Login

स्क्रीनची जाळ - स्क्रीनमागील लोक आणी त्यांचा खेळ

गेमच्या जास्त आहारी जाऊ नका
स्क्रीनची जाळ

(स्क्रीनमागील लोक आणि त्यांचा खेळ)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

मित्रांचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये राधा, श्याम, सुमित आणि टीना होते. ते नुकतेच कॉलेजला गेले होते. ते चांगले मित्र होते. सगळे जवळ राहत होते. त्यांच्या बाबांनी त्यांना नवीन मोबाईल घेऊन दिला होता. ते अभ्यासातही हुशार होते.

ते कॉलेजमध्ये बसले होते. त्यांच्या वर्गातला योगेश त्यांच्या जवळ आला.
“तुम्हाला माहिती आहे का? नवीन गेम आला आहे. जिंकल्यावर पैसे मिळतात, मी ऐकलं आहे” योगेश म्हणाला. त्याला त्याच्या मित्राने बोलावले, म्हणून तो तिथून निघून गेला.

“आपण डाउनलोड करून बघायचा का? बघू तरी किती पैसे मिळतात. आपल्यालाच कामाला येतील” सुमित म्हणाला.

“मी डाउनलोड करून बघतो. ” श्याम म्हणाला. मोबाईल घेऊन लगेच त्याने गेम डाउनलोड केला आणि खेळायलाही लागला. त्याला मजा येत होती. तो जिंकत होता. त्याचे लक्ष मित्रांकडेही नव्हते. बाकीचे तिघे त्याच्याकडे बघत होते.

“श्याम, गेम चांगला आहे का? आम्ही पण डाउनलोड करायचा का?” सुमित म्हणाला.

“मला एक हजार मिळाले. गेम छान आहे. तुम्ही पण डाउनलोड करा” श्याम म्हणाला.त्यांनीही गेम डाउनलोड केला.

सगळे एकमेकांशी बोलत नव्हते, फक्त गेम खेळत होते. पैसे मिळत होते. त्यांना मजा येत होती. दहा लेव्हलपर्यंत त्यांना पैसे मिळाले, नंतर काही मिळाले नाही. त्यांना वाटले, मिळतील म्हणून ते खेळत राहिले. त्यांचे भेटणे कमी झाले. कॉलेज झाल्यावर ते लगेच घरी येऊन गेम खेळायला बसत होते.

एकेदिवशी सगळ्यांना एक गेम आला – व्हिडीओ कॉल करणार. त्यांना खोटं वाटत होतं. त्यांनी जास्त विचार केला नाही. श्यामला कॉलेजमध्ये असतानाच कॉल आला.
“सुमित, हा बघ… आपण गेम खेळतो, त्यांच्याकडून कॉल आला आहे” श्याम आनंदात म्हणाला.

“आपण आपल्या जागेवर जाऊ, तिथे तू बोल. आम्हालाही समजेल” सुमित म्हणाला. त्यांनी टीनाला आणि राधालाही आवाज दिला. त्या दोघीही तिथे गेल्या.

श्यामने कॉल उचलला.
“हॅलो श्याम.”
“हॅलो” श्याम म्हणाला.

“तुमच्या पूर्ण लेव्हल झाल्या आहेत. आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही आमच्याकडे येणार का? आम्ही पत्ता पाठवतो” ते म्हणाले.

“हो, मी नक्की येईल. खूप छान गेम बनवला आहे” श्याम म्हणाला.थोडं बोलून कॉल कट झाला.

“श्याम, तू नको जाऊ. मला हे काही बरोबर वाटत नाही. असा कसला कॉल येऊ शकतो? ते तुला का बोलवत आहेत? योगेशला तर नाही बोलवलं. त्याने आपल्याला असं काही सांगितलंही नाही. ” राधा म्हणाली.

“तुला कॉल आला नाही, म्हणून मला बोलते आहेस का? मी जाणार आहे. ” श्याम म्हणाला.

“राधा, मला कॉल आला तर मीही जाणार आहे,” सुमित म्हणाला. त्यालाही कॉल आला. त्याने उचलला आणि तोही जायला तयार झाला. राधाला हे काही आवडलं नाही. तिने तो गेम डिलीट केला.

टीनालाही कॉल आला. तीही श्याम आणि सुमितसोबत जाणार होती. राधाने तिला समजवले, पण तिने काही ऐकले नाही. ते घरी निघून गेले.

दोन दिवसांनी ते जाणार होते. आता राधा त्यांना समजवत होती, तरी त्यांनी ऐकले नाही. तिघांनी घरी खोटं सांगितलं आणि तिकडे गेले.

तीन दिवस झाले. अजूनही श्याम, सुमित आणि टीना घरी आले नव्हते. त्यांना कॉल केला तर मोबाईल बंद होता. राधा खूप वेळा कॉल करत होती, पण मोबाईल लागत नव्हता.

टीनाचे आई-बाबा राधाच्या घरी आले. त्यांना राधा घरात दिसली.
“तू गेली नाहीस का? तुमच्या कॉलेजचा काही प्रोजेक्ट होता ना?” टीनाची आई म्हणाली.

राधाला कायः बोलावे हे समजत नव्हते. तीही घाबरलेली होती.

“राधा, तू आम्हाला असं काही सांगितलंच नाही. तुझा प्रोजेक्ट नव्हता का? आम्ही तुला जाऊ दिलं असतं” राधाचे बाबा म्हणाले.

आता राधा रडायला लागली. राधाची आई तिच्या जवळ आली.
“राधा, काय झालं आहे? आम्हाला सांग” आई प्रेमाने म्हणाली.

राधाने सगळं सांगितलं. टीनाचे आई-बाबा आता घाबरले होते.
“अजून तिच्यासोबत कोण आहे?” टीनाचे बाबा म्हणाले.
“श्याम आणि सुमितही आहेत. त्यांना मी समजावलं, पण त्यांनी ऐकलं नाही” राधा म्हणाली.

“टीना कशी असेल? तिच्यासोबत कायं केलं असेल?” टीनाची आई रडत म्हणाली.

“ताई, टेन्शन घेऊ नका. माझा मित्र पोलीस आहे. हा गुन्ह्याचा प्रकार आहे. मी त्याला बोलावतो” राधाचे बाबा म्हणाले. त्यांनी लगेच त्याला कॉल करून सगळं सांगितलं. तो त्यांच्या घरी यायला निघाला.

“राधा, श्याम आणि सुमितच्या आई-बाबांचे नंबर आहेत का? त्यांनाही बोलावूया” राधाचे बाबा म्हणाले.
“माझ्याकडे त्यांच्या दोघींच्या आईचे नंबर आहेत,” राधाची आई म्हणाली.

त्यांनी कॉल करून त्यांनाही बोलावले. त्या लगेच आल्या. त्यांनाही काहीच समजत नव्हतं. आपली मुलं कुठे गेली आहेत? तेही राधाच्या घरी आले. राधा तिथे दिसली. त्यांनी विचारलं “तू नाही गेलीस का?”राधाने त्यांनाही सगळं सांगितलं.

विश्वास आला. राधाचे बाबा त्याच्याशी बोलले आणि सगळं सांगितलं.त्याने राधाला बोलावलं.
“राधा, गेम कोणता होता? तू पण खेळली होतीस का?” विश्वास म्हणाला.
“मी डाउनलोड केला होता. खेळलेही होते. आधी खूप गेम खेळले होते, पण असा कॉल मला आला नाही. मला तो गेम आवडला नाही, म्हणून मी लगेच डिलीट केला. मी त्यांना पण सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही” राधा म्हणाली.

“तो गेम परत डाउनलोड कर. तू पण खेळ” विश्वास म्हणाला.

“विश्वास, तू कायं बोलतो आहेस? मग राधाही जाईल त्यांच्या जाळ्यात. मला नाही माझ्या मुलीला यात टाकायचं” राधाचे बाबा म्हणाले.

“राधाला मी काही होऊ देणार नाही. राधा मला पण मुलीसारखी आहे” विश्वास म्हणाला.
राधाचे बाबा काही बोलले नाहीत.

“राधा, मोबाईल आण. गेम डाउनलोड कर. किती लेव्हल झाल्यावर कॉल येतो?” विश्वास म्हणाला.
“सात-आठ लेव्हल झाल्या आहेत. दहा लेव्हल पूर्ण झाल्यावर कॉल येतो. ते लगेच पत्ता देतात” राधा म्हणाली.
“दोन-तीन लेव्हल राहिल्या आहेत. त्या पूर्ण करून टाक” विश्वास म्हणाला.

राधाने लेव्हल पूर्ण केल्या. तिलाही कॉल आला. तिने विश्वासकडे पाहिलं. त्याने तिला कॉल उचलायला सांगितलं. राधा बोलली आणि पत्ता मागितला.
“मी येते” ती म्हणाली आणि कॉल ठेवून दिला.

“राधा, हे घड्याळ जवळ ठेव. तू कुठे आहेस ते आम्हाला कळेल” विश्वास म्हणाला.

“राधा, घाबरू नकोस. आम्ही तुझ्यासोबत आहोत. आपण सगळे जाऊ” राधाची आई म्हणाली.

राधाला त्यांनी पत्ता पाठवला. ती जायला निघाली. तिच्यासोबत सगळे गेले. मोठी बिल्डिंग होती. तिथे राधाला जायचं होतं. राधा घाबरली होती.
विश्वास तिच्या जवळ आला.
“राधा, घाबरू नकोस. कितीतरी मुलं-मुली फसले आहेत. त्यांना बाहेर काढायचं आहे. नाहीतर ते लोक त्यांचं काहीही करतील” तो म्हणाला.

राधाने आई-बाबांकडे पाहिलं आणि आत जायला निघाली. विश्वासने अजून पोलीस बोलावले.

राधा आत गेली. तिथे खूप मुलं-मुली होते. ते घाबरलेले होते. त्यांना कुठेतरी पाठवणार होते. राधाजवळ जो माणूस बोलला तो पुढे आला. तो तिला घाणेरड्या नजरेने बघत होता. राधाने घड्याळावरचं बटन दाबलं. तिला टीना, श्याम, सुमित दिसले. ती लगेच त्यांच्या जवळ गेली.

“राधा, तू का आलीस? हे लोक चांगले नाहीत. मुलींना विकतात आणि पैसे कमवतात” टीना म्हणाली.

“घाबरू नकोस. तुम्हाला वाचवायला आले आहे. माझ्यासोबत पोलीसही आहेत. थोड्याच वेळात येतील,” राधा म्हणाली.

थोड्याच वेळात पोलीस आले. त्यांनी सगळ्यांना पकडलं. तिथे नशेच्या वस्तू होत्या, अजून बरंच होतं. सगळं जप्त करण्यात आलं. मुलांना सोडून दिलं. त्या माणसांकडून गेमचं अ‍ॅप डिलीट करून घेतला.

“राधा, तू म्हणत होतीस, तुझं आम्ही ऐकलं नाही. तुझं ऐकलं असतं तर यात अडकलो नसतो,” श्याम म्हणाला.
“आता समजलात ना?” राधा म्हणाली.

ते घरी निघून गेले.