Login

स्मशानातील पाठलाग भाग २

Smashanatil Pathlag
चॅम्पियन ट्रॉफी 2025 जलदलेखन

स्मशानातील पाठलाग - भाग २

आता मात्र राव्हल्याच्या अंगातील धैर्य गळून पडले. 'आपलं काही खरं नाही,' या विचाराने तो मेल्यागत झाला.राव्हल्या उठला आणि जिथे वाट दिसेल तिकडे बावरा होऊन धावू लागला, पण मध्येच एका खड्यात पाय अडकून तो पडला.

त्या भुताने मोठे रूप घेतले. क्षणार्धात ती वडाच्या झाडाएवढी झाली. तिचे मोठे केस कमरेच्या खाली गेले होते. तिच्या अंगातील पांढरी साडी रात्रीच्या अंधारात भीतीदायक वाटत होती. डोळ्यात लालसर अग्नी जळत होता. पांढरे शुभ्र दात होते, पण मधला दात पडल्याने ती अधिक विद्रूप दिसत होती. ती हवेत होती, दोन्ही हात पसरून अगदी वटवाघळासारखी! राव्हल्याने हे प्रथमच पाहिले होते. त्याच्या अंगातील त्राण हरवून गेले होते. अंग घामाने डबडबले होते. तोंडातून शब्द तर दूरच, पण श्वास घेणेही त्याला गुन्हा वाटू लागले होते. राव्हल्या मोठेमोठे श्वास घेत होता. त्याचे विस्फारलेले डोळे भयाचे उत्तम उदाहरण होते. खाली पडलेला राव्हल्या पायाने माती ढकलत मागे सरकत होता. जशी तिने त्याच्यावर झेप घेतली, तसा राव्हल्या उठला आणि जमेल तसे पळत सुटला. जीवाच्या आकांताने डोळे मिटून तो धावत होता.
काही क्षणात त्याच्या लक्षात आले की, 'आपण तर हवेत आहोत.' त्याची मानगुटी त्या भुताच्या हातात होती.
तो हवेच्या मार्गाने तिथेच फिरत होता. राव्हल्या मोठमोठ्याने ओरडत होता. ते भूत त्याला गरगर फिरवत होते आणि तिने त्याला फेकून दिले. तीस फूट उंचीवरून राव्हल्या गवताच्या पात्यांवर जाऊन पडला. पाठीला जबर मार बसला होता, तो अर्धमेला झाला होता. तो तिथेच निपचित पडला. काही वेळाने त्याच्या लक्षात आले की, तो त्याच स्मशानासमोरच्या जागेवर होता. शरीरातील शक्तीपेक्षा डोक्यातील भीती अधिक भयानक होती. समोर कोणीच नव्हते.

राव्हल्याच्या अंगात आता जणू घोड्याचे बळ आले. त्याने धावायला सुरुवात केली.

'आता धावलो नाही तर याच स्मशानात आपला शेवट होईल,' असे त्याला वाटत होते.
तेव्हा राव्हल्या स्मशानाचा रस्ता संपवून पाटाच्या दिशेने धावत होता. दमछाक त्याला आता कमी वाटत होती. पायाला लागणाऱ्या दगडांची त्याला सवयच झाली होती.

आणि अचानक, विमानासारखी ती वटवाघूळी भूतनी त्याच्या मानगुटीवर बसली.

"मला पण घेऊन चल ना रे तुझ्या घरी?"

क्रमशः
©डॉ.सुशांत भालेराव

झपाटलेल्या राव्हल्याची यातून सुटका होईल का?
0

🎭 Series Post

View all