शुभविवाह भाग २०
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: जयने आशिष व स्वतःबद्दल गौरीला सगळं काही सांगितलं होतं. जयचं बोलणं ऐकल्यावर गौरीच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला होता. भाग्यश्री सोबत मॅसेजवर बोलणं झाल्यावर गौरीच मन मोकळं झालं होतं.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: जयने आशिष व स्वतःबद्दल गौरीला सगळं काही सांगितलं होतं. जयचं बोलणं ऐकल्यावर गौरीच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला होता. भाग्यश्री सोबत मॅसेजवर बोलणं झाल्यावर गौरीच मन मोकळं झालं होतं.
आता बघूया पुढे….
जय गौरीला घेऊन फ्लॅटवर गेला. 1 बी एच के फ्लॅट होता. फ्लॅटचा हॉल प्रशस्त होता. किचनमध्ये किचनट्रॉली होती. किचन हॉलला अटॅच होत. बेडरूमही मोठी होती. बेडरूममध्ये वॉल माउंटेड कपाट, ड्रेसिंग टेबल होते. हॉलला लागून गॅलरी होती. ड्राय बाल्कनी सुद्धा होती.
“गौरी, आपल्याला हॉलमध्ये सोफा व टीपॉय घ्यावा लागेल. बेडरूमसाठी एक किंग साईज बेड घ्यावा लागेल. फ्रीज, वॉशिंग मशीन पण घ्यावं लागेल. तुला भांडी व बाकीच कोणतं सामान लागेल याची यादी कर. आपण इकडून आता फर्निचरच्या दुकानात जाऊयात.” जय घरात फेरफटका मारता मारता म्हणाला.
“पडदे पण घ्यावे लागतील.” गौरीने आठवण करून दिली.
“हो, ते तर मी विसरलोच होतो.” जय.
“मी काय म्हणते लगेच सगळ्याच वस्तू घेणं गरजेचं आहे का? सध्या गरजेच्या वस्तू घेऊयात. सोफा, बेड, टीपॉय सारख्या वस्तू नंतर घेऊ.” गौरी.
“गौरी, बाबांनी मला तीन लाख रुपये पाठवले आहेत. घरात सगळ्या वस्तू घे अस सांगितलंय. सूनबाईला घरात कोणत्याच वस्तूची कमी पडायला नको, अस आवर्जून सांगितले आहे. तू दादासाहेब देशमुखांची सून आहेस. देशमुखांचा तोरा तुला ठाऊक आहेच.
गौरी, माझं उद्यापासून ऑफिस सुरू झाल्यावर मला अजिबात वेळ मिळणार नाही. सध्या मी ज्या प्रोजेक्टवर काम करत आहे, तो पुढील सहा महिने तरी चालेल. सो खूप काम असणार आहे. फ्री टाईम असा मिळेल अस वाटतच नाही. आज जेवढ्या वस्तू आपल्याला आवडतील त्याच आपण घेऊयात.” जयने गौरीला समजावून सांगितले.
जय व गौरीने मिळून घरात लागणाऱ्या सर्व छोट्या व मोठया सामानाची यादी केली. जयने ऑनलाईन जवळपासची सगळी दुकानं शोधली. कुठे काय चांगलं मिळेल याची माहिती मिळवली.
जय व गौरी फर्निचरच्या दुकानात गेले. तेथून फर्निचर सिलेक्ट केलं. भांड्याच्या दुकानात जाऊन लागणारी भांडी विकत घेतली. गौरीने जेवढी भांडी लागणार तेवढीच घेतली. हळूहळू जश्या वस्तू लागतील तश्या घ्यायच्या तिने ठरवलं होतं.
फर्निचर दुकानदाराने घरपोच केले होते. दुकानातील मुलं गाडीसोबत आले होते, त्यांनी सर्व फर्निचर जागच्या जागी ठेवलं. गौरीकडे किचन लावायची जबाबदारी होती. गौरी भांडी लावण्यात बिजी होती.
“गौरी, चल आपण लंच करून येऊ. बराच उशीर झाला आहे. लंच झाल्यावर आपल्याला किराणा व भाजीपाला आणायला जावं लागेल. मी तुला जवळची सगळी दुकानं संध्याकाळी दाखवून देतो. तुला जे काही लागेल, ते तू घेऊन येत जा.” जय.
“मला फक्त दहा मिनिटे द्या. मी भांडी लावून आलेच. मला कोणतंही काम अर्धवट केलेलं आवडत नाही.” गौरीने पटापट भांडी लावली.
गौरी जयसोबत लंच करण्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये गेली. दोघांनी मिळून जेवणाची ऑर्डर दिली होती.
“हाय जय, आज इकडे कसा काय?” मागच्या बाजूने आवाज आल्याने जयने मागे वळून बघितले, तर तिथे त्याचा मित्र सागर उभा होता.
“हाय सागर, अरे जेवायला आलो होतो.” जयने हसून उत्तर दिले.
“अंकिता तुझ्या आयुष्यात आली आणि तू आम्हाला विसरूनच गेला. अस कुठे असतंय होय.” सागरच्या तोंडून अंकिताच नाव ऐकून जयला गौरीसमोर अवघडल्यासारखे वाटत होते. गौरीच्या चेहऱ्यावर मात्र काहीच भाव नव्हते.
जय काहीच बोलत नाही, हे बघून सागर म्हणाला,
“सॉरी, मी हे नेमकं अंकिता वहिनींसमोर बोललो. वहिनी, माझं बोलणं मनावर घेऊ नका. आमच्या मित्रांमध्ये हे असंच नेहमी सुरू असत.”
“तुमचं काहीतरी कन्फ्युजन होत आहे. माझं नाव गौरी आहे अंकिता नाही. दोन दिवसांपूर्वी माझं व जयचं लग्न झालं आहे.” गौरी बिनधास्तपणे बोलत होती.
‘आपण बोलून किती मोठी चूक केली.’ हे भाव सागरच्या चेहऱ्यावर होते.
“जय, तुम्ही दोघे एकमेकांची कंपनी एन्जॉय करा. मी जातो.” सागरने तेथून धूम ठोकली.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
