शब्द हे एक हत्यार आहे.....
त्याचा वापर कोण कसा करून घेतो त्या वर त्याची चाल आहे....
शब्द जिंकऊन आपल्याला हरवतात पण
माया चा हा खेळ डाव रचूनी प्यादाला जगवतात.....
आपण कोण होतो राजा राणी की गुलाम
शब्दांच्या या जगात आपली लायकी काय
खरचं आपण कोण होतो एक सामान्य च
म्हणूनच हरलो....
भाव मांडायला शब्द कमी पडले का? खरचं एवढं कठीण असतं समोरच्याला जाऊन घेणं....
शब्द मनात आठवणी साठवून ठेवतात....
तेच शब्द मनाला सुन्न दगड ही करतात......
पुस्तकातील शब्द वाचकांचे मन वेधून घेतात.....
असच एक लेख वाचत होती.....
वाचतांना एक ओळ आली आणि मी थबकली....
" Marriage is deal " खरंच लग्न हे deal aahe....
हे आगोदर कधी वाचल असतं तर काही वाटलं नसतं.....
शब्दाची ओळ समजुन नजरे समोरून गेली असती...
मग ती "ओढ, प्रेम, विश्वास, भावना हे सगळं राग, चिड, द्वेष, खोटं, परत नको ते क्षण आता" यात बदलतात कसे....
मन विटूनी जात कसं....
शब्द हे मनुष्याला मारूनच टाकतात....
स्वतःलाच विचारलेला प्रश्न... त्यात नेहमी प्रमाणे हरून गेलेली मी...
आपण वेगळे आहोत का.... की आपण वाईट आहोत....
काय चुकलं आपण " शब्दात नकार दिला हे की त्याच्या शब्दाना वैताकुन नकार दिला हे"
काय पाहिजे असतं आपल्याला की आपण समाधानी होऊ....
वर्तमानातील काही कोडी बोलून सुटतं नाहीत....
त्याला मौन पाहिजे असतं....
मग कोण मोठं शब्द की मौन
मौनाची ताकद त्यालाच जाणवते....
मौनात आपण स्वतःला ओळखतो....
भवतालच्या या एनर्जी च असणं मानतो....
जो ते जगतो.....
शब्दाच्या ताकदी पेक्षा शांततेच सम्राज मोठं पाहतो.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा