Login

श्वास घेण्यास कारण की भाग 17

Story Of Two Beautiful Souls
श्वास घेण्यास कारण की... भाग 17

इकडे माईंना विश्वासच बसत नव्हता अपूर्वाचा मेसेज वाचून... गगनात त्यांचा आनंद मावेनासा झाला..काय करू काय नको असं झालं होतं..पण थोडं भानावर आल्यावर शंका कुशंकानी मन वेढल्या गेलं..कसं शक्य आहे? जी व्यक्ती कितीतरी वर्षांपासून ओळखते त्याला, आत्तापर्यंत कधीच काही वाटलं नाही तिच्याबद्दल आणि दोन महिने मागितले असताना काहीच दिवसात त्याला अपूर्वा आवडायला लागली? काहीतरी गडबड होतीये.. अपूर्वाचा काहीतरी गैरसमज तर होत नाहीये ना.. की अभिमान ने माझ्यावर चिडून हा निर्णय घेतलाय? काहीच कळत नाहीये.. मला अभि चं लग्न लवकर व्हायला हवंय खरंय पण त्याच्या मनाविरुद्ध नक्कीच नाही..
नेमकं काय कारण आहे काहीच कळत नाहीये...
त्यांनी लगेच अभिमान ला फोन लावला..त्याने तो दोन वेळा कट करून मेसेज बॅक केला.. माई माझा जरा मूड ऑफ आहे , मी घरी आल्यावर बोलतो..
अभिमान आणि सानिका सोडून बाकीचे राजी खुशीत जेवण आणि गप्पा चालल्या होत्या.. नचिकेत तिन्ही ठिकाणी अडकला होता..
त्याला सानिकासोबत संकेतला जरा वेगळं बसवण्याचा विचार होता जेणेकरून दोघांना एकमेकांना जाणून घेता येईल, आणि त्यालाही केयु सोबत बोलायला मिळेल,
त्याला बिचाराला केक कटिंग केल्यानंतर पहिल्यांदा केयु ला केक भरवायचा होता पण संकेत ला भरवावा लागला...तिच्याकडे मनसोक्त पाहत टाईम स्पेन्ड करायचा होता...जेवताना तिच्या पायाला गुदगुल्या करून मस्ती करायची होती, पण ते ही जमलं नाहीच...आधीच भेटत नाही, आज माझ्या वाढदिवसामुळे तयार झाली.. बघ ना कशी घाबरत घाबरत जेवतेय माझी चिऊ.. मनात चरफडतच नचिकेत तिच्याकडे प्रेमाने टक लावून पाहत होता..ती नेमकी अभिमान च्या बाजूला बसली, अपूर्वा अभिमानच्या दुसऱ्या बाजूला, अपूर्वाच्या बाजूला संकेत, संकेत च्या बाजूला नचिकेत ने सानुला बसवायचा प्रयत्न केला पण ती नाही बसली, त्यामुळे नचिकेत ला बसावं लागलं आणि ती केयु ला नाचिच्या बाजूला बसवायला जाणार तोच तिच्या लक्षात आलं तिला अभिमानच्या बाजूला बसावं लागेल ? म्हणून तिने आपली जागा लगेच केयु दिली.. झालं, नचिकेत रागाने नुसता फणफणत होता...पण सानुची कीव आणि केयूचा भित्रेपणा बघून तो काहीच बोलला नाही, पण नजर सारखी केयुवर जात होती.
संकेतची नजर पण सानिकावर बोलता बोलता स्थिरावत होती, ते बघून अपूर्वा गालातल्या गालात हसत होती..
आणि सानिका फक्त खाली मान घालून जेवण करत होती..तिच्या मनात काय काय चाललेलं तिलाच माहीत..
"आता मोठे झाल्यावर शाळेतले नियम मोडले तर चालतील बरं.." संकेत मधेच म्हणाला..कोणालाच काहीच कळलं नाही..
"जेवताना बोलायचं नसतं हा नियम फार काटेकोरपणे पाळत आहेत मॅडम..." त्याने शेवटी सानिका कडे बघून खुलासा केला..
"अरे, आत्ता आजारातुम उठलीये ना, हॉस्पिटलचं वातावरण काही सहन झालं नाहीये तिला म्हणून अशी गप्प गप्प असते.." अभिमान कडे राग राग बघतच नचिकेत म्हणाला..
"पण डोन्ट वरी ब्रो..तू आलयस ना..तू नक्की खुलवशील तिला..हो..ना..?"
"मी तर तिला खुलवायला कधीपासून वाट बघतोय, पण माझ्याकडे बघेल तेव्हा ना.." तो मनातच म्हणाला..
"अच्छा, काय चाललंय तुझं नेमकं, कॉलेज झालं आता काय करायचा विचार आहे..? आणि सानिका तुझा.."
सानिकाचा चेहराच उतरला.. तिने नचिकडे बघितलं त्याने पापण्या फडकावत तिला आश्वस्त केलं..
"मी जॉबसाठी प्रयत्न करतोय ब्रो, आणि सानिकाचं म्हणशील तर तिचे पॉप तिला जॉब करू देणार नाहीयेत सो.."
"का? का करू देणार नाहीये?" संकेत ने आश्चर्याने विचारलं..
"Because she has medical complications.. तिने करायलाही नको जास्त दगदग.."
"म्हणजे नेमकं काय, जरा स्पष्ट सांगतोस का?" संकेत चा स्वर कातर झालेला अभिमानला जाणवला..
त्याने पहिलेपासून शेवटपर्यंत सानिकाची केस त्याला व्यवस्थित समजावली..
ते ऐकून संकेतचे हातपाय थरथर कापायला लागले त्याच्या डोळ्यांत आसवं जमा व्हायला लागले..कोणाला दिसू नये म्हणून तो लगेच फोन आल्याचं नाटक करून उठून बाहेर आला..
नचिकेतला कळलं सगळं... तो ही "मी येतोच त्याला बघून" त्याच्या मागे मागे गेला..
अभिमान काहीच न समजून त्या दोघांकडे पहात होता, अपूर्वा मग हळूच त्याच्या कानात पुटपुटली..
"See how deeply he loves her..Lucky girl she is.."
"What? who?"
अपूर्वाने हळूच सानिकाकडे इशारा केला.. सानिका कसल्यातरी विचारात गुंतली होती.
अभिमानचे हातपायच थंड पडले..
"तुला काय माहितीये दोघांबद्दल?"
"अम्म्म, दोघांबद्दल नाही, संकेत बद्दल..सांगेन कधीतरी..आता नाही.." ती हसत उत्तरली..
अभिमानने हवालदिल होत सानिकाकडे बघितलं अभि तेव्हाच सानिकानेही त्याच्याकडे बघितलं.. आपसूकच एकमेकांच्या डोळ्यांत त्यांना एकमेकांविषयी काहीतरी जाणवलं...नेमकं काय जाणवतंय या प्रश्नाचं उत्तर ते दोघेही कितीतरी वेळ परिस्थितीचं भान हरवून कितीतरी वेळ ते शोधत होते..