इकडे सानु आणि संकेत हळूहळू जात होते.. सानु ला अनकंफर्टेबल होणार नाही ना याची पुरेपूर काळजी संकेत घेत होता..
"ऐ आपण उतरून चालत जाऊयात का?" संकेत ने विचारलं तशी सानु गोंधळली.
"का?"
"इतक्या स्लो जाण्यापेक्षा चालत गेलेलं चांगलं नाही का...बोलता पण येईल एकमेकांशी.."
"सॉरी तुम्हाला माझ्यामुळे त्रास.."
"सॉरी तर मीच म्हणायला हवंय तुम्हाला...एक काम करूयात का?"
"काय?"
"थोड्यावेळ थांबून आईस्क्रीम खाऊयात का?"
"का?"
"क्रेविंग्स"
"असे अचानक?"
"हम्म"
"पण घरी जायला आणखी उशीर होईल..."
"विल पार्क माय बाईक हिअर अँड वी विल गो बाय कॅब... दट्स फायनल."
"नाही नाही...अहो कशाला.." म्हणेपर्यंत त्याने त्याचे बाईक आईस्क्रीम पार्लर जवळ थांबवली सुद्धा...
"कुठलं घेणार? मी मँगो घेणार..."
"मला नको कुठलंच..." ती संकोचून म्हणाली.
"का? आवडत नाही? की माझ्यासोबत खायचं नाहीये?" तो तोंड पाडून म्हणाला.
"नाही नको तुम्ही खा ना.."
"म्हणजे तू माझ्या तोंडाकडे बघत बसणार...मला akward फील होईल... त्यापेक्षा मी एक कामच करतो... नाही खात, मी कॅब बुक करतोय..."
"नाही नाही प्लिज... मी घेते..."
"ये हुई ना बात...तो मॅडम कोनसा फ्लेवर खाना पसंत करोगी आप?"
"चॉकलेट.."
"नाईस चॉईस.." तो तोंडात हसून पुटपुटला आणि आत पळाला...

सानिकाला कळत होतं सगळं.. तिला मोकळं करण्यासाठी, एकमेकांची ओळख वाढवण्यासाठी तो हे सगळं करतोय..पण तिला नको होतं ते. फक्त आणि फक्त नची चा भाऊ म्हणून ती बोलत होती...
थोड्याच वेळात तो आला आणि ते दोघेही तिथल्या कट्ट्यावर बसले..
रात्रीची वेळ, कमी वर्दळ, मस्त वारा सुटलेला...तिला मस्त वाटत होतं, ती आणखीनच खुलली आणि तिला बघून संकेतही आनंदी झाला. कितीतरी वेळ ते दोघे शांत बसले होते, मेडिटेशन केल्यासारखे.
"खूप उशीर झालाय... निघायचं" हळूच संकेत म्हणाला आणि तिची तंद्री भंगली.
"हो उशीर तर झालाय..पण वातावरण तर मस्त आहे...माहीत नाही का पण खुsssप दिवसांनी इतकं छान वाटतंय.." ती डोळे बंद करून म्हणाली.
"खूप उशीर झालाय... निघायचं" हळूच संकेत म्हणाला आणि तिची तंद्री भंगली.
"हो उशीर तर झालाय..पण वातावरण तर मस्त आहे...माहीत नाही का पण खुsssप दिवसांनी इतकं छान वाटतंय.." ती डोळे बंद करून म्हणाली.
तो फक्त हसला..."मला तुझ्यापेक्षा जास्त भारी वाटतंय.." असं म्हणायचं होतं त्याला पण तिला परत इरिटेट होईल असं वाटलं म्हणून तो फक्त हसला...
"मी कॅब बुक करतोय, इट्स actually too late.."
"आणि तुम्हाला ऑफिस होतं ना.."
"हम्म थोडा उशीर होतोय खरा, मी ती मिटिंग थोडी पुढे ढकलली, सो काळजी करण्याचं कारण नाही.."
"हम्म.."
"घरी कोणी काही रागावणार नाही ना?"
"नाही actually, त्यांचा नचीवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे...तुमची ओळख करून देईन डॅड ला.. तसंही नची गप्पा गोष्टींमध्ये बरंच काही तुमच्याबद्दल सांगतो, म्हणून ते तुम्हाला ओळखून आहेत.."
"ओह, अच्छा.. तुमच्या मैत्रीला मानावं लागेल हा पण..इतकी पाण्यासारखी निखळ मैत्री मी पहिल्यांदाच बघतोय...किती वर्षे झालीत मैत्रीला तुमच्या?"
बोलत बोलत दोघेही आलेल्या कॅब मध्ये बसले...
"मोजले नाहीत आणि मोजावेसे वाटतही नाहीत खरंतर...लहानपणी आई सांगायची मोजल्याने एखादी गोष्ट कमी होते, कारण आपल्या अपेक्षातरी समोरच्या व्यक्तीकडून वाढतात आणि अपेक्षा वाढल्या की नात्याचं ओझं वाटायला लागतं. पण तरी खूप लहान असताना पासूनचे मित्र आहोत आम्ही..."
"ओह, ग्रेट आणि मग अपूर्वाला कशी ओळखतेस?"
"हॉस्पिटलमध्ये नव्हती का गाठ झाली आमची?"
"अरे हो, आता लक्षात आलं.. अपूर्वा ला तू आणि नची तिथे भेटलेलात..अपूर्वा माझी मैत्रीण, मी नचीचा मावस भाऊ, तू नचीची मैत्रीण आणि आणि येस.. नचीची मैत्रीण केयु जी actually अभि ची मानलेली बहीण आहे.. हा हा हा.. हे असं एखाद्या नात्याचं वर्तुळ हे तयार होतं ना..
अरे हो त्यावरून आठवलं, अपूर्वाने अजून फोटो नाही पाठवले आपल्याला.." त्याने त्याचा व्हाट्सएप चेक केला..
"मी एक काम करतो, व्हाट्सएप ग्रुप तयार करतो आणि तिथे टाकायला सांगतो म्हणजे सगळ्यांना मिळतील..अपूर्वा चा नंबर माझ्याकडे आहे, नची चा आहे, तुझा आहे, अभिचा आणि केयु चा नाहीये, तुझ्याकडे आहे अभि चा नंबर?" अभि चं नाव घेतल्यावर तिचा किंचित आक्रसलेला चेहरा झालेला संकेत च्या लगेच आला...

"अं हो आहे ना देते.." त्याचा नंबर तिने क्षणात काढून दिला सवय असल्यासारखा.. तो नंबर त्याला पाठवताना तिची body language त्याने observe केली... पण दाखवलं नाही तसं आणि इकडे ग्रुप बनवला.. "नात्यांचं वर्तुळ" नावाचा आणि msg पाठवला "ज्यांच्याकडेही आजचे फोटोज असतील त्यांनी प्लिज इथे टाका.."
"तुम्ही कसे ओळखता अपूर्वा मॅम ला?"
"आम्ही सिंगापूरला भेटलो होतो... ती पहिली भेट , पण तेव्हाच इतकी मस्त मैत्री झाली की लांब होतो तरी एकमेकांच्या संपर्कात राहिलो आणि ही दुसरी भेट...मस्त झालं पण तिचं आणि अभिचं जुळलं.. सिंगापूर ला आली तेव्हा वेडी होती बिचारी अभि च्या प्रेमात आणि आता तिला तिचं प्रेम मिळालं... आय एम सो हॅपी.." त्याने नजरेच्या कोपऱ्यातून तिच्या कडे बघितलं.. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं आणि ती तो ते थांबवायचा आटोकाट प्रयत्न करत होती...
कॅब तिच्या घराजवळ येऊन थांबली आणि ते दोघेही खाली उतरले..
"तुम्ही चलताय? डॅड ला भेटवून देते.."
"नाही, इट्स ओके, नंतर कधीतरी, आता खरोखरच उशीर झालाय.. बाय, गुड नाईट अँड टेक केअर..." त्याने हसून तिला निरोप दिला आणि परत त्याच कॅब मध्ये येऊन बसला...
"नाही, इट्स ओके, नंतर कधीतरी, आता खरोखरच उशीर झालाय.. बाय, गुड नाईट अँड टेक केअर..." त्याने हसून तिला निरोप दिला आणि परत त्याच कॅब मध्ये येऊन बसला...
"मित्रा मला परत तिथेच सोड जीथुन आलो होतो, मला माझी बाईक घ्यायची आहे..." त्याला ऑर्डर सोडत त्याने अपूर्वा ला फोन केला...
"हॅलो अपूर्वा.."
"हॅलो.."
"अगं कसा मस्त गेला आजचा दिवस आपल्या दोघांसाठीही.."
"..." पलीकडून त्याला हुंदका ऐकायला आला..
"अपूर्वा... "
"संकेत.. नंतर बोलू मी?"
"अपूर्वा रडतीयेस तू? काय झालं सांग.."
"संपलं रे सगळं... अभि नाही करत माझ्यावर प्रेम.." तिने रडत रडत सांगितलं...
"अपूर्वा..तू मला फक्त सांग, कुठेय तू सध्या?..."

कितीतरी वेळ तिचा हुंडक्यांचाच आवाज येत होता
क्रमशः
©नेहा गोसावी
©नेहा गोसावी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा