चॅम्पियन ट्रॉफी 2025 जलदलेखन
स्मशानातील पाठलाग - भाग ३ (अंतिम भाग)
राव्हल्या खूप घाबरला, गोंधळला होता. कुठे पळावे, काहीच सुचत नव्हते. काही कळायच्या आत तो दगडाला ठेच लागून जमिनीवर पडला. थोड्या वेळाने त्याला पुन्हा जाग आली, तर तो पुन्हा स्मशानात होता. त्या भुताने त्याला पुरते झपाटून सोडले होते. राव्हल्या एकटाच निपचित पडला होता. झाडावरची पाने त्याला भेसूर नजरेने पाहून हसत आहेत की, काय असे त्याला वाटले. दूरवरून कुत्र्यांचे आवाज कानात गर्दी करत होते.
तो मेल्यागत तसाच पडून होता. श्वासांच्या गर्दीने त्याचे पोट वर-खाली होत होते. समोर ते भूत झाडाच्या फांदीवर बसून मोठमोठ्याने हसत होते. तिचे उलटे पाय फांदीवर खाली लटकत होते. फांदी नृत्यासारखी डोलत होती. या भीतीच्या काळोखात राव्हल्या हनुमान चालीसा विसरून गेला होता. त्याची सहनशक्ती मर्यादेच्या पलीकडे गेली होती.

तिने झपकन त्याच्यावर झेप घेतली.
"आयोssss"
राव्हल्याने पोटात पाय घेऊन तोंड झाकून तिच्यापासून लपण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता. ती त्याच्या छातीवर बसली होती. मोठमोठ्याने हसत होती. त्याच्या गालाला आपले नख लावून स्पर्श करत होती. राव्हल्याच्या छातीच्या धडधडीने ते भूत वर-खाली होत होते.
राव्हल्याने अंगातील सारे बळ एकवटले आणि जोरात तिला धक्का दिला. जणू पायांना घोड्याचे वेगयंत्र लावून तो धावत सुटला. स्मशान ओलांडून तो पाटाच्या दिशेला लागला. जीवाच्या आकांताने तो पळत होता. "भीमरूपी..." जशी आठवेल तशी तो मुखातून बाहेर आणत स्वतःला सुरक्षित करत होता. रक्ताळलेल्या पायांनी पळण्याची त्याला सवयच झाली की काय, असे वाटत होते.
राव्हल्या बांधाबांधाने धावत सुटला. आता गावातल्या घरांचे दिवे दिसू लागले होते. राव्हल्याच्या जिवात जीव आला, पण त्याचे मन अजूनही मागे पाहायला तयार नव्हते. घामाने ओला झालेला राव्हल्या मातीने भरला होता. तोंडातली माती तो पळता पळता मागे टाकत होता.
आता राव्हल्या गावातल्या गल्लीत शिरला.

"आपण कोणाला भीत नाही!" असे तो स्वतःच्या मनाशी पुटपुटला.
मारुतीरायाचे मंदीर दिसू लागले होते. पहाटेच्या रम्य वातावरणात राव्हल्या घामाघूम झाला होता.
पहाटेचा गार वारा त्याच्या गालाला स्पर्श करून पुढे जात होता.
राव्हल्या आता त्याच्या घराच्या जवळच आला.
आणि पायरीवर झिपरी... !
"आयो, झिपरेssss"
बावरा होऊन तो "कोण कोण" म्हणून ओरडत होता.
त्याच्या तोंडावर नुकताच त्याच्या वडिलांनी तांब्याभर पाण्याने अभिषेक घातला होता.
"कधीपासून असा बडबडत राहिलाय रे?"
राव्हल्या स्वप्नातून जागा झाला होता. त्याच्या छातीची धडधड पंख्याच्या वेगाशी स्पर्धा करत होती.
त्याने तोंडावरचे पाणी बनियनने पुसले आणि तांब्याभर पाणी पोटात ओतले. आणि सकाळीच झालेल्या झोपेची 'खिचडी' होऊ नये, म्हणून तो पुन्हा पांघरूणात शिरला. आणि आपल्या खऱ्या झिपरीसोबत पहाटेच्या गुलाबी वातावरणात रंगून गेला.

समाप्त
© डॉ.सुशांत भालेराव
© डॉ.सुशांत भालेराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा