शुरा मी वंदिले !

Sainik

    आज 26 जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस !  हा दिवस आपल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो.  आजच्याच दिवशी म्हणजेच 26 जुलै 1999 ला भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपले सैनिक प्राणपणाने लढले होते आणि एक अमूल्य, अलौकिक असा विजय या शूरवीरांनी भारतमातेला प्राप्त करून दिला होता  त्यांच्या अलौकिक कार्याची दखल ही प्रत्येक भारतीयांनी घेणे गरजेचे आहे. त्या सर्व शूरवीर सैनिकांना माझा मानाचा मुजरा ! ?‍✈️

     सै- सदैव, नि- निर्भय, क- करणारा !  देशातील नागरिकांना, जनतेला सतत निर्भय करणारा तो सैनिक. धैर्याच्या मशालीमध्ये पराक्रमाची ज्योत अखंड तेवत ठेवून तो आपल्या मातृभूमीसाठी प्राणपणाने लढत असतो. सैनिकांचे आपल्या प्रत्येकावर खूप मोठे ऋण आहेत आणि या ऋणातून आपण या जन्मी तरी मुक्त होणे अशक्य आहे. थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता आपले सैनिक सीमेवर अहोरात्र गस्त घालत असतात म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो. याची जाणीव प्रत्येक भारतीयाला असली पाहिजे. त्याग आणि समर्पणाचे प्रतीक म्हणजे आपले वीर जवान ! 

   भारतीयांमध्ये  तरुणांची संख्या ही प्रचंड प्रमाणात आहे भारत हा सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. सध्याची तरुणाई ही व्यसनाधीनता, सोशल मीडिया या सर्वांमध्ये गुंतलेली पाहायला मिळते. नशा करायची असेल तर देशसेवेची करा!  सोशल व्हायचं असेल तर देशासाठी व्हा !  हा संदेश आजच्या युवापिढीने अंगीकारणे गरजेचे आहे. ज्वलंत धमण्यांचे अविरत स्पंदन म्हणजे तारुण्य !  या मिळालेल्या तारुण्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे या मिळालेल्या तारुण्याचा वापर राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये केला तर जीवनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये काहीतरी भर पडेल काहीतरी योगदान देता येईल या दृष्टीने प्रत्येक तरुणांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

      कारगिल विजयामध्ये ज्या शूरवीरांनी आपल्या प्राण्याची बाजी लावली त्या सर्व हुतात्म्यांना त्रिवार वंदन ! ????



🎭 Series Post

View all