Login

सीमांतिनी भाग ४४

मोहित मेडीकल टेस्टमध्ये नपुंसक सिद्ध होईल की तो त्याच्या पैशाच्या जोरावर पुन्हा काही तरी नवीन खेळी खेळेल?


पंधरा दिवस असेच निघून गेले.रिमा पहाटे सहा वाजता येणार होती. राजसला आणि सीमंतिनीला तसा तिचा फोन आला होता. राजस ठरल्याप्रमाणे सहा वाजता स्टेशनवर पोहोचला. राजसचा सीमंतिनीने आधीच रिमाला तिच्याबरोबरचा सेल्फी पाठवला होता. रिमा बुरख्यात होतीत. राजसने तिला ओळखले नसले तरी रिमाने त्याला ओळखले होते. रिमाने त्याला हाक मारली आणि राजस तिच्याजवळ पोहोचला. रिमाने बुरखा वर करून त्याला तिचा चेहरा दाखवला आणि राजसने तिला ओळखले. तिच्याबरोबर एक गुडलूकिंग तरुण होता. कदाचित तो तिचा होणारा नवरा असीम असावा. राजस दोघांना त्याच्या घरी घेऊन गेला.


आणि कोर्टात वेळेवर दोघांना घेऊन पोहोचला. रिमा बुरखा घालूनच कोर्टात येऊन बसली आणि कोर्टाचे कामकाज सुरू झाले. राणेंनी बोलायला सुरुवात केली.

राणे,“ साहेब एडव्होकेट गवळी मॅडम आणि त्यांच्या आशिल मिसेस सीमंतिनी खोत कोर्टाचा बहुमूल्य वेळ वाया घालवत आहेत. माझे आशिल मिस्टर मोहित खोत हे निर्दोष आहेत. त्यांच्यावर लावलेला एक ही आरोप विरोधी पक्ष सिद्ध करू शकला नाही. मी कोर्टाला विनंती करतो की मोहित खोत यांना निर्दोष मुक्त करावे आणि मिसेस सीमंतिनी खोत यांना त्यांच्याकडे नांदायला जाण्याचे आदेश द्यावेत आणि त्यांना माझ्या आशिलाबरोबर नांदायचे नसल्यास त्यांची मानहानी केली म्हणून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करून माझ्या आशिलास मिसेस सीमंतिनी खोत यांनी दोन कोटी नुकसान भरपाई द्यावी.” ते म्हणाले.

गवळी मॅडम,“ राणे साहेब इतकी घाई कशाची आहे. अहो चालू द्या की खटला अजून थोडे दिवस! साहेब माझ्याकडे मिस्टर मोहित खोत यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला एक साक्षीदार आहे. त्यांना कोर्टात साक्ष देण्याची परवानगी कोर्टाने द्यावी अशी मी कोर्टाकडे विनंती करते.” त्या म्हणाल्या.

जज,“ कोर्ट तुम्हाला परवानगी देत आहे तुमचा साक्षीदार हजर करा कोर्टात.”

गवळी मॅडम,“ माझी साक्षीदार कोर्टात हजर आहे. मिस रिया शर्मा मिस्टर मोहित खोत यांची एक्स गर्लफ्रेंड!” (त्या म्हणाल्या आणि मोहित चमकला त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. रिमाने बुरखा काढला आणि ती साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन उभी राहिली.) साहेब मिस रिमा शर्मा यांना मराठी समजत नाही आणि बोलता ही येत नाही त्यामुळे कोर्टाची पुढची कार्यवाही हिंदीमधून करण्याची अनुमती द्यावी अशी मी कोर्टास विनंती करत आहे.” त्या म्हणाल्या. मोहितच्या वकिलाने एकदा मोहितकडे पाहिले आणि मोहितने त्यांना नजरेनेच नंतर बोलू म्हणून खुणावले.


जज साहेब,“अनुमती आहे.”ते म्हणाले.

गवळी मॅडम, “ धन्यवाद! मिस रिमा शर्मा आपकी और मिस्टर मोहित खोत की मुलाकात कहाँ हुई थी?” त्यांनी विचारले.

रिमा,“ मेरी और मोहित की मुलाकात अमरीका में पढाई के दैरान हुई थी। हम दोनों एक ही कॉलेज में एक ही क्लास में पढ़ते थे। ये मेरा और मोहित के वहाँ के कॉलेज के दाखिले।” तिने सांगितले आणि कागद सादर केले.

गवळी मॅडम,“ आप और मोहित सिर्फ दोस्त थे या उससे ज्यादा?” त्यांनी विचारले.

रिमा,“ मैं और मोहित गर्लफ्रैंड बॉयफ्रेंड थे। लगभग दो साल तक हम रिलेशनशिप में थे। हम शादी भी करनेवाले थे।हम दोनों के घर से भी कोई ऐतराज नही था।”तिने सांगितले.

गवळी मॅडम,“ आपका रिलेशन शादी तक पहुच गया था। घर में भी सब तैयार थे तो ऐसा क्या हुआ आप दोनों के बीच की रिलेशन टूट गया?”त्यांनी विचारले.

रिमा,“ हमारा रिलेशन शादी तक पहुच गया था। और आज कल फिजिकल रिलेशन तो आम बात है। इसी वजह से हम दोनों क्लोज आ गए लेकिन मोहित एक हद के बाद कुछ भी नही कर पाया। हम दोनों की ही वो पहली कोशिश थी इसी लिए मैंने उस बात को सीरियस नही लिया। लेकिन उसके बाद कई महीनों तक कोशिश करने के बावजूत मोहित मुझे वो बॉडी लव नही दे पाया जो हर लड़की चाहती है। इसी लिए हमने डॉक्टर की सलाह लेने का फैसला लिया। डॉक्टरने मोहित के कुछ टेस्ट किए और वो इंपोटेंट है यह डिक्लेयर किया। लेकिन मैं फिर भी उसके साथ थी। मोहितने उसका इलाज दुनिया के कई देशों में करवाया इन सब में मैं उसके साथ थी। लेकिन मोहित इलाज सुरु होने के बाद मुझे उसकी गिनीपिग की तरह इस्तेमाल करने लगा। मैं क्या महसूस करती हूँ। मुझे क्या लगता है। इसका उसे कुछ लेना देना नही था। उसे तो बस अपनी मर्दानगी से मतलब था जो कि उसके पास नही थी। मोहित के इस बर्ताव से मैं तंग आ गयी और उसे मेरे इमोशन्स और शरीर के साथ खेलने से रोका तो उसने मुझ पर हाथ उठाया। ये आदमी औरत को उसके पैर की जूती समझता है। बहुत ही सेल्फिश,सेल्फ सेंटर्ड और विकृत किस्म का इंसान है ये। मैंने उसके बाद इस से सारे रिश्ते तोड़ दिए लेकिन ये आदमी अपनी हरकतों से बाज नही आया और इसने सीमा को फांसकर शादी की। मोहित इंपोटेंट है।”रिमाच्या डोळ्यात पाणी आणि मोहितबद्दल द्वेष दोन्ही ही होते.

राणे,“ वाह भाई वाह!आप किसी भी लकड़ी को मोहित की एक्स गर्लफ्रैंड बनाकर खड़ा करेंगे और कोर्ट उसे मान लेगा क्या? कोर्ट सबूत मांगता है।”

गवळी मॅडम, “ सबूत भी है। उस टाइम के मोहित और रिमा के फोटोग्राफ़्स ये देखिए जज साहब और ये इन फोटोज के फोरेंसिक रिपोर्ट ये सब असली फोटोग्राप्स है। और एक गवाह है रिमा और मोहित के रिलेशनशिप का मिस्टर फ्रांसीस मोहित के उस वक्त के बेस्ट फ्रेंड उनको मिस रिमा फोन करेंगी आप सुन सकते है उनको।”त्या म्हणाल्या.

राणे,“ ऐसे सबूत और गवाह खरीदना कोई नई बात नही है और ये फोटो मिस्टर मोहितने मिस रिमा के साथ खिंचवाए भी होंगे लेकिन इससे ये साबित नही होता कि रिमा और मिस्टर मोहित रिलेशनशिप में थे उन्होंने ये फोटोज दोस्त के तौर पर खिंचवाए होंगी इसे आज कोर्ट में अलग ही ढंग से पेश किया जा रहा है।” ते कुत्सितपणे हसत म्हणले

गवळी मॅडम,“अच्छा! मतलब हमने झुठे गवाह और सबूत पेश किए है?”त्यांनी त्यांना रोखून पाहत विचारले

राणे,“ हो सकता है।” ते म्हणाले

गवळी मॅडम,“ ठीक है हम झुठे और आप सच्चे है। तो फिर आपके इज्जतदार क्लाएंट मेडीकल टेस्ट से क्यों डरते है। उनसे कहीए कि वो मेडीलक टेस्ट के लिए तैयार हो।” त्या म्हणाल्या.

राणे,“ हम किसी भी प्रतिष्ठित नागरिक को जबरन उनका मेडीकल टेस्ट करवाने के लिए मजबूर नही कर सकते।” ते म्हणाले

गवळी मॅडम,“ ठीक है तो मेरी क्लाएंट उनका मेडिकल टेस्ट करवा लेंगी क्योंकि शी इस अ मैरिड व्हर्जिन उमन। फिर आपके क्लाएंट बताएंगे कि उनकी पत्नी शादी के बाद भी कुंवरी क्यों है?” त्या म्हणाल्या.

राणे,“ अब मिसेस सीमंतिनी खोत शादी के बाद भी कुंबरी क्यों है? है भी या नही? येतो वो ही अच्छेसे बता सकती है। शायद उनका पहले से ही अफेयर हो और मेरे क्लायंट के साथ उन्होंने पैसे के लिए शादी की हो और अब उन्हें मोहित से पैसे लेकर आपने प्रेमी के पास जना हो।” त्यांनी सीमंतिनी वरच उलट आरोप केला आणि सीमंतिनीच्या डोळ्यात पाणी आणि राग दोन्ही होते.

गवळी मॅडम,“ आप मेरी क्लायंट पर घटिया इल्जाम लगाकर कोर्ट का ध्यान भटकाईए मत! जज साहेब मी कोर्टाला पुन्हा विनंती करते की मोहित खोतची मेडिकल टेस्ट व्हावी ती ही सरकारी दवाखान्यात पोलिनसांच्या देखरेख खाली तरच या सगळ्या केसचा निकाल योग्य पध्दतीने लागू शकतो.”त्या म्हणाल्या.

जज साहेब,“ रिमा शर्मा यांच्या बोलण्यात आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्यात कुठे तरी तथ्य आढळते. तसेच मिसेस सीमंतिनी मोहित खोत लग्न होऊन देखील कुमारी असतील तर? हा देखील विचार करायला लावणारा प्रश्न आहे म्हणून कोर्ट हा आदेश देत आहे की मोहित खोत यांनी सरकारी इस्पितळात पोलीस आणि एडव्होकेट गवळी मॅडमच्या देखरेखी खाली त्यांची मेडिकल टेस्ट करून घ्यावी तसेच मिसेस सीमंतिनी खोत यांची देखील कौमार्य चाचणी व्हावी. पुढच्या तारखेला दोन्ही रिपोर्ट दोन्ही पक्षाने हजर करावेत.” ते म्हणाले.

मोहित मेडीकल टेस्टमध्ये नपुंसक सिद्ध होईल की तो त्याच्या पैशाच्या जोरावर पुन्हा काही तरी नवीन खेळी खेळेल?
©स्वामिनी चौगुले