श्वास घेण्यास कारण की... भाग 9
---
"अं सॉरी, मघाशी जे काही झालं त्या बद्दल माफी मागते मी, तुमच्याबद्दल असं उलटसुलट सांगायला नको होतं मी डॅड ना.."
"खरं सांगू? मलाही खूप राग आला होता या गोष्टीचा..पण अनावधानाने होऊन जातं असं, इट्स ओके.." तुझ्याऐवजी दुसरं कोणीतरी असतं तर तोंडही नसतं बघितलं असं म्हणावं किती तोंडात होतं त्याच्या पण त्याने आवरलं..
"Thank u डॉक्टर.. आणि हो मी तुमच्या त्या गाडीची नुकसानभरपाई मला जमेल तशी करेन हं.." तिच्या त्या बोलण्यात इतकी निरागसता होती की तो हसतच सुटला.
"बरं, नुकसानभरपाई नंतर करा, आधी काळजी घ्या स्वतःची.." तो डोळे मिचकावत म्हणाला.
"हसायला काय झालं?तुम्हाला असं वाटतंय का की मी तुम्हाला पैसे देऊ नाही शकणार? मी आता जॉब शोधतेच आहे.. एकदा का जॉब मिळाला की दर महिन्याला तुमचे पैसे फेडत जाईन.."
"तू जॉब करणारेस?" त्याने एक भुवई वरती करत विचारलं..
"हे च म्हणाले ना मी आत्ता, की काही वेगळं..."
"हो पण तुझ्या वडीलांना माहितीये हे?" त्याने काळजीने विचारलं, त्याच्या डोक्यात तिच्या तब्येतीचे विचार.
"अर्थात नाही, हे आत्ताच ठरलं ना, तुमच्या समोर, आणि मी करणार म्हणजे करणारच, त्यांनी लहानपणापासून काहीच नाही करू दिलं मला आत्तापर्यंत.. ना खेळ ना, ना सहली, ना कुठे फ्रेंड्स सोबत जाणं... आता मला स्वतंत्र व्हायचंय..आणि आता तर मी तूमचे पैसे चुकवायला त्यांची मदत तर अजिबात घेणार नाहीये..कळलं.." तिचा आतला राग हळूहळू वाढायला लागला आणि आवाजही चढायला लागला..
तिला तिच्या वडिलांनी असं का करू दिलं नाही किंवा ते का इतके काळजी घेतात ह्याची त्याला कल्पना होती. हृदयात छिद्र असलं की तसंही मधेच खेळताना बागडताना धाप लागते, त्रास व्हायला लागतो, चक्कर येते, दगदग झाली की काहीही होऊ शकतं. म्हणूनच लहानपणी ते छिद्र बुजलेलं चांगले असते नाहीतर ऑपरेशन करावं लागतं..पण हिच्या बाबतीत या दोन्हीही गोष्टी झाल्या नाहीत..म्हणून ते इतके ओव्हर प्रोटेक्टिव्ह..म्हणून हिची वाढ जास्त झाली नाही, बुटकी आणि एकदम सडपातळ.. आपण हिला साधं आलिंगन दिलं तरी ती पूर्णपणे आपल्यात सामावून जाईल अशी.. पण बाप लेक दोन्हीही सारखेच, तेवढेच हट्टी.. समजा या लोकांसोबत आपला संबंध जोडला जाईल तेव्हा काय होईल आपलं.. हंटर घेऊनच बसावं लागेल आपल्याला, यांना सुधरवायला... त्याच्या समोर ते दृश्य तरळलं आणि परत हसायला लागला..
तिने आश्चर्याने बघितलं त्याच्याकडे...छानच दिसत होता तो..जाडसर भुवया आणि बदामी आकाराचे घारे डोळे..हसला की ओठांसोबत त्या दोन्ही साईडला पसरून चेहरा आकर्षक अधिक आकर्षक झाला होता. चेहरा उजळणारा त्याचा हलका फ्लूरोसंट रंगाचा बाह्या दुमडलेला शर्ट त्याच्यावर चांगलाच उठून दिसत होता..त्याच्या शरीरयष्टी वरून तो किती हेल्द कॉन्शस असला पाहिजे याची कल्पना आली तिला.. नाहीतर आपण... तिला आठवलं आणि तिने स्वतःच्या कपड्यांकडे बघितलं...शी..हॉस्पिटलच्याच कपड्यांमध्ये आहोत की आपण ह्याच्यासमोर..आता कशी दिसत असेल मी...ओह नो..काय वाटत असेल त्याला...आरसा..आरसा कुठेय आरसा..
तिने तिच्याच तंद्रीत उठण्याचा प्रयत्न केला पण
"आई ग.." म्हणत ती परत कोसळली..आणि इकडे अभिमान सुद्धा भानावर आला..
"काय झालं? का उठताय? काही हवंय का? मला सांगा मी देतो.."
"तो आरसा.." तिने बोट दाखवलं आरसाकडे..
"का?"
"तुम्ही हसताय ना सारखेच माझ्या कडे पाहून, विनाकारण..म्हणून मी ते, आपलं, मला वाटलं मी जोकर सारखी दिसतेय का शुद्धीवर आल्यावर..ते बघायला पाहिजे ना.."
"काय? हा हा हा हा हा..तुम्ही पण ना .." आणि तो परत हसायला लागला...
"बरं मला आता निघावं लागेल..काळजी घ्या..आणि हं मी आता इथे नसेल..म्हणजे तुमची केस दुसऱ्या डॉक्टरांना दिली गेलीये..सो..."
तिचा चेहराच उतरला..
त्याच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने फक्त स्माईल करत होकारार्थी मान हलवली...
त्याच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही ते.. " पण तुम्ही काळजी घ्या हं स्वतःची.."
"हो..." तिला कोणास ठाऊक रडायला येत होतं..ती जास्त बोलू शकत नव्हती आणि ह्याचा पाय निघत नव्हता..
त्याच्यासाठी तिला परत भेटणं, अशीच एखादी चक्कर टाकणं किंवा रेकॉर्ड मधून तिचा पत्ता वैगरे मिळवणं सहज शक्य होतं पण हिचं काय..तिला वाटलं झालं, ही आजची शेवटची भेट ठरते..
"अं आणि हो..ते मला म्हणायचं होतं की..इथून गेलात की तुमचे रेकॉर्ड्स घेऊन या परत, हेल्थ चेक अप पण होईल आणि..."
"आणि काय डॉक्टर.."
"अं आणि ते माझं बिल वैगरे तुमच्या पैशातून देण्याचा प्रयत्न वैगरे करू नका नोकरी लागून, तुमचे डॅड आणि मी बघून घेऊ.."
"नाही हं.. अजिबात नाही..डॅड ला सांगा तुम्ही ते विसरलात म्हणून, त्यांच्याकडून एक पैसाही घेणार नाही आहात तुम्ही आणि मी चुकते करणार ते हळूहळू, मी विसरणार नाहीये..हवं तर तुम्ही माझा नंबर घ्या...म्हणजे तुम्ही मला कधीही बिलाच्या बाबतीत पिंग करू शकता.."
"सानिका, त्याच्या खरंच गरज नाहीये, मला नकोय, ना तुमच्या वडिलांकडून ना तुमच्या कडून..."
"नाही असं कसं..आधी तुम्ही माझा नंबर घ्या..नाही थांबा मीच घेते माझा नंबर..अरे हा माझा फोन कुठे गेला यार..पाय फुटलेत का त्याला.." तिची परत गडबड चालू झाली..
"तुम्ही प्रत्येक वेळेस इतक्या हायपर होत जाऊ नका हो..रिलॅक्स रहा.. द्या नंबर द्या.." नाही म्हंटलं तरी सुखावला हा..पोरगी स्वतःहून नंबर देतेय म्हणजे...मन मे लड्डू तो फुटना ही था..
तिने नंबर दिला , ह्याने रिंग दिली..मोबाईल कुठेतरी कोपऱ्यातल्या सोफ्यावर पडला होता..
"आणून देऊ?" त्याने लगेच विचारलं.
तिने होकारार्थी मान हलवत एवढूसं तोंड केलं... "प्लिज"
त्याने पटकन जाऊन घेतलं ते..
तिच्या मोबाईल वर तिचा एकटीचा फोटो होता स्क्रीन लॉकवर,साडीतला..केस मोकळे सोडलेले , डोळ्यांत काजळ वैगरे..
She is just beautiful.. तो मनातच म्हणाला आणि तिला फोन नेऊन दिला...
आता ते दोघेही निश्चिंत झाले..नंबर एक्सचेंज केले तेव्हा मन ही एक्स्चेंज झाले होते दोघांचे ...
क्रमशः
©नेहा गोसावी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा