"माई, तुला खरंच सांगतो, तिचा काहीतरी गैरसमज झाला होता?"
"गैरसमज तिचा की तुझा अभि, तू तिला प्रोपोज केलं तेही सगळ्यांसमोर हे तिने मला सांगितलं, इतकी विचारी मुलगी आणि त्यात अपूर्वा असं काही करुच शकत नाही मला खात्री आहे."
माई च्या प्रश्नाला प्रत्युत्तर नाही करता आलं त्याला आणि तो मान मागे टेकवत तसाच बसून राहिला.
आजचा संपूर्ण दिवस त्याच्या डोळ्यासमोरून झरझर निघून गेला. त्याने अपूर्वा ला खरं काय ते सांगितल्यावरचा तिचा कोमजलेला चेहरा आणि अपूर्वाला प्रपोज केल्यानंतर सानिकाचा रडकुंडीला आलेला चेहरा दोन्हीही चेहरे एकदमच त्याच्या डोळ्यासमोर तरळले आणि पाण्याचा थेंब डोळ्यावाटे बाहेर पडला...
माई ने ते पाहिलं आणि थबकल्या..
"अभि... अरे..." म्हणत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बाजूला बसल्या... तसं त्याने माईच्या मांडीवर डोकं ठेवलं..
माईने हळूहळू त्याच्या केसांमधून हात फिरवायला सुरुवात केली..
माईचा मायेचा स्पर्श, दिवसभरातल्या घटना, नेमकं काय चाललंय मनात याबाबतीत वाटणारी अस्वस्थता सगळ्या भावनांचा कडेलोट झाला.
"माई मी फार मोठा अपराधी आहे का ग? पण मी खरं सांगतो अपूर्वा मला क्लिक नाही होत आहे बायको म्हणून...तसं असतं तर इतके वर्षे आम्ही सोबत आहोत एकदातरी मला आवडली असती ती... तरीही तू म्हणत असशील तर तिच्यासोबत मी लग्न करेनही पण मी तिला खुश ठेऊ शकेल की नाही माहीत नाही...तिला बायकोचं सुख देऊ शकेल की नाही माहीत नाही... माझी ती एक companian होऊ शकेल की नाही माहीत नाही आणि एवढंच काय माई ती आता जितकी चांगली मैत्रीण आहे तितकी चांगली मैत्रीण लग्नानंतरही राहील की नाही माहीत नाही... आता तूच सांग माई तिच्यासोबत लग्न करू की नको.. एका निरागस, सोज्वळ आणि हसत्या खेळत्या मुलीचा मानसिक बळी गेला तर चालेल का तुला? "
"अरे पण तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे दिसतं रे, खूप आशा लावून बसली आहे ती मुलगी आणि सहवासाने वाढतं की रे प्रेम.."
"माई, मी असं म्हणत नाहीये की तिचं प्रेम खोटं आहे, पण माई तिने आशा लावली ही सर्वस्वी तिची चूक नाही का? मला ना माई या गोष्टीचा आनंद होण्याऐवजी बर्डन वाटतंय, ओझं वाटतंय हे का नाही समजत कोणाला... एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करत असेल ह्या गोष्टीने झालेला आनंद अर्धा होकार असतो पण मला ओझं वाटतंय.. होऊ शकतं ना माई, तिला दुसरा एखादा माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळू शकतो.. तिने फक्त या सगळ्यांतुन बाहेर पडायला हवंय... मला तिच्यासाठी वाईट वाटतंय.."

"बरोबर आहे तुझं, तुला या गोष्टीचं ओझं वाटत असेल तर नकोच करुस तिचा विचार...तिची कीव येऊन लग्न करावं इतकी एरिगैरी ती नाही आहे...अपूर्वा आनंदी राहणं जास्त डिजर्व करते.. मी समजावेन तिला.."
"हम्मम"
"अजून एक विचारू? तुला सानिकासोबत लग्न करायचं आहे का?"
"तसा काही विचार नाही माई.." तो क्षणभर गालात हसला "मला क्लिक झालीये ती.. आवडायला लागलीय.. तिला अजून जाणून घायचं आहे, बघू पुढे काय होतंय..." त्याने माईच्या मांडीवरच अलगद डोळे मिटले आणि सानु चा चेहरा समोर आला.. चेहऱ्यावर एक सुखाची लकेर उमटली त्याच्या, माईही त्याच्या कडे बघत हळूहळू कुरवाळत होत्या.. कधी शांत झोप लागली त्याचं त्यालाही कळलं नाही...
--
इकडे अपूर्वा ने संकेत ला बोलावून घेतलं होतं... रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात दोन टोकांना जोडणाऱ्या पुलावरून अपूर्वा वाहनांची वर्दळ बघत होती.. तेवढ्यात संकेतची बाईक तिच्याजवळ येऊन थांबली. त्याने बघितलं ती तिच्याच धुंदीत होती.. तिचा निराशेने ग्रासलेला चेहरा वाऱ्यावर उडणाऱ्या केसांमुळे अधिकच लोभस वाटत होता...तिचे पाण्याने काठोकाठ भरलेले डोळे तो बघू शकत होता.. त्याला आता खरंच तिची काळजी वाटून गेली.
"अपूर्वा" तिच्या नावाचा अलगद उच्चार करत त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
तिने मागे वळून पाहिलं.. संकेत उभा होता.. क्षणभर त्याच्या डोळ्यांत पाहून तिला कसली जाणीव झाली कोणास ठाऊक ती त्याला बिलगली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
कितीतरी वेळ तो तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. आज दिवसभर काय काय होऊन गेलं, आणि आता शेवटी हे...
"अपूर्वा, रडणं थांबव ना? काय झालंय?" न राहवून शेवटी त्याने विचारलं.
"माझा पत्त्यांचा बंगला शेवटी कोलमडलाच.." ती बाजूला झाली, डोळे पुसले आणि त्याला घडलेली घटना सांगितली.
"पत्त्यांचा बंगला कोलमडणारच ना अपूर्वा? खेळ होता हे समजून बांधला असता तर कदाचित इतकं वाईट नसलं तुला...तुला त्यात राहता येईल असं का वाटलं तुला? मुळात ज्याला पायाच नाही अशा गोष्टी फार काळ तग धरून रहात नाहीत.. जे झालं ते बरंच नाही का झालं? त्याच्या मनाविरुद्ध लग्न झालं असतं तर कदाचित हातातून वेळ निघून गेली असती...तुलाही पश्चाताप झाला असता आणि त्यालाही, उलट मला त्याचं जास्त कौतुक वाटतंय की त्याने तुला आशेला लावलं नाही, ना टाईमपास केला.. हं आज त्याने तुला प्रपोज करायला नको होतं पण लवकरच त्याने प्रामाणिकपणे कबूलही केलं. आता तुझा मार्ग क्लिअर झाला.. त्याला माफ कर, बाहेर पड यातून.. होऊ शकतं त्याच्यापेक्षा चांगला मुलगा तुझ्यावर जास्त प्रेम करणारा भेटेल.. Because you deserve someone who brings smile on yo face not tears... " तो तिचे अश्रू पुसत म्हणाला आणि ती त्याला परत बिलगली..
त्याची मिठी तिला आश्वस्त करत होती, धीर देत होती...
आता होणारी सकाळ त्या चौघांसाठीही सुखावह आणि वेगळी ठरणार होती हे नक्की...
क्रमशः
@नेहा गोसावी

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा