श्वास घेण्यास कारण की... भाग 16
अभिमानला क्षणभर पृथ्वीच थांबल्यासारखी वाटली... म्हणजे केयु आणि नचीकेत? त्याने हळूच अपूर्वाकडे पाहिलं...अपूर्वाने चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवले होते..आनंदाने.. तिच्यासाठी हा प्रसंग अगदीच चमत्कारिक होता पण तितकाच सुखकारकही.. तिने खाली वाकून आधी ते फुल उचललं, आणि अभिमानला दोन्हीही हाताने,
"उठ अभिमान, इतकं करायची गरज नव्हती अरे, तू साधंच विचारलं असतं तरीही चाललं असतं की..मी तयार आहे लग्न करायला तुझ्यासोबत..तुला माहीत नाही माहीत नाही मी किती खुश आहे.." म्हणत तिने अभिमान ला मिठीच मारली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या..अभिमान केयु,सानु आणि नचिकेतकडे पाहत होता, सानुच्या डोळ्यांतुन आसवं कसे वाहायला लागले तिला कळलंच नाही जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने झटकन पुसले आणि वॉशरूम कडे पळाली... नाचिकेतच्या कपाळावर आठयांचं जाळ पसरलं...त्याला प्रचंड राग आला होता.. आणि केयुची तर अवस्था हसू की रडू अशी झाली..अभिमान ने अपूर्वाला लग्नासाठी मागणी घालण्याचा आनंद मनवायचा की त्याने आपल्याला नचिकेत सोबत पकडलं याची भिती वाटून घ्यायची तेच तिला कळत नव्हतं.. तिने घाबरून परत नाचिकेतचा हात चांगलाच दाबला... आणि अभिमान ला आता या दोघांमध्ये नक्की काहीतरी आहे , याची खात्री पटली... मग सानिका? ती इथे...ओह याचा वाढदिवस..
अभिमान ने त्याच्या नकळत मिठीत आलेल्या अपूर्वाला अलगद बाजूला केलं... आणि तिच्याकडे पाहिलं, तिचे गाल शरमेने आरक्त झाले होते..
"एक मिनिट अपूर्वा.." तो तसाच केयु कडे वळला...
"केयु..तू आत्ता या वेळेला, इथे, आणि याच्यासोबत?"
"अय्या, केयु तू इथे??" अपूर्वाही मागोमाग आलीच...
"द...दादा...त..ते मी..हा नचिकेत माझा मित्र..." ती थरथरतच होती.
"हो, हा त्या गोड मुलीचा मित्रय ना? काय बरं नाव तीच?" अपूर्वा
"सानिका.." अभिमान पटकन बोलून गेला...
"पण प्रश्न तो नाहीये, कोण कोणाचा मित्र आणि मैत्रीण, प्रश्न हा आहे, यावेळेस केयु इथे काय करतीये? काका आणि मावशींना माहिती आहे का तू इथे आहेस ते...?" अभिमान इतका रागावून बोलला की केयुच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते..
"ती एकटीच नाहीये डॉक्टर इथे, आमचा मित्र मैत्रिणींचा ग्रुप आहे जो, डिनरसाठी भेटतोय, आणि हो माझी जिवाभावाची मैत्रीणपण आहेच इथे, सानिका..तुम्ही बघितलंच असेल ना तिला, इथून जाताना..बघितलं ना? काय?" नचिकेतने अभिमानला त्याच्याच शब्दात उत्तर दिलं. नचिकेतलाही अभिमानाचा चांगलाच राग आला होता, याला ना फोडून काढतो असं झालं होतं, सानिकाचं मन तर तिच्या ताब्यातच नव्हतं...तरीही कसंबसं तिने कंट्रोल केलं स्वतःला...काय होतंय नेमकं तेही कळत नव्हतं. का रडतोय आपण? इतकं वाईट वाटण्यासारखं खरंच आहे का ? तरीही तिचा उर धडधडतच होता..
सारखं डोक्यातून पाणी येत होतं...
तिने कसाबसा आपला चेहरा स्वच्छ केला , परत त्यावर मेकअप चढवला आणि शांततेत बाहेर आली. तिच्या बॉडी laungage वरून नचिकेत चटकन समजून गेला तिला नेमकं काय झालंय ते... अभिमानलाही जराशी शंका आली...
"हाय ऑल" ती जबरदस्तीचं हसू आणत अभिमान कडे न बघता म्हणाली...
"हे माय डार्लिंग क्युट गर्ल.. " अपूर्वा ने तिला मिठीत घेतलं..किती मोठा आधार वाटला तिला तेव्हा.. तिला ताई असती तर तिच्या मिठीत अशी कितीतरी वेळ रडून मन मोकळं केलं असतं असं तिला वाटलं पण नाही हे चुकीचं आहे, इमोशन्सचा असा बाजार मांडायला नको. स्टेबल राहायला हवंय, काहीही झालं तरी.
ती पटकन बाजूला झाली...
"Guys , you look great together.." तिने अभिमानच्या नजरेत आरपार बघून म्हंटल तसं अभिमान ने मान खाली घातली...
"हो.. न.. आय एम सो हॅपी टुडे..चला आपण सगळे मिळून सेलिब्रेट करूयात..." अपूर्वा म्हणाली
"हो, आज नचिकेत चा वाढदिवस आहे म्हणून आम्ही सगळे जमलोय.. नचिकेतला चालत असेल तर माझं काहीच म्हणणं नाहीये.." सानिका उतरली..
"म मला पळेल.." अभिमानकडे टफ लूक देऊन, नंतर केयु कडे पाहत नचिकेत म्हणाला..
केयु तर बिचारी इतकी भेदरली होती, तिला काहीच बोलता येईन..
"केयु रिलॅक्स.. खाणार नाहीये तो तुला.." नचिकेतने कानात कुजबुजत हळूच तिच्या हाताला स्पर्श केला..
"चला आता, भेटींचा सोहळा संपला असेल तर खाऊन घेऊयात..भूक लागलीये कधीची.." अभिमान रागानेच सगळ्यांकडे बघत म्हणाला.
"अजून तुझ्या मित्रांसोबत माझी भेट व्हायची आहे नचिकेत, स्वागत नहीं करोगे हमारा.." हात पसरून फिल्मी स्टाईल मध्ये कोणीतरी बोललं.. तेव्हा अभिमान आणि अपूर्वा त्याला पाठमोरे उभे होते... तो आवाज ऐकल्याबरोबर अपूर्वाने चमकून मागे पाहिलं.. आणि जोरात उडीच मारली..
"ओह माय गॉड.. ओह माय गॉड...संकेत तू..द संकेत द्रविड .. मला सिंगापोर ला भेटला होता तो.." ती तिच्याही नकळत त्याला जाऊन बिलगली..आणि संकेतने ही मैत्रीच्या भावनेने तिला आलिंगन दिले..
हे सगळं केयु, सानु, अभि आश्चर्याने बघत होते.. आणि नाचिकेतच्या कपाळावर आठयांचं जाळं विणल्या गेलं...
ही बाई काय आपल्या सानुच्या आयुष्यात सुख येऊ देत नाही असं दिसतंय.. तो हळूच कुजबुजला..

इकडे संकेत आणि अपूर्वा हळू आवाजात बोलत होते, त्यांचं बोलणं इतक्या कमी आवाजात चाललं होतं की जवळच्या एखाद्या तिसऱ्या व्यक्तीलाही ऐकू गेलं नसतं..
"तू इथे काय करतोय?"
"मी ह्या नचिकेत चा भाऊ आहे आणि त्याचा वाढदिवस आहे म्हणून आलो होतो..त्याला त्याच्या फ्रेंड्स ना भेटवायचं होतं, पण तू कशी काय इथे? आणि तू नचिकेत ला ओळखते..आणि एक मिनिट..तुझं जमलं त्याच्यासोबत ? "
"That\"s the good news I got only today.. he proposed me today and I say yes.. yaay.." अपूर्वा परत आनंदात म्हणाली..
"Thank God... आमचं माहीत नाही कधी तयार होईल.." तो सानिकाचा चेहरा निरखत म्हणाला, सानिका त्याच्यापासून नजर चोरत होती.. ती नेहमीच असंच करायची..
"अरे हो, ती आहे कुठे आता?"
"ही काय..नचिकेत ची मैत्रीण सानिका..तुझ्यासमोरच उभी आहे.." तो हळूच तिला तिच्याकडे फिरवत म्हणाला..
आणि अपूर्वाला अजूनच आनंद झाला... "व्वा..दुनिया खरंच गोल आहे..दॅट लिटल क्युट गर्ल..चॉईस भारिये बरं का तुझी.आता तू टेन्शन नको घेऊ, माझं आणि अभिमान च जमलं , तुझं आणि सानिकाचं कसं जमत नाही तेच बघते मी आता..चला आता जेवायला..आज डबल जेवणार आहे मी.." म्हणत दोघे एकमेकांना टाळ्या देत त्या उरलेल्या चौघांकडे वळले...

क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा