सीमंतिनी,“आय एम सॉरी ना! माझं खरंच चुकलं. मी माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान ओळखायला चुकले. आता मी कशी माफी मागू म्हणजे तू मला माफ करशील?” ती रडत विचारत होती. तिने त्याला तिच्याही नकळत इतकी घट्ट मिठी मारली होती की त्याचा श्वास गुदमरत होता.
राजस,“आधी मिठी तर सोड तुझी नाहीतर उद्या बातमीदाराचीच बातमी छपून येईल ‛एका तरुणाचा तरुणीच्या मिठीत गुदमरून अंत झाला’” तो तिच्या कानात कुजबुजला आणि ती भानावर आली. तिने त्याला सोडले. तो तिला सोफ्यावर बसवून किचनमध्ये गेला आणि तिच्या समोर पाण्याचा ग्लास धरला तिने पाणी पिले आणि बोलू लागली.
सीमंतिनी,“सॉरी ना राजस मी त्यादिवशी तुला तसं बोलायला नको होतं. आता काय लोटांगण घेऊ का तुझ्यासमोर?”
राजस,“झाला कांगावा करून की अजून काही बाकी आहे?” त्याने चेहऱ्याची रेषही न हलू देता विचारले.
सीमंतिनी,“मी कांगावा करते का? ठीक आहे तुला नाही माफ करायचं ना मला तर नको करू.” ती रागाने म्हणाली आणि उठून दाराकडे वळली. तर राजसने तिला मागून मिठी मारली आणि तो तिच्या कानात कुजबुजला.
राजस,“माझ्यासमोर लोटांगण घेणार होतीस ना त्याचे काय झाले?” त्याने मिश्कीलपणे विचारले.
सीमंतिनी,“सॉरी ना! आणि तुला काय वाटले मी म्हणाले म्हणून लगेच लोटांगण घेईन?” ती वळून त्याच्या मिठीत विसावत म्हणाली.
राजस,“अच्छा! मला माहित होतं तुझ्यासारखी खडूस मुलगी असं काही करणार नाही.” तो हसून म्हणाली.
सीमंतिनी,“मी खडूस का? माफ कर ना मला!” ती म्हणाली.
राजस,“मी जर तुला माफ केले नसते तर माझ्या मिठीत असतीस का?” त्याने हसून म्हणाली.
सीमंतिनी,“मी तुझ्यापासून लांब राहून कळलं की तू माझ्यासाठी काय आहेस.” ती म्हणाली.
राजस,“हो का? मी तुझ्यासाठी काय आहे?” त्याने तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहत विचारले.
सीमंतिनी,“तू माझ्यासाठी माझं आयुष्य आहेस राज!” ती म्हणाली.
राजस,“हुंम! यु आर अलसो माय लाईफ! आणि इंग्लंडला जायचं काय झाले तुझे?” त्याने विचारले.
सीमंतिनी,“मी नाही जाणार कुठे कळलं तुला?” ती लटक्या रागाने म्हणाली.
राजस,“बस तू मी कॉफी करून आणतो.” तो म्हणाला.
सीमंतिनी,“तुला येते का कॉफी करायला?” तिने हसून विचारले.
राजस,“हो मग.” तो म्हणाला आणि तो दोन मग कॉफी घेऊन आला. तिने कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाली.
सीमंतिनी,“मस्त केलीस की कॉफी! उद्या मेडिकल आहे राजस तू माझ्याबरोबर हवास मला!” ती म्हणाली.
राजस,“बरं मॅडम! पण माझं उत्तर कुठं मिळालंय मला?” तो तिला पाहत तोंड फुगवून म्हणाला.
सीमंतिनी,“हो का? तुला अजून कळलं नाही का माझं उत्तर?” ती म्हणाली.
राजस,“मला तुझ्याकडून ऐकायचे आहे.” तो म्हणाला.
सीमंतिनी,“बरं मिस्टर राजस जेधे उर्फ आर.जे. मला मिसेस सीमंतिनी राजस जेधे व्हायचे आहे.” ती लाजून म्हणाली.
राजस,“तुला लाजताही येतं का? नाहीतर सतत भांडतच असतेस.” तो मिश्कीलपणे तिचा चेहरा पाहत म्हणाला.
सीमंतिनी,“म्हणजे तुला काय म्हणायचे आहे मी भांडकूदळ आहे का?” ती तोंड फुगवून म्हणाली.
राजस,“आता मी असं कुठे म्हणालो?”
सीमंतिनी,“बरं असू दे. राजस एक इतका कटू अनुभव घेऊन झाल्यावर मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यात लगेच प्रेम येईल. मी तर माझ्या नशिबात प्रेमच नाही असं समजून बसले होते पण माझ्या वैशाखासारख्या रणरणत्या आयुष्यात तू वळीव बनून आलास राजस!” ती आवंढा गिळत म्हणाली.
राजस,“सीमा अगं तुझ्यासारखी अर्धांगीनी लाभायला भाग्य लागतं आणि तो भाग्यवान मी आहे. तू सुंदर आहे म्हणून मी हे म्हणत नाही. सुंदरताही वय वाढेल तशी लोप पावत जाईल. मी प्रेमात पडलो तुझ्या तडफदार स्वभावाच्या, अन्याया विरुद्ध लढणाऱ्या एका स्त्रीच्या, तिचा स्त्रीत्वाचा झालेल्या अपमानाविरुद्ध पेटून उठलेल्या एका विरांगणेच्या. सीमा तू आग आहेस आग तुला सांभाळणे आणि धारण करणे इतके सोप्पे नक्कीच नाही.” तो तिला पाहत कौतुकाने बोलत होता.
सीमंतिनी,“बास! इतके कौतुक पुरे माझे. हो पण माझ्या अटी आहेत काही!” ती त्याला पाहत म्हणाली.
राजस,“बापरे! अटी?” तो तिला जवळ ओढत म्हणाला.
सीमंतिनी, “हो मग? अटी ऐक
तेरी और मेरी कहानी का
हर किरदार अलग होगा।
तेरा और मेरा नसीब ही नहीं
बल्कि रिश्ता भी तो अलग होगा।
हर किरदार अलग होगा।
तेरा और मेरा नसीब ही नहीं
बल्कि रिश्ता भी तो अलग होगा।
तू रूठेगा तो
मेरा मनाने का अंदाज अलग होगा।
तुम कहोगे तुम सिर्फ मेरी हो
लेकिन मेरा भी तो तुमसे वजूद अलग होगा।
मेरा मनाने का अंदाज अलग होगा।
तुम कहोगे तुम सिर्फ मेरी हो
लेकिन मेरा भी तो तुमसे वजूद अलग होगा।
मेरा दिल तुम्हारे लिए धड़केगा जरूर
पर तुम्हारे दिल से उसका धड़कना अलग होगा।
तुम चाहोगे मैं तुम्हे दुनिया मान लूं
लेकिन मेरा भी तो दुनिया का आयाम अलग होगा।
पर तुम्हारे दिल से उसका धड़कना अलग होगा।
तुम चाहोगे मैं तुम्हे दुनिया मान लूं
लेकिन मेरा भी तो दुनिया का आयाम अलग होगा।
तुम्हारे लिए मैं अपना फर्ज निभाऊंगी जरूर
लेकिन तुमसे मेरा हर सपना अलग होगा।
तुम और मैं एक दुनिया बसाएंगे जरूर
लेकिन मेरा आसमां तुमसे अलग होगा।
© स्वामिनी चौगुले
(ती कविता म्हणाली.) तर या आहेत माझ्या अटी!” ती म्हणाली.
लेकिन तुमसे मेरा हर सपना अलग होगा।
तुम और मैं एक दुनिया बसाएंगे जरूर
लेकिन मेरा आसमां तुमसे अलग होगा।
© स्वामिनी चौगुले
(ती कविता म्हणाली.) तर या आहेत माझ्या अटी!” ती म्हणाली.
राजस,“तर या आहेत तुझ्या अटी? बाकी कविता छान आहे आणि तुझ्या अटी मान्य आहेत मला!” तो म्हणाला.
सीमंतिनी,“बरं मी निघते. मी घरी मला उशीर होईल म्हणून फोन करून सांगितले होते पण खूप उशीर झाला आहे. मी निघते.” ती म्हणाली.
राजस,“बरं आणि मेडिकलच टेन्शन नको घेऊन तू. आपणच जिंकणार आहोत. बाकी घर कसं वाटलं तुला? पहिल्यांदाच आली आहेस ना तू आपल्या घरी.” त्याने विचारले.
सीमंतिनी,“छान आहे पण बॅचलरसाठी इतका मोठा फ्लॅट जास्त मोठा नाही वाटत का तुला? तुझ्या घरी कोण कोण असतं? म्हणजे तू फक्त इतके दिवस आईबद्दलच सांगत आला आहेस मला! आणि त्यांना डिव्होर्सी मुलगी सून म्हणून चालेल का राज?” तिने विचारले.
राजस,“हा फ्लॅट मी कामाला लागलो की लोन काढून घेतला आहे गं. याचे इ.एम.आय ही संपले आहेत आता आणि इतका मोठा फ्लॅट घेतला कारण उद्या कुटुंब मोठे झाल्यावर प्रायव्हसी नको का? आणि माझ्या कुटुंबात फक्त आईच आहे. सीमा मला आईने दत्तक घेतले आहे मी लहान असताना. तिचाही सासरच्या लोकांनी छळ केला आणि तिने तिचे घर सोडले. स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि मला दत्तक घेतले. तिने मला खूप चांगले संस्कार दिले आहेत ती सध्या साताऱ्याला असते. बँकेत आहे कामाला याच वर्षी रिटायर्ड होईल ती. मग येईल माझ्याबरोबर राहायला. तिला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे म्हणजे मीच सांगितले आहे. तिला तुझं कौतुकच आहे.” तो म्हणाला.
सीमंतिनी,“माझं खूप मोठं टेन्शन गेलं. मी घरी अजून काहीच सांगितले नाही. तसं कोणी विरोध नाही करणार आपल्याला पण एकदा मोहितबरोबर ऑफिशियली डिव्होर्स झाल्यानंतर मी सांगेन घरी.” ती म्हणाली.
राजस,“बरं ठीक आहे. बाकी भेटू उद्या. चल तुला सोडतो मी.” तो म्हणाला.
सीमंतिनी,“मी कॅब बुक केली आहे येईल पंधरा मिनिटात.” ती म्हणाली.
राजस,“पण एक गोष्ट राहिलीच की!” तो म्हणाला.
सीमंतिनी,“कोणती?” तिने निरागसपणे विचारले.
राजस,“थोड्यावेळा पूर्वी माझं तोंड बंद करायला काय केलं होतंस ते कर ना अजून एकदा.” तो तिला जवळ ओढून तिच्या कानात म्हणाला.
सीमंतिनी,“तुला तर आवडलं नव्हतं ना ते? मग कशाला उगीच?” ती लाजून खाली मान घालून पण लटक्या रागाने म्हणाली.
राजस,“आवडलं नव्हतं असं नाही पण मी रागात होतो आणि काहीतरी बोलत होतो तर तू… बरं जाऊदे असंही कुठे पळून जाणार आहेस तू? येणार तर इथेच आहे ना?” तो मिश्किलपणे तिचे केस कानाच्या मागे सारत म्हणाला.
सीमंतिनी,“राजस यु आर अ सच वंडरफुल गाय! माझी निवड योग्य आहे यावेळी.” ती त्याचा हात धरून म्हणाली.
राजस,“सीमा तू मला निवडलं म्हणून तुला कधीच पश्चात्ताप नाही होणार याची जबाबदारी माझी. बरं! कॅब आली वाटतं चल तुला खाली तरी सोडतो.” तो म्हणाला.
सीमंतिनीच्या आयुष्यात पुन्हा एकदा राजसच्या प्रेमाचा अंकुर रुजला होता आणि सीमंतिनीने तो पहिल्यांदा नाकारला पण आता तो स्वीकारला होता.
©स्वामिनी चौगुले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा