" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
जलद कथालेखन ( संघ कामिनी)
जलद कथालेखन ( संघ कामिनी)
सिंहासन–एक रहस्यभेद!
©® भालचंद्र नरेंद्र देव
©® भालचंद्र नरेंद्र देव
भाग ५ अंतिम
चोरी झालेले ऐतिहासिक "नवरत्न सिंहासन" अखेर परत सापडले होते. राघव राजे, त्याची मामी मयुरी पाटील, सुप्रिया आणि ‘ब्लॅक आऊल्स’चा सर्वेश हे सगळे जाळ्यात अडकले होते. तपासाची प्रत्येक पायरी खोल उत्तरांनी भरलेली होती; पण आता सर्व रहस्यांचा शेवटचा अध्याय लिहायची वेळ आली होती.
राघवला अटक झाल्यानंतर त्याची चौकशी सीबीआय मुख्यालयात सुरू झाली.
डीएसपी कामिनी कुर्वेसमोर बसलेला राघव शांतपणे म्हणाला,
“माझे उद्दिष्ट कधीच पैशाचे नव्हते. मला माझ्या मामीच्या वेदनांना वाचा फोडायची होती. प्रामाणिक माणसाला तुम्ही छळल्याची किंमत तुम्हाला दाखवून द्यायची होती.”
“माझे उद्दिष्ट कधीच पैशाचे नव्हते. मला माझ्या मामीच्या वेदनांना वाचा फोडायची होती. प्रामाणिक माणसाला तुम्ही छळल्याची किंमत तुम्हाला दाखवून द्यायची होती.”
कामिनी म्हणाली, “पण तू एका राष्ट्रीय संपत्तीची चोरी केलीस. तुझ्या विचारांना प्रतिशोधाचे मूल्य असेल असे तुला वाटत असेल; पण तुझा मार्ग चुकला राघव.”
राघव उत्तरला, “हो, मला आता ते कळतंय; पण तरीही... तुम्ही ते सिंहासन शोधून काढलेत, नाहीतर माझे उद्दिष्ट पूर्ण झाले असते.”
मामीच्या सूचनेवरून राघवने हे सगळे आखलेले होते. मयुरीचा राग, व्यवस्थेवरचा रोष आणि राघवच्या बंडखोर विचारांनी मिळून ही योजना साकारली होती.
‘ब्लॅक आऊल्स’ ग्रुपचा सर्वेश हा फक्त एक कलाकार होता, जो राघवच्या प्रतिशोधाला व्यासपीठ देत होता. सुप्रिया तर आर्थिक अडचणीमुळे त्याचे केवळ एक प्यादे बनली होती.
प्रकरण कोर्टात गेले. सरकारी वकिलांनी देशद्रोह, ऐतिहासिक वारसा नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट यांवरून केस दाखल केली. प्रत्येकाने आपले गुन्हे मान्य केले होते. "Nexus Trade Pvt. Ltd." ही कंपनी मयुरीनेच स्थापन केली होती. कोर्टाने सर्व पुरावे पाहून मयुरी आणि राघवला १० वर्षांची शिक्षा दिली कारण खरे गुन्हेगार तेच होते. तर सुप्रिया आणि सर्वेशला ३ वर्षांची शिक्षा सुनावली. कारण त्यांनी गुन्हेगारांना माहीत असून देखील मदत केली होती. जगताप सूर्यवंशी यांचा यात काहीही सहभाग नाही आणि पोलीस त्याच्याबद्दल कुठले पुरावे सादर करू न शकल्याने त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली होती.
सिंहासनाची पुनर्बांधणी करण्यात आली. वस्तुसंग्रहालयात एका नवीन सेक्शनमध्ये त्याला ठेवले गेले, तिथे सिंहासनाबरोबर त्याच्या चोरीचा इतिहासही लिहून ठेवला होता आणि सर्वात महत्त्वाचे, जे संग्रहालयाच्या खाली भुयार होते ते पूर्णपणे बुजवून टाकले गेले.
डीएसपी कामिनी आपल्या केबिनमधून बाहेर पडताना थांबली. खिडकीबाहेर पाहिले... वस्तुसंग्रहालय पुन्हा पूर्वीसारखे होते. त्यांनी जाणले होते की हे फक्त चोरीचे प्रकरण नव्हते. हे समाजात दडलेल्या रोषाचे, व्यवस्थेतील तुटकपणाचे आणि व्यक्त होऊ न शकलेल्या भावनांचे प्रतिक होते.
समाप्त
भालचंद्र नरेंद्र देव © ® ( संघ कामिनी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा