Login

चतुर म्हणावे का तुला?

प्रेम
चतुरच म्हणावे का तुला ?
प्रेमाच्या जाळ्यात फसवले
एकटेपण्याचा आजारातून
तू मला सहवासाने उठवले

कोणाची संगत नको वाटे
जवळ असण्याचा तुझा हट्ट
म्हणून नेहमीच पकडतेस
माझा हात खूपच घट्ट

देवाला केलेल्या प्रार्थनेचे
प्राप्त झालेले तू फळ
पाहत राहावेसे वाटते
तुझे हास्य निर्मळ निखळ

स्वार्थी जगात तुझ्यावरच
विश्वास मी ठेवतो पुन्हा
विश्वासघात नको करूस
नाहीतर प्रेम वाटेल गुन्हा