Login

शुद्ध बीजापोटी...भाग१

शुद्ध बीजापोटी.. भाग 1
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शुद्ध बीजापोटी... भाग १

"अरे शशांक, तुझ्या बाबांना जाऊन एक महिना झाला. आज त्यांच्यासाठी महिन्याचं पहिलं पान टाकायचं आहे."
शाळेत जाऊन मॅडमला थोड्या वेळासाठी सुट्टी माग व घरी ये." शुभदा पाचव्या वर्गात शिकणाऱ्या आपल्या मुलाला शशांकला म्हणाली.

"हो आई, येतो लगेच." म्हणत शशांक शाळेत गेला.

सुनिलराव म्हणजे शशांकच्या वडिलांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले होते. स्वतःला कसेबसे सावरत शुभदाने आपला मुलगा शशांक कडे पाहत स्वतःचे मन घट्ट केले. अतिशय गरीब परिस्थितीतले हे एक कुटुंब. घरात कमावणारा कोणीच नाही. काय करावे? सकाळी उठल्यापासून शुभदा सारखा विचार करत राहायची.

माहेरची परिस्थितीही जेमतेमच. पण तरीसुद्धा आपल्या बहीण व भाच्यांवरील जीवापाड प्रेमामुळे शुभदाचा भाऊ शरदने तिला आपल्याकडे नेण्याचा निर्णय घेतला. शरद अविवाहित होता. तो एकटाच राहत होता. शुभदा आणि शरदचे वडील, दोघेही बहीण भावंडे लहान असतानाच वारले. त्यामुळे त्यांच्या आईने दुसरे लग्न केले. काही दिवस आजीने त्यांचा सांभाळ केला. परंतु आजी गेल्यानंतर ही दोन्ही मुलं पोरकी झाली. आपल्या लहान बहिणीचा शरदने मुलीसारखा सांभाळ केला व तिचे लग्न करून दिले. स्वतः मात्र अविवाहितच राहिला.

हो नाही म्हणत शेवटी शुभदा दादाकडे जायला तयार झाली. कारण तिला शशांकच्या भवितव्याची चिंता होती. आपल्याला खचून चालणार नाही, हे शुभदाने मनाशी ठरवले व छोट्या शशांकला घेऊन माहेरी आली आणि भावाच्या आधाराने राहू लागली.


घरच्या घरी शिवणं टिपणं करून ती आपल्या मुलाचा शिक्षणाचा खर्च कसाबसा भागवत होती. शशांक अभ्यासात हुशार होता. गरिबीच्या परिस्थितीमुळे शाळेतील शिक्षक- शिक्षिका त्याला शिक्षणासाठी मदत करायचे. शशांक दहावीत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला, पण आता शुभदा समोर त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च हा वासून उभा होता. पण ठीक आहे, मी चार कामं जास्त करेल पण शशांकला शिकवेनचं. ही तिची प्रतिज्ञा होती.

भाऊ शरद शुभदाच्या पाठीशी उभा होताचं. त्यालाही वाटत होतं, आपल्या भाच्याने खूप शिकावं. खूप पुढे जावं. तो आपल्या बहिणीचे कष्ट जवळून पाहत होता. त्यासाठी त्याने आपल्या नावाची जी थोडी जमीन होती ती विकायची ठरवले. शुभदाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

"दादा, अरे तुझी शेती म्हणजे तुझ्या पोटाची भाकर.ती विकू नको."

मात्र शरदने तिला समजावून सांगितले,
"अगं शुभदा, आज आपल्या शशांकच्या शिक्षणासाठी पैशाची आवश्यकता आहे. कोण देणार आपल्याला एवढा पैसा?" त्यापेक्षा हेच ठीक आहे."

शुभदा स्तब्ध राहिली.

आता शशांक पुढील शिक्षणासाठी दूरच्या शहरात जावे लागणार होते.त्यालाही आपल्या मामाची, आईची काळजी वाटत होती. पण इलाज नव्हता. दूरच्या शहरात राहून अगदी काटकसरीने शशांकने आपले शिक्षण पूर्ण केले. आणि एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला.

पुढील भाग अवश्य वाचा.

क्रमशः
सौ. रेखा देशमुख
0

🎭 Series Post

View all