Login

श्वास घेण्यास कारण की... भाग 19

Story Of Two Pure Souls


श्वास घेण्यास कारण की... भाग 18
__
"हुश्श आता कुठे आपल्याला बोलता येईल..." कार कडे वळता वळता अपूर्वाने अभिमानचा हात त्याच्या दंडाला पकडून आपल्या हातात घेतला. अभिमान ला आवडलं नाही ते..त्याने नाईलाजाने तिच्याकडे बघत स्मितहास्य केलं..आणि आवंढा गिळला..

"हो बोलूयात ना.." म्हणत अलगद तिला दूर सारलं.
तिने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघितलं.

त्याने कार कडे इशारा केला आणि तिच्यासाठी हसून समोरचा दरवाजा उघडला...

ती आत बसली तसा तो वळला आणि समोर पाहिलं तशी सानु तिथेच उभी राहून त्या दोघांना बघत होती.. त्या दोघांची नजरानजर झाली तशी तिने नजर दुसरीकडे फिरवली..

ती एकटी तिथे काय करतेय, संकेत कुठे तिला तो विचारायला जाणार तोच संकेत मागून आला त्याची बाईक घेऊन..

"तुम्ही बाईक घेऊन आलात?"

"हं actually आज झाला होता मूड बाईक चालवण्याचा..रोज रोज कार चालवून कंटाळा येतो, So I thought आज बाईक काढावी."

"पण तुम्हाला तुमच्या ऑफिस ला जायचंय ना?"

"आधी नव्हता प्लॅन, पण मघाशीच फोन आलेला ना.. International client सोबत online मिटींग घ्यावी लागतेय अचानक..जाईन असाच ? फक्त मुलींच्या नजरा  संभाळून ?, casuals मधे फारच हँडसम दिसतो ना मी ?"

तिने त्याच्याकडे पाहिलं..तो खरंच हँडसम होता.. ब्लॅक प्लेन कलरची प्लेन टीशर्ट आणि जीन्स..हनुवटीवर डावीकडे छोटासा तीळ, तरतरीत नाक, बोलके डोळे, प्रसन्न चेहरा आणि उंची खरोखरच  जास्त होती त्याची..

"सानिका, अशी बघू नकोस ना मला, मला लाजायला होतंय..." त्याच्या बोलण्यावर ती अगदी खळाळून हसली.

"तुम्ही पण ना..मी का बघू तुम्हाला?" तिने हलकेच त्याच्या खांद्यावर चापट मारली.

"आई ग! लागलं ना..किती जोरात मारलं.." तो नाटकी स्वरात म्हणाला..पण तिला ते खरंच लागलं.."सॉरी.." ती खाली मान घालत पुटपुटली..

"असं कसं सॉरी...तुला त्याची शिक्षा मिळेल आता.."

"काय?" तिने खाडकन मान वर केली

"आधी बस, जाता जाता सांगतो.."

त्याने एक हात पुढे केला..तिचा प्रश्नार्थक चेहरा..
"तुला दोन्हीही कडून पाय टाकायला बसता येणार असेल तर नको देऊस हात.." त्याने तिच्या ड्रेस कडे बघत म्हंटलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं, फ्रॉक घातला होता ना तिने त्यामुळे तिला वन साईडेड च बसावं लागणार होतं..

ती त्याच्या हाताच्या आधार घेऊन त्याच्या बाईकवर वन साईडेड बसली...

"It\"s so unconformable , you know.." ती सहज बोलून गेली.. त्याचा चेहराच उतरला..

"Oh I m so sorry, Sanika, मला आयडियाच नव्हती, एक काम करतो, बाईक इथेच पार्क करतो आणि cab बोलवून तुला घरापर्यंत सोडतो.. Please wait.." त्याने स्टँड काढलं..

"नाही नाही, नको..मी..म्हणजे मला तसा काही प्रॉब्लेम नाही आणि I am really very sorry..हा ड्रेस फक्त जरा सांभाळावा लागेल सो प्लिज गाडी जरा सावकाश चालवा.." ती कसनुस करत म्हणाली

त्याने नाईलाजाने स्टँड काढलं, त्याचा मूड ऑफ झाला होता खरंतर..कुठून दुर्बुद्धी सुचली आणि बाईक घेऊन आलो असं झालं त्याला.

"निघायचं?" तिने मान हलवली हे बघत त्याने सावकाश गाडी काढली.. जाताना त्याचं अभिमान कडे लक्ष गेलं..

तो त्यांनाच बघत होता..

"बाय ब्रो" म्हणत संकेत पुढे निघून गेला आणि त्याच्या driving sit वर जाऊन बसला..

अभिजीतची परिस्थिती काय झाली होती त्याचं त्याला माहित, आत्तापर्यँत नचिकेत तिच्यासोबत होता म्हणून त्याने एवढा आकांडतांडव केला आणि आता दुसरंच कोणीतरी तिला त्याच्यासमोरून उचलून घेऊन चाललंय आणि आपण फक्त बघत बसल्याचं फील त्याला आलं..

"काय झालं? इतका वेळ का लागला?"

"फोन..?" त्याने सीट बेल्ट लावत उदास हास्य करत म्हणलं आणि गाडी काढली.

"का शांत शांत आहेस?" ड्राईव्ह करून बराच वेळ झाला म्हणून गोंधळून अपूर्वाने विचारलं..

"आज खूप काही झालंय ना, टेन्शन आलंय, काम पडलीयेत दुनियाभराची म्हणून जरा विचार करतोय.."

"तू टेन्शन नको ना घेऊ अभि...मी आहे ना? आणि इतकं काय रे हॉस्पिटलच टेन्शन घेतोएस? आपण दोघे मिळून अभिमान हॉस्पिटलला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवू..तू या शहरातला बेस्ट हार्ट सर्जन आहेस विसरतोय का? आपण आता आपल्या, आपल्या दोघांच्या future आणि प्रेझेंट बद्दल बोलायला पाहिजे असं नाही वाटत का तुला" तिने त्याचा गिअरवरचा हात आपल्या हातात घेत म्हंटलं..

"अपूर्वा, मी काही घाई नाही ना ग केली...म्हणजे मला नेमकं शब्दात सांगता येत नाहीये पण मला तू आवडतेस खरंतर.. पण एक छोटासा म्हणजे अगदी छोटासा प्रश्न आहे,  हे जे काही आवडणं आहे तेच प्रेम आहे का? की हे आवडणं म्हणजे फक्त आवडणंच आहे..म्हणजे कधी कधी माणूस जसा फक्त आवडून जातो तसं..?"

अपूर्वाचा चेहरा विलक्षण उतरला...

"तुझं तुलाच कन्फर्म नव्हतं तर मग तू का विचारलं मला लग्नासाठी?" तिला जोरात ओरडून त्याला विचारावंस वाटलं पण तिच्या सहनशक्तीची खरंच कमाल होती..

"एखाद्याबद्दल दीर्घकाळापर्यंत भयंकर ओढ वाटणं, तो जवळ असूनही त्याला सतत आठवत राहणं, त्याच्याबद्दल एकप्रकारची काळजी वाटणं, सतत त्याच्या एका भेटीसाठी आसुसलेलं असणं, रोज घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला सांगावसं वाटणं, त्याच बोलणं, त्याच वागणं, राहणं प्रत्येक गोष्टीबद्दल अप्रुव वाटणं आणि सर्वात महत्वाचं, त्याला दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीसोबत पाहून सहन न होणं... हे सगळं प्रेमात होतं.. तुला..तुला वाटतं का असं काही माझ्याबद्दल..?" तिने आशेने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने झटकन गाडी बाजूला घेतली..आणि थांबवली..

असहाय्य पणे त्याने सीट मागे सरकवून त्यावर मान ठेवली..आणि डोळे मिटले...

आत्ता अपूर्वाने जी प्रेमाची व्याख्या सांगितली होती, त्या प्रत्येक वाक्यासरशी त्याला सानुचाच चेहरा दिसत होता..

त्याच्या डोळयातून पाणी अलगद गालावर झिरपलं, त्याने तशीच मान हलवून "मला हे सगळं तुझ्याबद्दल नाही वाटत अपूर्वा.." म्हणत त्याने एक हुंदका दिला..

तशी अपूर्वानेही आत्तापर्यंत रोखून धरलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली..