" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
जलद कथालेखन (संघ कामिनी)
जलद कथालेखन (संघ कामिनी)
सिंहासन–एक रहस्यभेद!
©® भालचंद्र नरेंद्र देव
©® भालचंद्र नरेंद्र देव
भाग ३
मुंबईच्या महानंद वस्तुसंग्रहालयातून चोरट्यांनी १० कोटींचे ऐतिहासिक नवरत्न सिंहासन गायब केले होते. तपासाची सूत्रे सीबीआयच्या डीएसपी कामिनी कुर्वे यांच्या हाती होती. आतापर्यंतच्या तपासातून एक गोष्ट स्पष्ट झाली होती की ही चोरी फक्त एका विद्यार्थ्याची अक्कल नव्हती, तर वस्तुसंग्रहालयाच्या आतल्या लोकांच्या मदतीने योजलेली अचूक खेळी होती.
राघव राजे एक हुशार आर्ट स्टुडंट, जगताप सूर्यवंशी एक मुख्य सुरक्षा अधिकारी आणि सुप्रिया एक सहायक सुरक्षा कर्मचारी, हे तिघेही संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते.
पण अजूनही सिंहासन कुठे आहे, हे स्पष्ट होत नव्हते.
म्युझियमच्या जुन्या आराखड्यांचा अभ्यास करताना कामिनी यांना एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली.
'म्युझियमच्या खाली ब्रिटिश काळात बांधलेला एक गुप्त जलवाहिनी बोगदा होता, जो जवळपास २ किलोमीटर लांब आणि मुंबईच्या एका गोडाऊनपर्यंत पोहोचवणारा होता.'
“तो बोगदा १९४०मध्ये बंद करण्यात आला होता.” असे एका इतिहास संशोधकाने सांगितले.
“पण स्थानिक गुन्हेगारी गट कधी कधी त्याचा वापर करत होते, असे देखील ऐकिवात आहे.” असेही त्याचे म्हणणे होते.
सीबीआयने बोगद्याची तपासणी सुरू केली.
बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ एक नवा लोखंडी पट्टा बसवलेला होता, अगदी अलीकडचा. आत जाऊन पाहिले, तर काही भागांत धूळ अजिबात दिसत नव्हती, म्हणजेच तिथे नुकतीच हालचाल झाली असल्याचे कळत होते.
एक ठिकाणी खालच्या भिंतीवर पाय लागल्याचे चिन्ह होते आणि त्यावर लाल रंगाचे ठिपके सापडत होते, अगदी तेच जे वस्तुसंग्रहालयात जमिनीवर सापडले होते.
कामिनी म्हणाली, “ह्याचा अर्थ त्यांनी चोरी केल्यानंतर सिंहासन या बोगद्यामार्गे बाहेर नेले आहे.”
बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला पोहचताच, सीबीआयला एक जुने पण अलीकडेच साफ केलेले गोडाऊन सापडले. ते गोडाऊन मालकी हक्कात एका बनावट कंपनीच्या नावावर होते आणि त्याच कंपनीचा उल्लेख सुप्रियाच्या बँक ट्रांझॅक्शनमध्येही होता 'Nexus Trade Pvt. Ltd.'
गोडाऊनच्या आतली दृश्ये थक्क करणारी होती.
एका कोपऱ्यात सिंहासनाचे तुकडे दिसत होते. तो वेगळा करून निरनिराळ्या भागांमध्ये ठेवलेला होता. प्रत्येक तुकड्याला कापडाने गुंडाळलेले होते आणि त्यावर कोड नंबर लावलेले होते. त्याच्या जवळ एक कॅनव्हास पेटी होती, तेलरंगात त्या सिंहासनाचे भाग रंगवले गेले होते.
“हे त्याचे छुपे ट्रान्सपोर्टेशन आहे. हे वेगवेगळे भाग परदेशी आर्ट एक्सपोच्या नावाखाली पाठवले जाणार असतील आणि ते कुणाला देखील कळले नसते की रंगवलेल्या भागांमध्ये खरे सिंहासन आहे.” कामिनी म्हणाली.
तेवढ्यात एक लपलेली फाईल सापडली. त्यात काही पोस्टकार्ड्स होती. एक पोस्टकार्ड राघव राजेच्या नावावर होते; पण त्यावर प्रेषकाचे नाव नव्हते. त्यावर फक्त एक कोड लिहिलेला होता,
'R.R. – 5 visits, 2 steps, 1 mirror cracked.'
खाली लिहिले होते,
'The king always hides behind the art.'
कामिनी विचारात पडली. “हा कोड म्हणजेच संकेत आहे आणि 'R.R.' म्हणजे राघव राजे. म्हणजे त्याने हा सगळा प्लॅन आधीपासून आखलेला होता.”
तेवढ्यात सीनियर फॉरेन्सिक अधिकारी साठे म्हणाले, “मॅडम, या प्रत्येक भागावर लावलेल्या कापडांवर एक विशिष्ट प्रकारचा वॉटरमार्क आहे, तो फक्त ‘ब्लॅक आऊल्स’ हा ग्रुप वापरतो.”
गोडाऊनच्या बाहेर पडताना भिंतीवर एक छोटेसे चित्र दिसत होते. एका घुबडाच्या डोळ्यांत सिंहासन प्रतिबिंबित झालेले आहे हे लगेच कळत होते.
कामिनी हळूच बोलली,
“हा गुन्हा फक्त चोरीचा नाही… हे एक कलात्मक युद्ध आहे. कायद्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून केलेला खेळ!”
“हा गुन्हा फक्त चोरीचा नाही… हे एक कलात्मक युद्ध आहे. कायद्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून केलेला खेळ!”
आता कामिनीला खात्री वाटत होती, ही सगळी योजना कोणी एकटा माणूस करू शकत नाही. ढगांच्या आड खरा मास्टरमाइंड अजूनही लपलेला होता…
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव © ® ( संघ कामिनी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा