Login

शुद्ध बीजापोटी भाग४ (अंतिम)

शुद्ध बीजापोटी... भाग ४( अंतिम)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शुद्ध बीजापोटी...
भाग ४ (अंतिम )

शुभ्रा आणि शशांकने मिळून त्या जमिनीवर एक सुसज्ज अशी कॉन्व्हेंटची इमारत उभारायचे ठरविले. कारण त्या गावात कॉन्व्हेंट नव्हते. त्यासाठी मुलांना दुसऱ्या शहरात जावे लागत होते. लवकरच बांधकाम सुरू झाले आणि पाहता पाहता सुसज्ज अशी कॉन्व्हेंटची इमारत उभी राहिली. त्या इमारतीला त्यांनी आपल्या आईचे नाव दिले.

"शुभदा इंग्लिश स्कूल"

शशांक आणि शुभ्राने आई व मामांना त्याची जराही कल्पना येऊ दिली नव्हती. आईला सरप्राईज द्यायचे त्यांनी ठरवले होते. आपल्या आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आई व मामाच्या हस्ते त्या इमारतीचे उद्घाटन करण्याचे ठरले.

११ एप्रिलला शुभदाचा वाढदिवस असायचा. शशांक व शुभ्रा सकाळीच उठले. दोघांनीही आपल्या आईला नमस्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आधी ते आई व मामाला सोबत घेऊन एका अनाथाश्रमात गेले व वाढदिवसानिमित्त तेथील सर्व बालकांना फळे आणि मिठाईचे वाटप केले.त्यानंतर ते आधीच ठरल्याप्रमाणे आपल्या मामाच्या गावी आले.

"अरे हे तर आपले गाव!!"
मामा आश्चर्याने म्हणाले.

तिथे एका मोठ्या प्रशस्त इमारती समोर शशांकने आपली कार थांबवली. आई व मामाला खाली उतरण्यास सांगितले. शुभदाला कळेचं ना नेमकं काय आहे ते.

"अगं आई, वर बघ आणि या इमारतीवरचे नाव वाच पाहू."
शशांक म्हणाला.

"अरे हे तर माझं नाव!"

शुभदा थक्क होऊन पाहतच राहिली. शशांकने आपल्या आईच्या व मामाच्या हस्ते या इमारतीचे रितसर उद्घाटन केले. आणि आईला म्हणाला ,

"आई, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू आपल्या शाळेला भेट द्यायला येऊ शकतेस.या लहान मुलांकडे पाहून आपल्याला आपलं बालपण आठवतं ना.

अगं आई, तुला शिक्षणाची आवड होती. हे मला मामांकडून कळलं. परिस्थितीमुळे तुला शिकायला मिळालं नाही. मामाच्या या गावी सुद्धा गरीब स्थितीतल्या मुलांची शिक्षणाची इच्छा असूनही त्यांच्या आईवडिलांना परिस्थिती अभावी मुलांना शहरात पाठवता येत नाही. त्यामुळे आता ती मुले या शाळेत शिकू शकतील. आणखी एक गोष्ट म्हणजे आम्ही या शाळेची फी सुद्धा अगदी जुजबी ठेवलेली आहे. गरीब कुटुंबाला तेवढाच आधार होईल म्हणून मी हा निर्णय घेतला. आहे की नाही चांगली आयडिया? त्यासाठी शुभ्रानेही खूप मेहनत घेतली." शशांक म्हणाला.

हे सर्व पाहून शुभदाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. शुभदा व शरद मामा दोघेही शशांक व शुभ्राकडे कौतुकाने पाहत होते.

समाप्त
सौ. रेखा देशमुख
0