Login

श्वास घेण्यास कारण की... भाग 18

Story Of Pure Souls


श्वास घेण्यास कारण की... भाग 18
__
"हे बघ आलाच नचिकेत संकेत ला घेऊन" अपूर्वा म्हणाली तसे एकमेकांच्या डोळ्यांत बघत असलेले ते दोघेही खडबडून जागे झाले..
नचिकेत आणि संकेत जागेवर येऊन बसले.. वातावरण फारच शांत होतं..
"गाईज, चिल, माझ्यासाठी इतकं सिरीयस होण्याची गरज नाहीये ?.." सानिका शेवटी बोललीच..
"मी ठवरलंय डॅड ना कन्व्हेंस करायचं.. आणि मी शोधतीये जॉब चांगला. Everything will be fine, so just don\"t worry.."
"एक बोलू सानिका? म्हणजे मला माहित नाही माझं हे मत तुला कितपत मॅटर करेल पण अंकल ना तुझी काळजी वाटतेय म्हणून ते नाही म्हणत असतील तर तू रेस्ट घेतलेली बरी, किंवा..किंवा माझ्या कंपनीत पार्ट टाईम जॉब चालेल तुला? म्हणजे तुझा वेळही जाईल आणि तुझ्या तब्येतीवर पण फारसा परिणाम होणार नाही.." संकेत ने उपाय सुचवला तसा अभिमान सोडून सगळ्यांचे चेहरे उजळले..
"चालेल.." असं सानिका म्हणणार तोच अभिमान म्हणाला..."इव्हन आय हॅव अ बेटर आयडिया सानिका.."
"आलाच मध्ये.." नचिकेत रागात पुटपुटला..
"You can join my hospital as in admin department.. तुझा कॉमर्स बॅकग्राऊंड आहे त्यामुळे फायनान्स  मध्ये हॉस्पिटलला मदत करू शकतेस आणि सर्वात महत्वाचं हॉस्पिटलकडून आमच्या स्टाफ च्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते, काही प्रॉब्लेम आलाच तरीही टेन्शन नाही कारण मी स्वतः हार्ट सर्जन आहे..?" 
"येस, मस्तच..सानिकाकडे आपलं लक्षही राहील आणि मला माहिती आहे तिची जास्त दगदगही होणार नाही..अभिमान, तुझं डोकं इतकं सुपीक चालतं ना म्हणून मला तू आवडतोस.." अपूर्वा लाजत म्हणाली..
"ओहो.. समवन इज ब्लशिग, बट येस नाईस आयडिया.." संकेत म्हणाला
"काय नाईस आयडिया..हे बघ मला असं वाटतं तिला हॉस्पिटलचं वातावरण सहन होणार नाही, तिथले पेशंट्स बघून अजूनच तिच्या मनावर दडपण येईल..त्यापेक्षा सानिकाने संकेत ब्रो च ऐकावं आणि त्याची कंपनी जॉईन करावी.."
तिथल्या कोणालाच कळत नव्हत हा अभिमानच्या नावाने इतका का चिडतो? सानिकाला खरंतर अभिमानच ऐकायचं होतं पण मन त्याच्यात गुंतेल म्हणून तिचा संकेतच्या ऑफिसमध्ये जाण्याचा कल होता..नेमकं काय करावं तिला कळेना.."ओके ओके, मी एक काम करते, घरी गेल्यावर डॅड सोबत बोलते, मग जे ठरेल ते मी तुम्हाला  कळवते.... बाय द वे, तुम्ही दोघांनीही मला एकाच वेळेस इथे जेवणाच्या टेबलवर जॉबची ऑफर दिल्याबद्दल मनापासून थँक्स.. कदाचित मी या जगातली पहिली मुलगी असेल जिला मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी एक नाही तर दोन जॉब्स च्या ऑफर मिळाल्या असतील.." सानिका म्हणाली तसे सगळे खदखदून हसायला लागले आणि वातावरण निवळलं.. 
"आली ग माझी बाय पूर्वपदावर.." म्हणत नचिकेत ने तिचे गाल ओढले.. आणि केयु वर नजर फिरवली. तिचा चेहरा बघून तिला त्याचं वागणं आवडलं नाही हे लक्षात आलं..
"चलो गाईज..मस्त वेळ गेला आज..नवीन लोक दोस्त बनली,जुने दोस्त नव्याने उलगडले, एकूण भारी वाटतंय..."  संकेत..
"तो इस बात पे एक ग्रुप सेल्फी हो जाये?" अपूर्वा ने तिचा फोन काढत विचारलं..
"का नाही.?" सगळे एकसाथ ओरडले..
"ऐ दे तो फोन मी उंच आहे तुम्हां सगळ्यांत मी काढतो म्हणजे चांगला येईल.." संकेत ने अपूर्वाच्या हातातून फोन घेत म्हंटल.
सेल्फी घेण्याच्या वेळेला नाचिकेत मागे उभा राहीला आणि त्याने केयु लाही कोणालाही समजू न देता मागे ओढलं.. त्याचा उजवा हात तिच्या कमरेभोवती नेत तिचा उजवा हात घट्ट पकडला आणि समोर बघितलं.. सेल्फी मध्ये हे येणार नव्हतं कारण सानु मुद्दाम त्यांच्या पुढे जाऊन उभी राहिली..,केयु चा चेहरा गारामोरा झाला होता पण नचिकेत गालातल्या गालात हसत होता.. संकेत सर्वात पुढे, मागे अभि आणि अपूर्वा, त्यांच्या मागे मध्ये सानु आणि तिच्या मागे हे दोन लव्ह बर्डस परफेक्ट सेट झाले होते..
संकेत मोठ्याने म्हणाला "आपल्या नवीन फ्रेंडशिप च्या नावाने...हीप हिप.." बाकीच्यांनीही त्याला "हुर्रे" म्हणत साथ दिली आणि सेल्फी निघाला..

"आता मी आपला व्हाट्सएप वर ग्रुप क्रिएट करते आणि त्यावर टाकते हा फोटो..चला आता घरी..कोण कसं जाणार आहे?"
"अभि आणि अपूर्वा तुम्ही दोघे जा..तुम्हाला खूप बोलायचं असेल ना आज, पहिलाच दिवस त्यातही एकांत नाही मिळाला..? नचिकेत तू केयु ला सोडून दे..चालेल ना अभि तुला.."
"हो केयु तू आता जा नचिकेत सोबत...पण मला उद्या बोलायचं आहे तुझ्याशी.."
"हो भाई.."
"आणि मी कशी जाऊ ? माझी तर कोणाला इथे काही पडलीच नाहीये..,मी जाते आपली कॅब बुक करून.."
"मॅडम ने माझा  बडे स्वतःच्या नावावर खपवला आणि आता म्हणतायत की माझी कोणाला पडलेली नाही ? ?"
"हा हा हा ड्युड..मी ऑफिसलाच जातोय आता मिटिंग ला..जाता जाता सोडतो तिला घरी डोन्ट वरी.." संकेत..
"कशाला? त्यापेक्षा मी.." अभिमान म्हणणार तेवढयात त्याला अपूर्वा ने हात पकडत नाही म्हणून इशारा केला तसा तो नाईलाजाने चूप बसला.

एकमेकांना गुड नाईट करत सगळे निघाले..इथून सगळ्यांच्याच प्रेमाला एक नवीन वळण मिळणार आहे, त्यांच्यातली मैत्री अजून घट्ट होईल? की अजून काही वेगळं वळण मिळेल हे तर नियतीच्याच हातात आहे.