Login

श्वास घेण्यास कारण की... भाग 6

Story of two different souls

श्वास घेण्यास कारण की... भाग 6

अभिमान ने कितीही तिथे कितीही "कुल"पणा दाखवला असला तरीही तो जाम भडकला होता. लांब लांब टांगा टाकत त्याच्या केबिन मध्ये येऊन बसला. घटाघटा पाणी पिताना त्याला त्याचंच प्रतिबिंब समोरच्या खिडकीच्या काचेत दिसलं. 

"तू विसरलास स्वतःला अभिमान?" त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला. "कोण कुठली ती, आणि इतका कसा काय मवाळ झालास? तिने तुझ्या गाडीला डॅश मारली, धडा शिकवावा म्हणून तिचा पाठलाग केलास आणि तिचाच होऊन बसलाच, कोण आहे ती? तू ओळखतो तिला? तिचा मित्र तिच्याजवळ गेल्यावर तुला तिचा इतका राग का यावा? तिला बरं वाटावं म्हणून दिवस रात्र नर्स ला विचारत काय असतो, ज्युनियर डॉक्टर्स चं पण काम तू तिच्या साठी अंगावर घेतलंय..हॉस्पिटलमधले इतर लोक काय म्हणत असतील?  तिचा आणि तुझा काही संबंध नाही त्यामुळे आवर स्वतःला...मनाला जास्त स्वातंत्र्य देऊन चालत नाही..आणि तसंही ती कुठे नि तू कुठे... बच्ची आहे ती अजून..म्हणून पूर्वपदावर ये आणि आधीचाच व्यवहारी अभिमान हो." त्याने स्वतःची समजूत काढत तिला मनातून काढून टाकण्याचा विचार केला. 
_
आज सईच्या डिस्चार्ज चा दिवस होता..तिला कळेना इतकी धडधड का होतेय, अपसेट का वाटतंय...उलट आज तर खूप आनंदही व्हायला पाहिजे आपण घरी जातोय म्हंटल्यावर. तिचं लक्ष राहून राहून घड्याळाकडे जात होतं, नजर समोरच्या दरवाज्यावर खिळली होती.
तिथे आज तिच्या जवळ कोणीच नव्हतं. वडील डिस्चार्ज आणि कार ची सोय करायला बाहेर पडले होते आणि आईला तिनेच घरी आवरायला पाठवून दिले होते. 
"आज डॉक एकटेच यायला पाहिजे, त्यांच्याशी बोलता येईल थोडंसं, पण काय बोलायचं? ???? नंबर मागायचा का त्यांना personal? शी किती चिप दिसेल..???? काही काय सानिका..आणि त्यांच्या सोबत ती नर्स असेल ना..???? पण किती ते मला एकटं बघून थांबतील बहुतेक ????...त्यादिवशी नाही का थांबले होते ????
वेळ आहे अजून डॉक्टर ला राउंडवर यायला!" तिच्या डोक्यात विचार आला आणि ती चमकली. तू त्या डॉक ची का वाट पाहतीये सानिका? नाही नाही नाही... हट्ट.. तिने विचार झटकला.
तरीही ती अभिमान ची चातकासारखी वाट बघत होती.

तेवढयात नेहमीचीच नर्स तिच्या खोलीत आली...आणि हिचा हिरमोड झाला. कारण आज राउंड वर एक भलतेच डॉक्टर आले होते. 
ते डॉक्टर निघून गेले तसा तिने नर्स ला प्रश्न विचारला.
"डॉक्टर अभिमान नाही आले आज? येणार आहे का परत म्हणजे?" 
नर्स ने एकवार तिच्या कडे बघितलं आणि मक्ख चेहरा करून म्हणाली "नाही."
"का पण ? नाही, म्हणजे तेच माझी केस हँडल करतायेत ना.." 
"त्यांना काम आलंय urgent.." म्हणत ती निघून गेली. 

"हुह...असं का केलं त्यांनी ???? काल नची जवळ आला आणि त्यांना अंकल बोलला त्याचा राग आला असेल का त्यांना, आता मी काय करू ?????"
तेवढयात
"हे daarlo... काय करतेय माझी छम्म्मक छल्लो.." म्हणत नचिकेत तिच्या गळ्यात पडला.

"ऐ तू लांब रहा रे जरा !" तिने त्याला एका हाताने ढकललं.
"तू..तू ना असा जवळ जवळ करत जाऊ नकोस बरं!"
"का ?????" नची ओरडलाच
"आता आपण मोठे झालो आहोत ना, तुला इतकंही कळत नाही का कुठे कसं वागावं, इथे हॉस्पिटलमध्ये आहोत आपण घरी नाही..आणि तसंही आपली निखळ लहानपणापासूनची मैत्री कोणी समजून घेणार नाही...म्हणून तू जरा नीट रहा आणि तशीही तुझी उद्या बायको आल्यावर काय म्हणेल?" 
"अगं ऐ, भावाने बास...कधीपासून बकबक बकबक? आपल्यात निखळ मैत्री आहे म्हणूनच आपण इतकं फ्री राहू शकतोय ना? तुझा बॉयफ्रेंड असतो तर तुझ्या आईवडिलांसमोर हात लावायची हिम्मत झाली असती का माझी येड्या, हे कोणालाही कळलं पाहिजे आणि कोण काय बोललं का तुला? काका काकु? मला माहिती आहे ते काही बोलणार नाहीत..मग?"
तिची एकतर अभिमान आला नाही म्हणून चिडचिड आणि त्यात त्याची ज्ञान बाजी...याच्याचमुळे झालं सगळं..

"ऐ तू जा रे, मला एकटीला राहू दे जा!!" ती तोंड फुगवून बसली. 
नचिकेत ला कळेना हिला काय झालंय, माझं काय चुकलंय? 
"तुला माझ्यापासून काही प्रॉब्लेम आहे का? इतक्या वर्षांत अशी कधी नाही बोलली माझ्याशी..जाऊदे..आता नाही येणार..आणि बायकोचं म्हणशील तर तिला घेऊन आलो होतो मी दिल्लीवरून, पण इथे कोणाला काही पडलेलीच नाहीये..निघतो मी बाय.." 
"काय? ढेपल्या नच्या? बायको घेऊन आलायस ते पण दिल्लीहून? आणि मला न सांगता? कोण आहे ती ढेपल्या मला सांग आत्ताच्या आत्ता.."
"आता का? आता का? मघाशी तर म्हणे मला एकटं राहू दे.." तो तोंड वेडावत म्हणाला. 
"सॉरी ना रे नचिकेत, माझा मूड खराब होता, पण तू दिलेल्या बातमीने चांगला झाला.."
"आता सांग. कोण आहे ती, काय करते, सहा महिन्यातच तुमचं जुळलं पण आणि मला फोन वर कधी का नाही सांगितलंस ते?" 
"अगं हो, लग्न नाही केलंय अजून, माझ्या जॉब च फिक्स नाही काही,त्यामुळे तिच्या घरी मागणी नाही घालता येणार मला साध्याच, बाकी ती कोण, कुठली, काय करते, कसं जुळलं, सगळं सांगतो, धीर धर जरा.." 
ते दोघे बोलत होते की बाहेरून जोरजोरात आवाज आला..कोण बोलतंय कानोसा घेतला तर सानिकाचे डॅड आकांडतांडव करत होते. 
"डॅड, इतके का चिडलेत?" तिने थरथरत विचारलं.. आपण घातलेल्या घोळाचा परिणाम आहे हा, तिला कल्पना आली. आणि एकदा डॅड चिडले की त्यांना कोणालाच अडवण सोपं नसतं ह्याची तिला पुरेपूर खात्री होती. 
"मला नाही माहीत, तू काळजी नको करू, थांब इथेच मी बघून येतो." तो तिच्या गालाला हात लावून पळालाच. 

"काय झालं काका?" 
"नची, हे बघ, हे हॉस्पिटल आहे की वसुली केंद्र...? इतकं जबरदस्त बिल, बरं ते जाऊ दे, हे हॉस्पिटलचं महागडं आहे पण हे, गॅरेज चं बिल ठेवलंय त्यांनी माझ्या हातात, म्हणे माझ्या लेकीने त्यांच्या गाडीला धडक दिली होती आणि पळून गेली होती , अरे कसं शक्य आहे, तिचा कोणीतरी पाठलाग करत होतं म्हणून.. आणि हे सगळं त्या रिस्पेशनिस्ट ने माझ्या हातात सोपवलं..आता डॉक्टर अभिमान ला मला भेटायलाही देत नाहीये, हा काय प्रकार आहे.." 

"काका, काका, हे बघा तुम्ही शांत व्हा..आणि बिल द्या इकडे मी बघतो.."
तो रिस्पेशनिस्ट कडे गेला, तिनेही त्याला हेच सांगितलं, हे असं असं झालेलं आहे , तुम्हाला बिल भरावचं लागेल त्याशिवाय डिस्चार्ज मिळणार नाही..." 

त्यावर तो ही भडकला..आम्हाला डॉक्टर ना भेटायचं आहे आताच्या आत्ता.. ते कशावरून म्हणू शकतात सानु ने त्यांच्या गाडीला धडक दिलीये म्हणून?
दरम्यान, रिसेप्शनिस्ट अभिमान ला फोन केले तरीही त्याने येण्यास नकार दिला.

इकडे डॅडीने फोन लावला होता पोलिसांना. 

पोलीस ताबडतोब आले, त्यांच्या कॅमेरामध्ये अभिमानचीच गाडी सानिकाच्या गाड़ीचा पाठलाग करताना दिसत होती,  ते ही वाहतुकीचे सगळे नियम ढाब्यावर बसवून. 

पोलीस आले म्हंटल्यावर मात्र, रिसेप्शनिस्टचा नाईलाज झाला आणि त्याला इंफॉर्म केल. 
एव्हाना त्या आवारात चांगलीच गर्दी जमली होती, दोन आपपल्या फिल्ड मधल्या सोफिस्टीकेटेड लोकांची भांडण होती ती. 
अभिमान खाली आला आणि एकीकडे सानिकाही तिच्या खोलीतन तिकडे आली. क्षणभर दोघांची नजरानजर, अभिमान ने रागातच तिच्याकडे बघितलं आणि तिच्या डॅडीकडे गेला. 
"काय तमाशा लावलाय इथे? इथे पेशंट्स बरे व्हायला येतात, तुमचा आरडाओरडा ऐकायला नाही आणि हे हॉस्पिटल आहे लक्षात असू द्या , तुमचं घर नाही, वाट्टेल ती बडबड करायला.. या हॉस्पिटलचे बिल भरायला पैसे नाही तर इतका आरोडाओरडा करण्याच्या ऐवजी उधार मागा कोणालातरी." 
"अरे ऐ अंकल..कोणाला बोलतोय तू काही कळतं का?" 
नचिकेत मध्ये आला.. 
"कोण तू मला सांगणारा? अजून लहान आहेस बेटा, लहानांनी मोठ्यांच्या मध्ये पडू नये, संस्कारच तसे म्हणा..मुलगी काय तर दुसऱ्यांच्या गाडीला डॅश देत फिरते आणि तिचा मित्र काय तर बोलण्याचा सेन्स नाही.." 
"ओ..डॉक्टर.. जास्त बोलताय तुम्ही..पाठलाग करायचा स्वतः आणि नंतर बोंबलत फिरायचं की मुली गाडीला धडक देत फिरतात म्हणून...म्हणजे पैसेही उकळता येतात, आणि हेतू ही साध्य होतो.." तिचे चिडून म्हणाले..
"हे बघा, तुम्ही हॉस्पिटलचा रिपेट्युशन खराब करताय, यासाठी मी कोर्टात जाईन, सांगून ठेवतो.." 

"मिस्टर अभिमान, तुमच्या विरुद्ध यांची तक्रार आहे की तुम्ही यांच्या मुलीचा पाठलाग केलात आणि तिच्या अपघाताला पण तुम्हीच जवाबदार आहात..खरंय हे , ते या सीसीटीव्ही फुटेज वरून सिद्ध होत आहे.." आत्तापर्यंत शांत बसलेला पोलीस ऑफिसर म्हणाला.

"हे बघा मी त्यांचा पाठलाग केला कारण त्या माझ्या नवीन गाडीला डॅश मारत होत्या, एकदा नाही दोन तीनदा..मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्या पळून गेला म्हणून ला त्यांचा पाठलाग करावा लागला, माझ्याकडेही प्रूफ आहेत, आणि रेकॉर्ड आहे, हे घ्या.." 
त्याने त्याच्या हातातली पेन ड्राइव्ह इन्स्पेक्टर च्या हातात दिली..
"हे सगळं प्रूफ स्पष्टीकरण वैगरे आता कोर्टात, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल.." 
तो चिडतच सानिकाकडे गेला..त्याला तिला कानफडायची ईच्छा होत होती...या पोरीमुळे माझी आणि माई, बाबांनी घेतलेली मेहनत आणि प्रतिष्ठा दोन्हीही जाणार...कोर्टातून तर सुटू पण ही मानहानी कोण भरून काढणार...
काहीही न सुचून तो तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
"मिस सानिका, हे सगळं तुमच्यामुळे..."
तेवढ्यात तिचे वडील परत गरजले..
"तिला कशाला बोल लावताय हो..तिचा पाठलाग करताना.." 
"डॅड बास आता.." इतक्या वेळ थरथरत उभी असलेली सहन होऊन जोरात ओरडली.
"यांची काहीच चूक नाहीये डॅड....मी लपून गाडी काढली, पार्क करायच्या  वेळी ह्यांच्या गाडीला ठोस मारली...चूक ह्यांची नाहीये, माझी आहे, कोणीही माझा पाठलाग केला नाही, ते सगळं मी खोटं बोलले होते डॅड, आय अम सो सॉरी..मी तुमच्यासोबत खोट नको होतं.." हे सगळं तिचे वडील तिच्या जवळ आले आणि सन्नकन् त्यांनी तिच्या कानाखाली वाजवली.. 
आधीच तिची इतकी नाजूक परिस्थिती, एक हात बांधलेला, हृदय गतीने धडधडत होतं, त्यातला त्यात अपमान...तिला सहन नाही झाला आणि ती कोसळली पण अभिमान ने तिला अलगद झेललं तेही आपल्या कवेत..तसंच त्याला बघत तिची शुद्ध हरपली..

क्रमशः
©नेहा गोसावी

0

🎭 Series Post

View all