही.हां…हां…हां..
हे आठवून मला हसायला आलं.
उपहार गृहाच्या माणसांचं बोलणं, ओरडणं आम्ही दोघी फारसं मनावर घ्यायचो नाही.
***
एका स्पर्धेत शुभ्रानी शंकराचं तैलचित्र पाठवलं. ते झाल्यावर आम्ही नेहमीप्रमाणे भेटलो. पण आजची शुभ्रा वेगळीच होती.
एका स्पर्धेत शुभ्रानी शंकराचं तैलचित्र पाठवलं. ते झाल्यावर आम्ही नेहमीप्रमाणे भेटलो. पण आजची शुभ्रा वेगळीच होती.
आल्या आल्या आम्ही दोघी कोप-यातल्या नेहमीच्या टेबलवर बसलो. बराच वेळ शुभ्रा काही बोलली नाही. मी फक्त तिचा चेहरा बघत होते. तिच्या चेह-यावरचे भाव सांगत होते की तिच्या मनात खूप खळबळ माजली आहे. ती ही खळबळ व्यक्त करेल यावर माझा विश्वास होता. म्हणून मी शुभ्रा कधी बोलते याची वाट बघत बसले.
शेवटी शुभ्रा बोलायला लागली.
"ताई या वेळच्या स्पर्धेत कोणतं चित्र पाठवावं याचा मी विचार करत होते तेव्हा मला भोळा सांब शंकराचं पेंटींग करावसं वाटलं. शंकर भोळा आहे, तरीही वेळ आली तर तांडव करू शकतो. एकाच देवामध्ये या दोन गोष्टी बघून मला खूप आश्चर्य वाटलं. यातूनच मी शंकराचं पेंटींग करायला सुरुवात केली."
बोलता बोलता अचानक शुभ्रा बोलायचं थांबली.मी चकीत होउन शुभ्राकडे बघत राहिले.
_________________________________
क्रमशः शुभ्रा अचानक बोलायची का थांबली?
ती काय सांगणार आहे? वाचू पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा