चॅम्पियन्स ट्रॉफी -2025
जलद कथालेखन स्पर्धा
सायलेंट डिवोर्स भाग - 3 ( अंतिम)
जलद कथालेखन स्पर्धा
सायलेंट डिवोर्स भाग - 3 ( अंतिम)
सकाळच्या धावपळीत सई काही बोलली नाही; पण तिने ठरवलं होतं की या बाबतीत आता निर्णय घेणं गरजेचं आहे.
रात्री अविनाश उशिरा आला.
सईने साध्या आवाजात विचारलं,
"आज खूप उशीर झाला. काही खास काम होतं का?”
"आज खूप उशीर झाला. काही खास काम होतं का?”
तो थोडा गडबडला आणि म्हणाला, "हो, प्रोजेक्टची डेडलाईन आहे. अजून काही दिवस असेच जातील."
सई मनातच हसली; पण तिने ठरवलं होतं की आता मला सत्य हवंय.
सई मनातच हसली; पण तिने ठरवलं होतं की आता मला सत्य हवंय.
दोन दिवसांनी, अविनाश अंघोळीला गेला होता. तेव्हा सईने फोन पाहिला. तिथे 'R' नावानी सेव्ह केलेल्या नंबरचे मेसेज वाचले. ते मेसेज मैत्रीपूर्ण होते; पण अत्यंत वैयक्तिक किंवा अपमानजनक नव्हते. ती ऑफिसमधील कलीग होती, जी अविनाशची क्लोज फ्रेंड वाटत होती.
सईने अविनाशला बाहेर आल्यावर शांत स्वरात विचारले, "अविनाश हे 'R' कोण आहे?"
अविनाश दचकला. मग हळूच म्हणाला, "ती माझी सहकारी आहे. ऑफिसमध्ये जास्त बोलते. काही वैयक्तिक नाही सई. खरं सांगतो."
सईने डोळ्यांत डोळे घालून विचारलं, "मग 'तू माझ्यासाठी खास आहे' हे शब्द का?"
अविनाश गप्प बसला दोन मिनिटं. मग म्हणाला, "अगं ती माझ्या फ्रॅंक नेचर आणि मदत करण्याचा उलटा अर्थ घेऊन बसलीये. घरापासून दिवसभर लांब असल्यामुळे मी तिच्याशी जास्त बोलायला लागलो. तिला या सगळ्याचा गैरसमज झाला. मी तुला काही धोका दिला नाही. माझ्यासाठी तू आणि अर्णव खूप महत्त्वाचे आहात."
सईने सगळं ऐकून घेतले आणि अविनाशला म्हणाली, "मला थोडा वेळ दे."
दोन आठवडे तिने स्वतःला वेळ दिला.
तिला जाणवलं की नातं वाचवायचं असेल तर दोघांनीही मेहनत घ्यायला हवी.
तिला जाणवलं की नातं वाचवायचं असेल तर दोघांनीही मेहनत घ्यायला हवी.
तिने अविनाशला स्पष्ट सांगितलं, "आपल्याला हे लग्न फक्त कागदावर नाही, हृदयातही टिकवायला हवं. तुला खरंच जर मी आणि अर्णव पाहिजे आहोत तर तुला तुझ्यामध्ये बदल करावे लागतील."
अविनाशने तिचा हात धरला आणि म्हणाला, "मी नक्की बदलेन. मला तुझी गरज आहे. आपण नवी सुरुवात करू."
त्या दिवसापासून लहान लहान गोष्टींपासून बदल सुरू झाले. जेवण करताना ते दोघे फोन बाजूला ठेवायचे. रविवारी घरी वेळ दिला जायचा. अर्णवला आता आई-बाबा दोघेही एकत्र वेळ देऊ लागले.
नातं पुन्हा प्रेमाने फुललं. सईच्या डोळ्यांतील चमक परत आली. अविनाशलाही जाणवलं की करिअर जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच घरही महत्त्वाचं आहे.
एकदिवशी सकाळी पार्कमध्ये चालताना सई स्वतःशीच म्हणाली,
'ही "सायलेंट डिवोर्स" अवस्था खरंतर आपल्या घरात आली होती; पण योग्य वेळी बोलून आपण आपलं नातं वाचवलं. नातं तुटण्याआधी संवाद होणं, हाच खरा उपाय आहे.'
सईने मनोमन ठरवलं, 'आता मी पण हरणार नाही आणि नात्यालाही तुटू देणार नाही.'
तिच्या मनातल्या अंधारातूनही आता तिला प्रकाश दिसू लागला होता.
समाप्त
© निकिता पाठक जोग ( संघ कामिनी )
© निकिता पाठक जोग ( संघ कामिनी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा