Login

श्वास घेण्यास कारण की भाग 13

Story Of Two Beautiful Souls


श्वास घेण्यास कारण की... भाग 13
-----
"सकाळी गेले होते तुझ्या एका पेशन्ट् ला भेटायला..म्हणजे माईंनीच पाठवलं होतं मला.." अपूर्वा म्हणाली
ती म्हणाली आणि ह्याला ठसकाच लागला..
"म्हणजे, कोणाबद्दल बोलतेय?"
"कोणी सानिका आहे ना..गोड आहे मुलगी..छोटीशी..डोळे तर इतके पाणीदार आहेत तिचे पण आज continue रडत होती, माहीत नाही काय झालं होतं, थोडंस दुखतेय म्हणाली ती.." अभिमानने कॉफ़ी चा सिप घेतला होता, तो कसाबसा गिळला... आणि टिश्यु पेपर ला तोंड पुसत म्हणाला.. "चल निघायचं?"

अभिमान आणि अपूर्वा कॅफेतून बाहेर पडले.

"ऐक ना अभिमान, काय झालंय, माझं काही चुकलं का?"

"नाही ग नाही! मला माझे एक काम आठवले म्हणून घाई केली अँड I am really sorry for that." गाडीत बसल्यावर बेल्ट लावताना तो म्हणाला.

तीही त्याच्या बाजूच्या सीट वर बसली व त्याने गाडी सुरू केली.

"इतक्या दिवसांनी, तू मला कॉफी साठी विचारलं..छान वाटलं मला..."

ती काय बोलत होती त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं.. माई ने आज अपूर्वाला तिच्या खोलीत पाठवलं म्हणजे माईने जाणूनबुजून केलं का? काय गरज आहे माईला हे सगळं करण्याची? मी सांगितलंय ना तिला दोन महिने हवेत मला म्हणून.

अपूर्वा बोलतच होती
"पण तुला अचानक असा उठलेला पाहून घाबरले ना मी..मला वाटलं तुला राग आला की काय? नाकावर रागच आहे ना तुझ्या..बाय दे वे, आज फार हँडसम दिसतोयस.." तिला राहवलं नाहीच, शेवटी बोलूनच गेली ती.

तरीही ह्याचं लक्ष नाही..तो फक्त शरीराने कार चालवत होता मनाने कधीच तिच्यापर्यंत पोहोचला होता. "सानिकाला रडायला काय झालं होतं म्हणे? काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला? का रडत असेल ती..मला जाऊन बघायला हवं का?"

"अभि अरे लक्ष नाहीये का तुझं? मी काय बोलतेय? काय झालं..आणि अरे अरे, गाडी तू हॉस्पिटल च्या दिशेने नेतोय, मला तुला घरी सोडायचं होतं ना?" तिने त्याच्या खांद्याला हलकासा स्पर्श केला तेव्हा तो भानावर आला.

"अं नाही ते, माझी कार मी हॉस्पिटलला मागवून घेईन आणि तिथून जाईन घरी, तसंही म्हणालो ना, एक छोटंसं काम आहे ते.."

"अच्छा माई म्हणाल्या, म्हणून मला वाटलं.."

"काय म्हणाली माई, हां , नक्की काय म्हणाली.." त्याने जरासं स्टेरिंग वर हात आपटून राग काढला.

"अरे हो, का चीडतोय? विशेष काही नाही...माई म्हणाल्या की त्याला घेऊन आल्यावर तू घरीच ये जेवायला.."

तिला वाटलं तो म्हणेल, अच्छा चल की मग घरी पण त्याचं आताही लक्ष नव्हतं. अपूर्वा लागलं ते त्याचं वागणं.
आपण इतकी छान साडी नेसलोय,अख्या हॉस्पिटलने आपल्या दिसण्याचं आज कौतुक केलं पण याला काहीच वाटत नाहीये त्याचं. तिचं मन खट्टू झालं. प्रत्येक वेळेस आपण याच्या अवतीभवती असल्याची जाणीव करून देत राहतो तरीही ह्याच्या डोळ्यांत येतच नाहीये मी.
ती खूप नाराज झाली..डोळ्यांच्या कड्यांशी आलेले आसव तिने इकडेतिकडे पाहात कसेबसे आत लोटले.

अभिमान ने गाडी हॉस्पिटलमध्ये आणली. Doctor\"s reserve parking मध्ये नेणार तोच ती त्याला म्हणाली..
"अरे असू दे..परस्पर जाईन मी घरी कदाचित इथून.."
"Ok patient\"s parking मध्ये तर राहू देत."
तिने चमकून पाहिलं, मघाशी मी बोललेल ह्याने काहीच ऐकलं नाही का..माईंनी मला जेवायला बोलावलंय हे ही नाही ?

त्याने कार थांबवली..पण समोरचं दृश्य पाहून भांबावला.
सानिका ला डिस्चार्ज मिळाला होता. तिचं सगळं सामान आणि काही वस्तू घेऊन डॅड पुढे होते तर, तिचा हात पकडून नचिकेत तिला हळूहळू त्यांच्या गाडीजवळ आणत होता.
नचिकेतने एक हात तिच्या खांद्याला तर त्याचा दुसरा हात सरळ सरळ हातात घट्ट पकडला होता. खरंतर, ती अशक्तपणामुळे चक्कर येऊन पडू नये त्याने ते केलं होतं पण अभिमान हैराण झाला, आणि त्यांच्याकडे पाहत बसला.
इतक्यात नचिकेत आणि सानुचंही लक्ष कार मध्ये बसलेल्या त्या दोघांकडे गेलं. तशी अभिमान ने नजर फिरवली आणि तडक कार मधून उतरला, अपूर्वाही उतरणार तोच त्याने तिचा दरवाजा उघडून, तिच्या हातात आपला हात देत, ती बाहेर उतरेपर्यंत म्हणाला..."It was such nice treat Apurva.. Hope we will get the chance again and again.."

हे सगळं अभिमान मुद्दाम करत होता पण खेळ दोन निरागस जीवांच्या मनाचा चालला होता.. कारण सानिकाचं हृदय त्या दोघांना बघून तीळ तीळ तुटत होतं तर अपूर्वाला त्याच्या ह्या गेसचर ने आश्चर्य वाटलं होतं आणि आनंदही झाला होता..

तेवढयात तिचं लक्ष सानिकाकडे कडे गेलं आणि ती पळालीच तिच्याकडे..

"हे तू, क्युट गर्ल, मिळाला ना डिस्चार्ज? कशी आहे आता.."
सानिकाने बळेच कोरड हसू चेहऱ्यावर आणलं.. आणि हळूच आपले डोळे अभिमान कडे रोखले..
अभिमानची आणि तिची नजरानजर झाली..
तिने रडून काय हालत करून घेतली होती स्वतःची. तिचे डोळे रडून रडून लाल झालेले होते, चेहरा पूर्ण उतरला होता.. अभिमानच्या काळजात चर्र झालं.
त्याचाही चेहरा उतरला.. त्यांच्याही नकळत त्यांचा नजरेचा खेळ चालू होता.
अपुर्वाच तर लक्षच नव्हतं, ती तिच्यासोबत च बोलत होती पण नचिकेत या दोघांना बरोबर observe करत होता.

"हे बघ अभिमान मी हिच्याबद्दल च म्हणाले होते.."
"अच्छा ठीक आहे, उशीर होतोय मला..चल लवकर.." अभिमान सानिकाकडे दुर्लक्ष करण्याचं नाटक करत म्हणाला.
"हो हो.." "अं सानिका.. प्लिज काळजी घे स्वतःची, काही लागलं तर सांग हां.."
"Okey doctor.."
"डॉक्टर नाही, दि..दि म्हणायचं तू मला ठरलं ना.."
सानिका काहीही म्हणाली नाही, पण अपूर्वाच्या बोलण्यामुळे तिला निरागस हसू फुटलं..मान होकारार्थी हलवून क्युट स्माईल दिली तिने अपूर्वाला..
तिच्या चेहऱ्यावरची स्माईल उन्हाळ्यातल्या पावसाप्रमाणे आल्हादायक वाटली त्याला आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला.
"चालतोयस ना, अभिमान.."
"अं, हो हो.." तो भानावर येऊन चालायला लागला..
न राहवून थोड्यावेळाने त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा तीनेही काडीचा दरवाजा लावताना त्याच्याकडे पाहिलं, आणि बाहेर उभ्या असलेल्या नचिकेत च्या ओठाच्या कड्या रुंदावल्या.. "तो आग दोनो तरफ से लगी है, भाई साहाब.." हसून पुटपटत तो ही गाडीत जाऊन बसला.

क्रमशः
©नेहा गोसावी
0

🎭 Series Post

View all