शुभविवाह भाग १९
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: जयने गौरीला आशिष बद्दल सगळी माहिती दिली, तसेच त्याने शनायाबद्दलही सगळं सांगितलं. जय व गौरीने त्यांच्या नात्याला वेळ देण्याचे ठरवले.
आता बघूया पुढे…
गौरीला बाहेर जाण्याची इच्छा नसल्याने जेवण रुममध्येच जयने मागवले होते. जेवण झाल्यावर जय त्याच्या रूममध्ये गेला, पण गौरीला काही झोप येत नव्हती. ती या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. तिच्या मनात मध्येच आशिषचा विचार येत होता, तर कधी जयचा. आशिष सोबत एकदा आपण बोलायला हवे होते अस तिला वाटत होतं.
गौरीचं विचारचक्र सुरू होत, तोच मॅसेज आल्याची मोबाईलची टोन वाजली. गौरीने बघितलं तर भाग्यश्रीचा मॅसेज होता.
“हाय, पुण्याला पोहोचली का? सगळं काही ठीक आहे ना, तुझ्या मॅसेजची वाट बघत होते. तुझा मॅसेज न आल्याने काळजी वाटत होती.”
“हाय, मी पुण्यात सुखरूप पोहोचली आहे. जयने हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे. उद्या फ्लॅटवर शिफ्ट होणार.” गौरीने रिप्लाय केला.
“तुम्ही दोघे एकाच रूममध्ये आहात का?” भाग्यश्री.
“नाही. जयने दोन रूम्स बुक केल्या होत्या. जय तेवढे सेन्सिबल आहेत.” गौरी.
“ओके. तुला जयसोबत राहताना काही प्रॉब्लेम येणार नाही बघ.” भाग्यश्री.
“हो. त्यांची व आशिषची भेट झाली होती. आशिषच्या आयुष्यात एक मुलगी होती, ती प्रेग्नंट होती, पण घरच्यांच्या प्रेशर मुळे ते लग्नाला तयार झाले होते. सगळा प्रेशर मॅनेज होत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली असेल.” गौरी.
“ओह! अस होत तर…” भाग्यश्री.
“जयच्या आयुष्यात पण एक होती, पण तिने फॅमिली प्रेशरमुळे दुसऱ्यासोबत लग्नाला होकार दिला. आपण आपल्या नात्याला वेळ देऊयात अस जय म्हणाले. जयचं त्या मुलीवर खरं प्रेम होतं. आता तसं प्रेम पुन्हा कोणावर करता येईल का? याची शाश्वती त्यांनाच वाटत नाहीये.” गौरी.
“जयने सगळं खरं सांगितलं, यातच सगळं आलं. असंही तुम्ही दोघे एकमेकांसाठी अनोळखी आहात. सोबत राहिल्यावर तुम्ही एकमेकांना ओळखायला लागाल. सहवासाने तुमचं नात हळूहळू फुलेल बघ.” भाग्यश्री.
“हो. जयने मला कोणत्याच बाबतीत अंधारात ठेवलं नाहीये. ते खरंच खूप चांगले आहेत.” गौरी.
“तू लकी आहेस. जय सारखा नवरा तुला भेटला आहे.” भाग्यश्री.
“आमचं नातं जगासाठी नवरा बायकोच आहे. आमच्यात तसं काही नातं लगेच तरी नसेल.” गौरी.
“तुमचं नातं लवकरच तसं होईल बघ. तू जास्त विचार करू नकोस.” भाग्यश्री.
“हो. मी सगळं काही आता वेळेवर सोडून दिलं आहे.” गौरी.
“आता बराच उशीर झाला आहे. तू झोप. उद्या तुझी बरीच धावपळ होणार आहे.” भाग्यश्री.
“गुड नाईट.” गौरी.
भाग्यश्री सोबत मॅसेजवर बोलणं झाल्याने गौरी रिलॅक्स झाली होती. तिला मोकळं मोकळं वाटत होतं. गौरीला झोप लागली होती. सकाळी जयच्या फोनने गौरीला जाग आली.
गौरीने झोपेतच फोन उचलला,
“हॅलो गौरी, तुला बर वाटत नाहीये का?” जयने विचारले.
“मी बरी आहे.” गौरी आळस देत म्हणाली.
“घड्याळात बघ किती वाजले आहेत.” जय अस बोलल्यावर गौरीने मोबाईलचे घड्याळ बघितले.
“आठ वाजलेत. मी इतक्या वेळ झोपून कशी राहिले.” गौरीला पस्तावा येत होता.
“कालच्या प्रवासाने आणि विचारांच्या दगदगीने तुला झोप लागली असेल. आता उठ आणि आवरलं की मला फोन कर. आपण नाश्ता करून लगेच निघुयात. आपल्याला बरीच कामे करायची आहेत.” जयने फोन कट केला.
गौरी स्वतःला शिव्या घालत आवरत होती. नऊ वाजेपर्यंत गौरीने सगळं आवरलं. जय व ती नाश्ता करण्यासाठी खाली रेस्टॉरंटला भेटले.
“गौरी, आपण आधी फ्लॅटवर जाऊयात. फ्लॅट बघितल्यावर तुला कोणकोणत्या वस्तू लागतील याची यादी कर. मी पण मला लागणाऱ्या वस्तूंची यादी करतो. दोघेजण मिळून लागणाऱ्या वस्तू घेऊयात.
मला आज मुश्किलीने सुट्टी मिळाली आहे. उद्या सुट्टी मिळणार नाही, तर आजच सगळी कामं करून घ्यावी लागतील.” जयने गौरीला दिवसभरात करावी लागणारी कामे सांगितली.
जय प्लॅनिंग करण्यात सुद्धा किती परफेक्ट आहे याचा अंदाज गौरीला आला.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा