Login

अमर्यादित आकाश

This is a short story for women’s day 2025. Sometimes, all one needs to do in order to break free, is take the first step. It may seem scary , but then is it easy to live a caged life?The Sky Has No Limit is to all the brave girls and women who have taken the first step, towards their dreams to make it reality.
अमर्यादित आकाश

शालू जन्माला आली. तिच्या वडिलांचे अश्रू वाहू लागले. त्यांना पुन्हा मुलगी नको होती.तिच्या आईने दुःखाने इतर दोन मुलींकडे पाहिले आणि तिला त्या दोघींकडे सुपूर्द केले . प्रसूतीनंतर तीला आरामासाठी जास्त वेळ मिळाला नाही आणि तिला त्वरित कामावर परताव लागलं.

शालूचे आईवडील पक्षी अभयारण्यात काम करत होते. तेथे पक्ष्यांची साफसफाई, त्यांना खाऊ देणं, स्वयंपाक करणं, आजारी किंवा जखमी पक्ष्यांची काळजी घेणं – हे सर्व खूप काम होतं, पण कुटुंबाच्या वाढत्या गरजांसाठी पैसा पुरेसा नव्हता.

शालूच्या वडिलांना एक विचित्र भावना होती – की, त्यांच्या आयुष्यात एक मुलगा आलाच की सर्व काही सुधारेल. कुटुंबाने शंका न करता दररोज झोपण्यापूर्वी ही प्रार्थना पुन्हा सुरु केली:

"आमच्या घरात मुलगा जल्माला येऊदे."

शालूच्या बहिणींनी घरातील काम सांभाळलं आणि तिची काळजी घेतली. लवकरच, शालूनेही घरातील जबाबदाऱ्या उचलल्या. तिला अभयारण्यात मदत करणं खूप आवडायचं. अनेकदा ती पक्ष्यांच्या सोबत आनंदात दिसायची.

एका दिवशी, जेव्हा ती गप्प मारणाऱ्या पक्ष्यांना पाहत होती, तेव्हा ती आईकडे वळून म्हणाली,

"आई, मला या पक्ष्यांच्या कथा फार आवडतात. काही नवीन फळाची चव घेतल्याची गोष्ट सांगतात, तर काही नवीन अन्न मिळवण्याच्या ठिकाणांची चर्चा करतात. पण मला सर्वात जास्त त्या कथा आवडतात , ज्या दूरच्या भूमींबद्दल बोलतात. तुला माहित आहे का, काही पक्ष्यांनी येथे येण्यासाठी हजारो मैलांची प्रवास केला आहे?"

शालूची आईने मान डोलवली आणि काही बोलणार, तोपर्यंत शालूचे वडील कठोरपणे मध्येच म्हणाले,"हे काय वेड्यासारखे बोलतेस तू? पक्षी बोलू शकत नाहीत. तुझ्या डोक्यात या निरर्थक गोष्टींना वाव देऊ नकोस."

शालूचे डोळे पाणावले , तेव्हा तीने आईकडे दुःखाने पाहिले आणि म्हणाली,"मी शपथ घेते, आई, ते खरंच बोलतात. मला त्यांची भाषा समजते."

काही दिवसांनी अखेरीस, त्यांच्या आयुष्यात आनंद आलाय असंच त्यांना वाटायचं! त्यांना एक मुलगा झाला. शालूने आपल्या वडिलांना पहिल्यांदाच हसताना पाहिलं. आतून तिला ईर्ष्येची जाणीव झाली. ह्या बाळात इतकं खास काय आहे की ज्यामुळे तिचे वडील इतके आनंदी झाले?

कधी कधी, शालूला आपल्या भावावर राग येत असे. गोष्टी स्पष्टपणे अन्यायकारक होत्या. कधी कधी तीला त्याला दुखावण्याची इच्छा मनात यायची, पण ती हे कशी करू शकते? प्रत्येक वेळी तो आपल्या छोट्या बोटांनी तिचा हात पकडायचा, तिचं हृदय भरून यायच. त्याने प्रेम, आनंद, उत्साह तिच्या जीवनात आणला होता. त्यावर ती कधीच राग करू शकत नाही.

ज्यावेळी तिच्या लहान भावाला शाळेत जाण्याची वेळ आली . शालू खूपच रागात होती, कारण तिला आणि तिच्या बहिणींना कधीच ही संधी दिली नव्हती. भावाचे शाळेचे दप्तर आणि पुस्तके पाहून त्यांना आश्चर्य वाटले. शालूने त्या पुस्तकांच्या पानांना स्पर्श केला आणि त्यांचा सुगंध अनुभवला. त्या पानांवर काय लिहिले आहे हे जाणून घेण्याची ती अतिशय जिज्ञासू होती. म्हणून, तिने तिच्या भावाला सांगीतले – तो शाळेत जाईल, वाचायला आणि लिहायला शिकेल, आणि नंतर घरी येऊन तिला देखील शिकवेल. त्याने मान्य केले.

दरम्यान, तिच्या बहिणींचं लग्न झालं. त्यांचे लग्न कुटुंबाच्या बचतीत मोठी वाटा घेऊन गेल. लवकरच दररोजच्या जेवणासाठीसुध्दा पुरेसे पैसे उरले नाहीत. प्रत्येकाचं जेवण कमी केलं गेलं, फक्त तिच्या भावाचं जेवण जपलं गेलं – त्याला अजूनही दोन चपाती मिळत होत्या, तर इतरांना फक्त कांदा आणि लोणचं मिळत होतं. पण तो नेहमी तिच्यासाठी एक चपाती लपवून ठेवायचा, जी नंतर रात्री ते एकत्र खायचे.
लवकरच, शालूच्या आईला अधिक काम करावं लागलं. ती अभयारण्यातल्या कामाबरोबरच तीन घरांमध्ये गृहसेविका म्हणूनही काम करू लागली. कामाचा जोर तिच्या आरोग्यावर होऊ लागला आणि ती खूपच आजारी पडली. कुटुंब आता अन्न आणि पैशांच्या शोधात होते. शालूला आईची जागा भरायला सांगितलं गेलं.

"मी अभयारण्यात काम करीन, पण कोणत्याही घरात काम करणार नाही." असं शालू म्हणाली.

पण हा निर्णय तिचा नव्हता.

काही दिवसांनी जेव्हा तिची आई बरे झाली, तेव्हा शालूने विचार केला की ती तीन घरांमधील काम पुन्हा सुरू करेल. पण त्या घरांमधील लोकांना ती नको होती. त्यांना तरुण आणि तल्लख सहाय्यक अधिक आवडत होता. त्यांनी शालूला पुढे काम करायला सांगितलं.

एका रात्री, जेव्हा तिची आई भांडी धूत होती, शालू तिच्या जवळ गेली. जास्त आवाज न करता हळूच कुजबुजून म्हणाली, "पक्ष्यांनी मला त्यांच्यासोबत अभयारण्य व्यतिरिक्त खूप नवल, सुंदर अनुभव घेण्यासाठी, जगण्यासाठी या आकाशात उंच भरारी भरण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. मला त्यांच्याबरोबर या आकाशात उंच उडण्यासाठी विचारत आहेत . ते प्रत्येक वर्षी विचारतात, पण मला जाण्याची खूप भीती वाटत होती. ते म्हणतात,

"ढग त्यांना वाट दाखवतात,
चंद्र त्यांच्यासाठी गातो ,
जेव्हा त्यांचे पंख थकतात,
तेव्हा हवा त्यांना उचलून नेते.
जेव्हा सर्वकाही अंधारमय वाटतं
तेव्हा सुर्यं त्यांना प्रकाश दाखवते."

शालूची आई दुःखाने तिच्या मुलीला पाहू लागली. ती नेहमीच फार बोलायचं नाही, पण त्या रात्री तिने म्हणाली "मला माहित आहे."

शालू सुखावली. त्या रात्री तिने तिच्या भावाला घट्ट मिठी मारली.

सूर्यादयाच्या अगोदरच अंधाराच्या कुशीत शालूची स्वप्ने प्रकाशाच्या दिशेची वाट पाहत होते . तिच्या नाजूक पावलांनी ती तिच्या झोपी आईजवळ केली .तिने हळूच खूप प्रेमाने आईच्या गालाला स्पर्श केला . आई जागी होती पण शालूला मिठीत घेऊन किती प्रेम आहे ? हे सांगण्याची इच्छा उराशी ठेवून, कामाने थकून गेलेले डोळे घट्ट बंद ठेवले . शालूच्या पावलांचा मृदु आवाज अंधाराच्या शांततेत हळूहळू नाहीसा होताना आईने तो बंद डोळ्यानी अनुभवला.

अखेर, पहाटेच्या ओसऱ्या किरणांनी आईचे निद्रा मोडली. बाहेर पडताच, त्या सूर्यमय किरणांनी तिच्या डोळ्यांमध्ये उजेड भरला आणि तिने वर पाहून आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा पाहिला,ज्यांच्या पंखांत अनंत स्वातंत्र्य आणि आनंद होता . या अद्भुत दृश्याने आईच्या ओठांवर एक गोड हास्य उमटविले आणि ती म्हणाली,

"उड, माझ्या लाडक्या, उड मुक्तपणे – कारण आकाशाची सीमा नाही आणि तुझ्या स्वप्नांची उंची अनंत आहे."